Vasubaras 2026: How to Worship the Cow and Calf? 4 Special Remedies for Children’s Happiness & Prosperity | Govatsa Dwadashi

Vasubaras 2026
Vasubaras 2026: How to Worship the Cow and Calf? 4 Special Remedies for Children's Happiness & Prosperity | Govatsa Dwadas

Vasubaras 2026: How to Worship the Cow and Calf? 4 Special Remedies for Children’s Happiness & Prosperity | Govatsa Dwadashi

वसुबारस 2026: गाय-वासराची पूजा कशी करावी? महत्व, मुलांच्या सुख-समृद्धीसाठी 4 खास उपाय

वसुबारस ह्या वर्षी 5 नोव्हेंबर 2026 गुरुवार ह्या दिवशी साजरी करायची आहे. ही तिथी गाय-वासरू ची पूजा विधी पूर्वक कशी करायची, धार्मिक महत्व काय आहे व व्रत कसे करावे? ह्याची संपूर्ण माहिती पहा.

दिवाळी हा वर्षातील सर्वात महत्वाचा सण आहे. दिवाळी सुरू होण्याच्या अगोदर वसुबारस हा दिवस येतेओ. त्यालाच गोवत्स द्वादशी असे सुद्धा म्हणतात. ह्या दिवशी गाय व तिचे वासरू ह्यांची पूजा करण्याची पारंपारिक पद्धत आहे. त्यालाच वसु बारस किंवा नंदिनी व्रत असे सुद्धा म्हणतात. हिंदू धर्मामध्ये गाय ही पूजनीय मानली जाते. गोमाता मध्ये 33 कोटी देव सामावलेले आहेत. म्हणून हा दिवस खास मानला जातो.
वसु बारस ह्या दिवशी घरातील महिला, संतान व परिवारातील इतर व्यक्ति सुख-समृद्धीची कामना ठेवून व्रत ठेवतात. ह्या दिवशी गाय-वासरू ह्यांची पूजा का करायची ते पाहू या?

वसु बारस (गोवत्स द्वादशी) 2026 कधी आहे?
5 नोव्हेंबर 2026 गुरुवार ह्या दिवशी वसु बारस हा दिवस आहे. हा दिवस कार्तिक मास कृष्ण पक्ष द्वादशी तिथीला येतो. महाराष्टमध्ये वसु बारस ह्या नावानी साजरा करतात. बऱ्याच ठिकाणी दिवाळीचा पहिला दिवस म्हणून दिवा लावतात व गाय-वासरूची पूजा करतात.

गाय-वासरूची पूजा का केली जाते? धार्मिक मान्यता अनुसार गायमध्ये सर्व देवतांचा वास आहे. गाय ला माता लक्ष्मी व समृद्धीशी जोडले जाते व वासरू साठी आई, स्नेह व पालन-पोषण चे प्रतीक मानले जाते. ह्या दिवशी गाय-वासरू ह्यांची सोबत पूजा केल्याने त्याच्या प्रती सन्मान व कृतज्ञता प्रकट केली जाते.

वसुबारस २०२६ तारीख आणि तिथी:
• दिनांक: गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६
• द्वादशी तिथी आरंभ: ५ नोव्हेंबर २०२६ सकाळी १०:३५ वाजता
• द्वादशी तिथी समाप्त: ६ नोव्हेंबर २०२६ सकाळी १०:३० वाजता

पूजेची शुभ वेळ / मुहूर्त:
• गोधूलि मुहूर्त (संध्याकाळची वेळ): संध्याकाळी ५:११ ते ५:५४ मिनिट पर्यंत
• प्रदोष काळ पूजा मुहूर्त: संध्याकाळी ५:३३ ते रात्री ७:५७ मिनिट पर्यंत (किंवा काही पंचांगानुसार ६:०५ ते ८:३० मिनिट पर्यंत)
• अभिजीत मुहूर्त: सकाळी ११:४० ते दुपारी १२:२८ मिनिट पर्यंत
• राहुकाळ (वर्ज्य वेळ): दुपारी १:२६ ते २:४८ मिनिट पर्यंत

वसु बरस पूजा कशी करावी?
वसु बारस ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पूजेची जागा साफ करून घ्या. मग गाय-वासरूची पूजा करायची तयारी करून घ्या. गाय-वासरू ला साफ जल नी स्नान घाला मग हळद-कुंकू, फूल व फुलांची माळ घालून त्यांचा शृंगार करा. धूप-दीप लाऊन आरती करा. मग गूळ व हिरवा चारा अर्पित करा. जर घराच्या जवळ गाय उपलब्ध नसेलतर गाय-वासरूचे चित्र किंवा मूर्ती श्रद्धा पूर्वक ठेवून पूजा करा.

