Maharashtrian Diwali Faral 2026 | Perfect Chivda, Chakli, Shankarpali, Karanji, Ladoo & Bakarwadi Tips! In Marathi

Maharashtrian Diwali Faral 2026 tips
Maharashtrian Diwali Faral 2026 | Perfect Chivda, Chakli, Shankarpali, Karanji, Ladoo & Bakarwadi Tips!

Maharashtrian Diwali Faral 2026 | Perfect Chivda, Chakli, Shankarpali, Karanji, Ladoo & Bakarwadi Tips!

महाराष्ट्रीयन दिवाळी फराळ 2026 | चिवडा, चकली, करंजी, लाडू, शंकरपाळी परफेक्ट बनवण्याच्या खास टिप्स

चिवडा, चकली, शंकरपाळी, लाडू, करंजी, बाखरवाडी महाराष्ट्रियन दिवाळी फराळ परफेक्ट कसा बनवायचा?

महाराष्ट्रियन दिवाळी फराळ काय आहे? महाराष्ट्र म्हंटले की दिवाळी ही धूमधडाक्यात साजरी करतात. दिवाळी हा महाराष्ट्रियन लोकांचा सर्वात महत्वाचा, धार्मिक सण आहे. ह्या वर्षी दिवाळी 5 नोव्हेंबर 2026 गुरुवार पासून सुरू होत आहे.
5 नोव्हेंबर ला वासुबारस हा दिवस आहे त्या दिवशी गोमाताची पूजा केली जाते, घराच्या दरात दिवा सुद्धा लावला जातो. घरात दिवाळीचे खूप प्रसन्न वातावरण असते. ह्या दिवसा पासून छोटी दिवाळी साजरी करतात. मग ह्या अगोदरच आपल्या घरात दिवाळी फराळ बनवण्याची सुरुवात होते. म्हणजे दिवाळी सुरू होण्याच्या 5-6 दिवस अगोदर सुरुवात होते.

महाराष्ट्रात महिला अगोदर पासूनच फराळ काय काय बनवायचा ह्याची तयारी सुरू करतात. व त्याप्रमाणे सर्व नियोजन करतात. आजकाल महिला नोकरी व्यापार निमित्ताने घराच्या बाहेर दिवसभर असत्तात पण तरीही बऱ्याच महिला दिवाळी फराळ स्वतः घरीच दिवाळी फराळ बनवतात. त्यामध्येच एक मोठी मज्जा असते. मग शेजारी पाजारी फराळाची आदला बदल केली जाते. प्रतेक जणाची फराळ बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. मग एकमेकाच्या रेसीपी सांगितल्या जातात. पण घरी जो फराळ बनवला जातो त्याची चव निराळी व स्वादिष्ट असते बाजारच्या फराळाला ती चव येत नाही.

आपण फराळ च्या अगोदर घराची साफ-सफाई करून घेतो. घरात दिवाळी डेकोरेशन करून घेतो. पूजेसाठी लागणारे सामान आणून ठेवतो, मग पणत्या, दिवे, रांगोळी व रांगोळीचे रंग आणून ठेवतो म्हणजे आईनवेळी जास्त धावपळ होत नाही. अगोदरच नियोजन करून सर्व केलेकी सर्व गोष्टी वेळच्या वेळी होतात. आपण दिवाळी फराळ बनवणार तेव्हा दिवाळीच्या 3-4 दिवस अगोदर बनवायला सुरुवात करा. म्हणजे छान ताजा राहील व त्याची टेस्ट सुद्धा छान टिकून राहील.

दिवाळी फराळ बनवण्याच्या अगोदर वेळची पूड बनवून ठेवा, पिठीसाखर बनवून ठेवा, चिवडा बनवण्यासाठी सुके खोबरे उभे पातळ चिरून ठेवा, शेंगदाणे थोडे भाजून ठेवा. लाडूसाठी चनाडाळ व पिठीसाखर दळून आणून ठेवा, चकलीची भाजणी करून दळून ठेवा. चिवडा बनवण्यासाठी पातळ पोहे निवडून ठेवा. काही तयारी आपण आधीच केलीतर फराळ बनवणे सोपे होते.

मी आपल्याला माझ्या वेबसाइटची म्हणजेच दिवाळी फराळ ह्या भागाची लिंक पुढे दिलेली आहे तेथे विविध प्रकारचे दिवाळी फराळ पाहू शकता : https://www.royalchef.info/category/diwali-faral

आता आपण महाराष्ट्रियन पद्धतीचे दिवाळी फराळ ह्याच्या टिप्स व त्यासाठी काय काय समान तयारी करून ठेवायची ते पाहूया.

