Tips For Making Diwali Faral Ladoo In Marathi

Tips For Making Diwali Faral Ladoo
Tips For Making Diwali Faral Ladoo

टिप्स फॉर दिवाळी फराळ लाडू 

Tips For Making Diwali Faral Ladoo In Marathi

दिवाळीमध्ये आपण करंजी, चकली, शेव, चिवडा बनवतो त्यामध्ये लाडू ही तर हवेच त्या शिवाय आपला दिवाळी फराळ कसा पूर्ण होणार.

आपण लाडू बनवताना पाकातले किंवा बिन पाकाचे लाडू बनवतो. बिन पाकाचे लाडू बनवताना आपल्याला काळजी नसते कारण की ते 100% चांगले होतात बिघडत नाही. पण पाकातले लाडू बनवताना जरा काळजी वाटते कारणकी पाक कधी घट्ट होतो किंवा कधी थोडा पातळ राहतो.

The Marathi language video Tips For Making Diwali Faral Ladoo be seen on our YouTube Channel of: Tips For Making Diwali Faral Ladoo

लाडू बनवताना काही महत्वाच्या टिप्स लक्षात घेतल्या तर आपले लाडू नेहमी चांगले बनतील कधी सुद्धा बिघडणार नाहीत.

Tips For Making Diwali Faral Ladoo
Tips For Making Diwali Faral Ladoo

रवा बेसन लाडू बनवताना
रवा बेसन लाडू बनवताना आपल्याला पाक बनवावा लागतो. तेव्हा कधी पाक पातळ झाला तर मिश्रण गार झाल्यावर लाडू वळता येत नाहीत. अश्या वेळी 5-6 तास मिश्रण तसेच झाकून ठेवावे. तरीसुद्धा मिश्रण आळले नाही तर त्यामध्ये अर्धी वाटी साखरेचा गोळीबंद पाक करून घालावा व लगेच ढवळावे. मिश्रण आळून लाडू वळता येतात.
लाडूचे मिश्रण गरम असताना लाडू वळले तर लाडू वळल्यावर ताटात ठेवले की ते ताटात बसतात व लाडूचे शेप बिघडतो.
पाक जर जास्त घट्ट झालातर गरम असताना लाडू कोरडे अश्या वेळी दुधाचा हबका मारून मिक्स करावे तसेच वळले तर रवा फुलून लाडू कडक होतात.
रवा जर नीट भाजला गेला नसेलतर पाकात रवा फुलत नाही व ते कचट लागतात. अश्या वेळी कोमट दुधाचा हबका मारून मिश्रण थोडा वेळ झाकून ठेवावे मग लाडू वळावे.

बेसन लाडू
बेसन लाडू बनवताना बेसन नेहमी ताजे घ्यावे. अश्या प्रकारचे लाडू लवकर बनतात फक्त बनवताना थोडी काळजी घ्यावी.
बेसन छान खमंग भाजावे म्हणजे खमंग सुगंध आला पाहिजे मग लाडूचा रंग सुद्धा छान येतो व दिसायला सुद्धा छान दिसतात.
डाळीचे पीठ दळताना अगदी थोडेसे जाडसर असावे. जर बारीक पीठ असेल तर लाडू चिकट बनतात व खाताना तोंडात चिकटतात मग अश्या वेळी बारीक रवा भाजून घेतल्याने लाडू छान रवाळ बनतात.
बेसन व साखर खूप माळवी म्हणजे लाडू तेव्हडे लुशलूशीत होतात. गरम असताना लाडूचे मिश्रण न मळता वळले तर लाडू कडक होतात.
बेसन भाजताना वनस्पती तूप वापरणार असालतर त्यामध्ये थोडे साजूक तूप वापरावे म्हणजे लाडू खमंग लागतात.

रवा नारळ लाडू
रवा नारळ लाडू चवीला खूप छान लागतात. मऊ होतात पण ओला नारळ घातल्याने टिकत नाहीत.
रवा छान गुलाबी रंगावर खमंग भाजावा. रवा जर चांगला भाजला नसेल तर लाडू पांढरे बनतात मग ते चवीला चांगले लागत नाहीत. खवा वापरायचा असेलतर दुसऱ्या कढईमद्धे खवा भाजून घेऊन मग मग रव्या बरोबर मिक्स करून मग पाकात घालावा.
पाक बनवताना एक तारी पाक करावा. पाहिजेतर वाटीत थोडे पाणी घेऊन त्यामध्ये 2-3 थेंब टाकून पहावे. पाक लगेच विरघळला नाहीतर पाक तयार झाला असे समजावे किंवा बोटा वर थोडासा पाक घेऊन एक तार येते का पहावी.
पाकामध्ये आपण रवा मिक्स करतो व मिश्रण झाकून बाजूला ठेवतो तेव्हा लाडू वळताना मिश्रण खूप कोरडे वाटले तर दुधाचा हबका मारून लाडू वळता येतात.

खाली काही लांडूच्या लिंक देत आहे.

Healthy and Nutritious Ragi Poha Ladoo
Maharashtrian Style Upvasache Sabudana Ladoo
Simple to make Murmura Ladoo
Recipe for Rose Nariyal Ladoo
Recipe for Churma Ladoo
Recipe for Healthy and Nutritious Khajoor Ladoo
Jhatpat Tasty Chapati Ladoo
Shahi Singhara Peetha che Ladoo
Konkani Style Rava Naral Ladoo Without Sugar Syrup
Maharashtrian Style Delicious Mango Suji Ladoo
Zatpat Healthy Poha Ladoo For Kids
Nutritious Gul Papdi Ladoo Recipe in Marathi
Pakatle Besan Ladu Recipe in Marathi
Don Chamche Tup Mugachya Daliche Paushtik Ladoo In Marathi
Perfect Motichoor Ladoo Without Ladle Recipe In Marathi
Healthy Ladoo For Kids Mango Ladoo & Bournvita Ladoo
Gulkand Ladoo Recipe in Marathi
Nutritious Nachni Poha Ladoo Recipe in Marathi
Nachni Gulache Ladoo Recipe in Marathi
Paushtik Khajoor Ladoo Recipe in Marathi
Delicious Dalia or Phutana Dal Ladoo Recipe in Marathi
Delicious Nutritious Aliv Or Halim or Garden Cress Seeds Ladoo Recipe In Marathi
Chocolate Sesame Ladoos
Healthy and Nutritious Maharashtrian Dinkache Ladoo Recipe in Marathi
Delicious Chocolate Coconut Ladoo Recipe in Marathi
Phutana Daliche Ladoo Recipe in Marathi
Healthy Alivache Ladoo Recipe in Marathi
Paan Ladoo for Mukh Shuddhi Recipe in Marathi
Triveni Ladoo Recipe in Marathi
Maharashtrian Til Honey Ladoo for Makar Sankranti Recipe in Marathi
Soft and Delicious Rava Besan Ladoo Recipe in Marathi
Wheat Flour Ladoo Recipe in Marathi

 

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.