वसु बारस (गोवत्स द्वादशी) व्रत का केले जाते?
वसु बारस ह्या दिवशी महिला आपल्या संतान च्या चांगले स्वास्थ, सुख व उज्ज्वल भविष्यसाठी व्रत करतात. त्यालाच नंदिनी व्रत असे सुद्धा म्हणतात. व्रत ठेवणारे आपल्या परिवारातील पारंपारिक पद्धती नुसार भोजन व पूजाचे नियम पाळून पूजा करतात.

वसु बारस धार्मिक संदेश काय आहे:
वसु बारस ह्या दिवशी फक्त पूजा-पाठ करण्यासाठी सीमित नाही. ते आपल्याला गाय व अन्य पशू-पक्षी च्या प्रती प्रेम व जिम्मेदारीचा भाव व प्रेरणा देते. भारतात परंपरेनुसार गाय कृषि, दूध व ग्रामीण जीवनशी गहरा संबंध आहे.

वसुबारस चे महत्व:
गोधन व गाय माताच्या प्रती कृतज्ञता: ‘वसु’ चा अर्थ धन, समृद्धि व गाय असा होतो. तसेच ‘बारस” ह्याचा अर्थ द्वादशी तिथी असा होतो. ह्या दिवशी गाय-वासरूची पूजा करतात.महाराष्ट्रात दिवाळीचा पहिला दिवस समजतात.

कृषि संस्कृतिचा सम्मान: भारतीय कृषि प्रधान संस्कृति मध्ये गाय ला माताचा दर्जा दिला जातो. गाय मुळे गोधन व शेती व जीवनाचे पालन-पोषण होते.

संतान व परिवारचे कल्याण: ह्या दिवशी महिला आपल्या मुलांच्या स्वास्थसाठी, सुख-समृद्धीसाठी व परिवाराची खुशालीसाठी व्रत ठेवतात व गोमाताचा आशीर्वाद मागतात.

लक्ष्मीमाताचा वास: धार्मिक मान्यता अनुसार वसुबारस ह्या दिवशी गाय मध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. म्हणूनच घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लाऊन रोषणाई केली जाते.

Vasubaras 2026
Vasubaras 2026: How to Worship the Cow and Calf? 4 Special Remedies for Children’s Happiness & Prosperity | Govatsa Dwadas

मुलांच्या भाग्य व स्वास्थ्य साठी विशेष उपाय:
1. गाईच्या गोठ्यात सेवा: (सर्वात मुख्य उपाय) वसुबारस च्या दिवशी जवळ असणाऱ्या गोशाला मध्ये जाऊन आजारी व कमजोर गाय किंवा वासरू ह्यांची जिम्मेदारी उचला, त्यांना चारा, गूळ व भिजवलेले चणे किंवा मुग सेवन करायला द्या. ज्योतिष शास्त्र अनुसार असे केल्याने मुलांच्या जीवनात येणाऱ्या सर्व बाधा दूर होतील व त्याची उन्नती होईल.

2. नंदिनी व्रत संकल्प: मातानी ह्या दिवशी आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यसाठी नंदिनी व्रत करावे दिवसभर उपवास करून संध्याकाळी पूजा करून मग सात्विक भोजन करावे.

3. गाय वासरू मातीचे किंवा धातूचे ह्यांची पूजा: आपल्या कडे जर खरे गाय वासरू नसेलतर आपल्या घरातील मंदिरात चांदी, तांबे किंवा मातीचे गाय वासरू मूर्ती स्थापित करावी. त्यांना हळद-कुंकू, अक्षता, फूल व फुलाचा हार अर्पित करावा.

4. दिवाचा प्रभावी उपाय: संध्याकाळी पूजाच्या वेळी एक दिवा लावावा मग गाय वासरूची आरती करावी व भगवान श्रीकृष्ण कडे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यची प्रार्थना करा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.