1. दिवाळी कुरकुरीत चिवडा: चिवडा म्हंटले की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते, करणकी चिवडा हा तोंडाला छान चव आणतो. आपण पातळ पोह्याचा चिवडा बनवतो. तेव्हा पोहे छान कडक उन्हात थोडावेळ ठेवा म्हणजे चिवडा छान कुरकुरीत होतो. चिवडा बनवताना आपण सुके खोबरे, शेंगदाणे, पंढरपुरी डाल, कडीपत्ता, काजू, किसमिस घालतो पण जर आपण चिवडा बनवताना जेव्हा तेलाची फोडणी करतो तेव्हा एक मध्यम आकाराचा कांदा किसून छान तळून घ्या मग त्यामध्ये खोबरे, शेंगदाणे घाला सर्वात शेवटी पोहे घातल्यावर मीठ व पिठीसाखर घाला व 4-5 मिनिट मंद विस्तवावर चिवडा फ्राय करून मग विस्तव बंद करा, चिवडा थंड झाल्यावर प्लॅस्टिक पिशवीत भरून घट्ट बंद करून हवबंद डब्यात भरून ठेवा.

2. चकली: चकली हा पदार्थ सर्वाना खूप आवडतो. कोणी फराळचे सर्व्ह केले की प्रतेक जण प्रथम चकली सेवन करण्यासाठी उचलतो. खमंग चकली बनवण्यासाठी पारंपारिक चकलीचे पीठ घरीच बनवा मग त्याची चकली बनवा चकली सुद्धा विविध प्रकारे बनवता येते. चकली भाजणी व चकली तळणे त्यासाठी खूप पद्धतीने करावे लागते. चकली बिघडू नये व बिघडली तर काय करायचे ह्याच्या विडियो व आर्टिकल ह्या अगोदर पब्लिश केले आहे व त्याला लाखों View’s आहेत, त्याची लिंक दिलेली आहे.

3. शंकरपाळी: शंकरपाळी आपण गोड किंवा खारी शंकरपाळी बनवतो. शंकरपाळी हा पदार्थ पारंपारिक आहे. त्यासाठी दूध, तेल अ साखर योग्य प्रमाणात घेतले तर शंकरपाळी खूप छान होते. गोड शंकरपाळी बरोबर नमकीन शंकरपाळी पण खूप छान लागते.

4. लाडू: दिवाळी म्हंटले की लाडू तर पाहिजेच त्याशिवाय आपला फराळ पूर्ण होत नाही. मग आपण लाडू बेसन व रवा घालून बनवतो बेसनचे लाडू बरेच दिवस छान टिकतात. आपण रवा-नारळ लाडू पण बनवतो पण रवा-नारळ लाडू 3-4 दिवस छान टिकतात मग नंतर नाही टिकत करणकी त्यामध्ये ओला नारळ वापरतो. लाडू मध्ये ड्रायफ्रूट घालून चव छान होते व ते आकर्षक दिसतात.

Maharashtrian Diwali Faral 2026 tips
Maharashtrian Diwali Faral 2026 | Perfect Chivda, Chakli, Shankarpali, Karanji, Ladoo & Bakarwadi Tips!

5. करंजी: करंजी हा दिवाळी फरळाचा राजा आहे असे म्हणतात, त्या शिवाय आपला दिवाळी फराळ अधूराच आहे. करंजी आपण ओल्या नारळाची किंवा सुक्या नारळाची बनवतो. करंजी महाराष्ट्रियन लोकांची लाजवाब डिश आहे. आपण साट्याच्या करंज्या किंवा बिना साट्याच्या करंज्या बनवतो.

6. बाखरवाडी: बाखरवाडी हा पदार्थ म्हणजे सर्वांचा खूप आवडतीचा आहे. एक बाखरवाडी सेवन केलीतरी मन भरून जाते. त्यामध्ये सुकानारळ, तीळ, खसखस व मसाला असतो. त्यामुळे त्याची टेस्ट अप्रतिम लागते.

7. शेव: शेव पण छान कुरकुरीत व टेस्टि पदार्थ आहे दिसायला सुद्धा आकर्षक दिसतो व चविष्ट लागतो. त्यामध्ये ओवा व हळद वआपली जाते. पण ओवा घालायचा असेलतर अगदी बारीक कुटून चाळून घाला म्हणजे शेव बनवतान त्रास होत नाही व मध्येच तुटत नाही.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.