Triveni Ladoo Recipe in Marathi

Maharashtrian Triveni Ladoo
Triveni Ladoo

त्रिवेणी लाडू: त्रिवेणी लाडू हे दिवाळी फराळासाठी किंवा इतर सणावाराला सुद्धा बनवायला छान आहेत. त्रिवेणी लाडू बनवतांना रवा, बेसन व खवा वापरला आहे. लाडू बनवताना रवा व बेसन तुपामध्ये भाजून घेतले आहे व त्यामध्ये खवा, पिस्ता घालून साखरेचा पाक बनवून घातला आहे. रवा व बेसन तुपात भाजून घेतले आहे व तसेच खवा वापरला आहे त्यामुळे लाडू चवीस्ट लागतात.

The English language version of this Ladoo recipe can be seen here – Triveni Ladoo

बनवण्यासाठी वेळ : ६० मिनिट
वाढणी: २५ लाडू

साहित्य:
३ कप रवा
१ कप बेसन
२५० ग्राम खवा
२ कप केशर, दुध व पाणी
३ कप साखर
१/२ कप तूप
१/४ कप पिस्त (तुकडे)
१ टी स्पून वेलचीपूड

Maharashtrian Triveni Ladoo
Triveni Ladoo

कृती:
एका कढईमध्ये १/४ कप तूप गरम करून त्यामध्ये रवा घालून मिक्स करून, गुलाबी रंगावर, मंद विस्तवावर भाजून घ्या. मग त्यामध्ये एक कप कोमट केलेले केशर दुध घालून मिक्स करून झाकून ठेवा,
दुसऱ्या एका कढईमध्ये राहिलेले तूप घालून बेसन मिक्स करून मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजून घ्या. भाजलेले बेसन रव्यामध्ये मिक्स करा.
जाड बुडाच्या भांड्यात साखर व राहिलेले दुध मिक्स करून एक तारी पाक तयार करून त्यामध्ये खवा, भाजलेला रवा, बेसन, पिस्ता तुकडे व वेलचीपूड घालून मिक्स करून २-३ तास तसेच झाकून ठेवा. मग त्याचे एक सारखे २५ लाडू बनवून डब्यामध्ये भरून ठेवा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.