Dhanteras 2026 Yam Deep Daan: Correct Time, Direction, Ritual & 13 Diya Placement for Longevity

Dhanteras 2026 Yam Deep Daan
Dhanteras 2026 Yam Deep Daan: Correct Time, Direction, Ritual & 13 Diya Placement for Longevity

Dhanteras 2026 Yam Deep Daan: Correct Time, Direction, Ritual & 13 Diya Placement for Longevity

धनत्रयोदशी 2026 यमदीपदान कसे करावे? 13 दिवे कुठे लावावे? अकाल मृत्यू भय टाळण्यासाठी खास विधी

अकाल मृत्यू भय टाळण्यासाठी धनत्रयोदशीला घराच्या बाहेर यमदीप दान कसे करायचे? तसेच 13 दीपदान करण्याची जागा व योग्य पद्धत कोणती?
आता 5 नोव्हेंबर 2026 गुरुवार पासून दिवाळी आरंभ हॉट आहे. 6 नोव्हेंबर 2026 शुक्रवार ह्या दिवशी धनतेरस म्हणजेच धनत्रयोदशी आहे हा दिवस खूप महत्वाचा आहे. ह्या दिवशी संध्याकाळी भगवान धन्वंतरी ह्यांची विधीपूर्वक पूजा केली जाते. तसेच ह्या दिवशी यम दीपदान ह्याला सुद्धा खूप महत्व आहे. आज आपण धनत्रयोदशी ह्या दिवशी यम दीपदान कसे करायचे, त्याचे महत्व, दिवा कसा बनवायचा, तेल कोणते वापरावे, तसेच महत्वाचे म्हणजे दिवा लावायची वेळ व दिशा कोणती आहे दिवा लावायची दिशा खूप महत्वाची आहे. यम दीपदान नियमा नुसार केले व मंत्र जाप केला तर अकाल मृत्यू पासून आपल्या घरातील व्यक्तीचा बचाव होतो.

आपण फक्त एक दिवा तयार करून यम दीपदान करू शकता किंवा आपण 13 दिवे तयार करून ते पण लाऊ शकता, हे 13 दिवे कुठे कुठे लावावे ह्याची सविस्तर माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत. आपण कोणता सुद्धा एक पर्याय निवडू शकता.

धनत्रयोदशी हा सण सुख-समृद्धी व खुशालीचे प्रतीक मानले जाते. ह्या दिवशी भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी व भगवान कुबेर ह्यांची पूजा केली जाते. त्याच बरोबर यम दीपदान केले जाते.

धार्मिक मान्यता अनुसार धनत्रयोदशीच्या संध्याकाळी यमराज ह्यांच्या नावानी दीपक लावलयाने परिवार वर त्यांची कृपा राहते व अकाल मृत्यू चे भय निघून जाते. पण आपल्याला माहीत आहे का? यम दीपक कोणत्या दिशेला लावायचा त्याची योग्य वेळ व त्याची पूजा कशी करायची? यम दीपदान योग्य विधी व नियम काय आहेत?

धनत्रयोदशीच्या दिवशी यम दीप कधी लावला पाहिजे?
धनत्रयोदशी ह्या दिवशी यमराज ह्यांच्या नावानी दीप संध्याकाळच्या वेळी लावायचा आहे. धार्मिक मान्यता अनुसार सूर्यास्त झाल्यावर म्हणजेच प्रदोश काल मध्ये यम दीपदान करणे शुभ मानले जाते. म्हणूनच घरच्या बाहेर घरातील सर्व सदस्य एकत्र येऊन यमराज ह्यांच्या नावानी दीप लावायची परंपरा आहे. दीप लावताना सूर्यास्त च्या नंतरची वेळ घ्यायची आहे.

धनत्रयोदशीच्या दिवशी यम दीपक कसा लावावा?
धनत्रयोदशीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या दक्षिण दिशेला बाहेर यम दीपक लावावा. हा दिवा लावताना तिळाचे तेल किंवा सरसुचे तेल घालावे, त्यामुळे वातावरणात शुद्धी येते व नकारात्मक ऊर्जा दूर होते.

धनत्रयोदशीच्या दिवशी यम दीपक का लावावा?
असे म्हणतात की धनत्रयोदशीच्या रात्री यम दीपक लावल्याने व्यक्तीच्या जीवनात मृत्यूचे भय समाप्त होते. यम दीपक लावल्याने दीर्घायु, सुख-समृद्धीचे प्रतीक मानले जाते. घरात शांती व सकारात्मकता येते.

यम दीपक कश्या पद्धतीने लावावा:
एका बाउलमध्ये 1 कप कणिक घेऊन त्यामध्ये थोडी हळद घालून मिक्स करा पण त्यामध्ये मीठ आजिबात घालायचे नाही. मग कणिक मळून एक भाग मोठा व 2 भाग छोटे करून घ्या. मोठ्या भागाचा चार मुखी दिवा बनवावा, व 2 लहान भागांच्या दोन मुठी बनवाव्या. १ मोठा चौमुखी दिवा (चार वाती असलेला दिवा) लावून यमदीपदान केले जाते. मग त्यामध्ये मोहरीचे तेल किंवा आपल्या घरातील तेल घालून दिवा तयार करावा. मग प्रदोष काळात लावावा.

Dhanteras 2026 Yam Deep Daan
Dhanteras 2026 Yam Deep Daan: Correct Time, Direction, Ritual & 13 Diya Placement for Longevity

दिवा डायरेक्ट जमिनीवर न ठेवता थोडे तांदूळ ठेवावे मग त्यावर दिवा ठेवून लावावा मग दिव्याला हळद, कुंकू, अक्षता, फुल अर्पित करावी व घरातील सर्व व्यक्तिनी हात जोडून दीर्घायुषसाठी प्रार्थना करावी असे केल्याने घरात अपमृत्यू होत नाही असे म्हणतात.

मंत्र:
मृत्युना पाशदण्डाभ्यां कालेन च मया सह।
त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रीयतां मम॥

वर दिलेला मंत्र धनत्रयोदशीच्या दिवशी यम दीपदान करताना म्हणायचा आहे त्यामुळे सूर्यपुत्र यमराज प्रसन्न होतात व परिवरावर त्यांची कृपा राहते.

धनत्रयोदशीच्या दिवशी बिना विसरता यम दीपदान जरूर करावे व आपल्या परिवाराचे स्वास्थ चांगले राहावे म्हणून प्रार्थना करावी.

आपल्याला जर धनत्रयोदशीच्या दिवशी 13 दिवे लावायचे असतील तर कसे लावावे व कुठे लावावे, ह्या 13 दिव्यामधील एक दिवा यमदीप म्हणून लावू शकता. ह्याची ह्याची सविस्तर माहिती पुढे दिलेली आहे.

आपण कणके पासून 13 दिवे बनवू शकता किंवा एक चौमुखी दिवा कणकेचा बनवा (कणकेचा देवा यम दीप म्हणून ठेवा) व बाकीचे मातीच्या पणत्या लावल्या तरी चलत्तात. आता पाहू या हे 13 दिवे कुठे ठेवायचे.
* पहिला दिवा घरच्या बाहेर दक्षिण दिशेला वात ठेवून ठेवावा. हा दिवा यमराज ह्यांच्या साठी अकाल मृत्यू टळण्यासाठी आहे.
* दूसरा दिवा आपल्या घरातील देव्हाऱ्या समोर, पण हा दिवा तुपाचा लावावा.
* तिसरा दिवा घरातील धनलक्ष्मी फोटो किंवा मूर्ती समोर लावावा.
* चौथा दिवा घरातील तुळशी वृंदावन जवळ लावावा.
* पाचवा दिवा हा दिवा घरातील मुख्य दरवाजाच्या बाजूला उंबरठ्यावर लावावा.
* सहावा दिवा आपल्या घरच्या जवळ पिंपळाचे झाडाखाली लावावा.
* सातवा दिवा आपल्या घरच्या जवळ मंदिर असेलतर तेथे लावावा.
* आठवा दिवा घरा बाहेर जेथे कचरा टाकतो तेथे लावावा.त्यामुळे नाकारात्मकता दूर होते.
* नववा दिवा घरातील बाथरूमच्या बाहेर सुरक्षित जागी लावावा.
* दहावा दिवा घरच्या गच्चीवर किंवा छतावर लावावा.
* अकरावा दिवा घरातील खिडकीत किंवा बाल्कनी मध्ये लावावा.
* बारावा दिवा घरच्या वरच्या मजल्यावर किंवा छतावर लावावा.
*. तेरावा दिवा आपल्या घरच्या जवळ कोणता चौक असेल तेथे लावावा.
हे सर्व दिवे प्रथम आपल्या घरातील देवघरात ठेवून त्याची पूजा करून म्हणजेच हळद-कुंकू, अक्षता फूल अर्पित करून त्यांची पूजा करून मग दुसरी कडे ठेवावेत.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.