Dussehra 2026 Shami Puja: Auspicious Muhurat, Powerful Mantra, Sacred Story & Amazing Benefits
दसरा शमी पूजा 2026: शुभ मुहूर्त, मंत्र, कथा व पूजेचे चमत्कारिक लाभ | Vijayadashami
हिंदू धर्मामधील प्रमुख धार्मिक परंपरामध्ये शमी पूजा पण शमिल आहे. शमीच्या वृक्षाला शुभ व पूजनीय मानले जाते व दसरा ह्या दिवशी व बाकी काही धार्मिक दिवशी शमीची पूजा करणे महत्वाची मानली जाते. दसरा ह्या दिवशी शमीच्या मुळाशी जल अर्पित करून रोली, अक्षता, फूल व दिवा लाऊन पूजा केली जाते. त्याच बरोबर शमी मंत्रचा जाप केला जातो. असे म्हणतात की शमीची मनापासून पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी व सकारात्मकता येते.
शमीची पूजाच्या बरोबर परंपरानी त्याचा संबंध भगवान शिव, शनि देव व विजयच्या प्रतिकचे रूप शमीच्या वृक्षाशी जोडले जाते. म्हणूनच काही लोक शुभ कार्यच्या वेळी शमीच्या वृक्षाची पूजा करून शमीची पाने देवाला अर्पित करतात. आता आपण पाहू या शमी पूजेचे महत्व, पूजा विधी व शुभ वेळ व त्याच्याशी जोडले गेलेली धार्मिक मान्यता काय आहे.
शमी पूजा कधी आहे?
20 ऑक्टोबर 2026 मंगळवार दसरा म्हणजेच विजयादशमी ह्या दिवशी आहे. धार्मिक परंपरा अनुसार, ह्या दिवशी दुपारी शमी वृक्षाची पूजा करणे शुभ मानले आहे. विजयादशमी ह्या दिवशी शमी पूजासाठी विजय मुहूर्त विशेष महत्वाचा मानला जातो.
शमीपूजा 2026 शुभ वेळ:
विजय मुहूर्त: दुपारी 01:59 पासून 2:45 मिनिट पर्यन्त
अपराहन पूजा मुहूर्त: दुपारी 01:14 पासून 3:30 मिनिट पर्यन्त
दशमी तिथी सुरू: 20 ऑक्टोबर 2026 दुपारी 12:50 मिनिट
दशमी तिथी समाप्त: 21 ऑक्टोबर 2026 दुपारी 02:11 मिनिट
शमी पूजासाठी देलेली वेळ म्हणजेच मुहूर्त प्रतेक शहराच्या अनुसार थोडाफार फरक असू शकतो. म्हणून आपल्या शहराच्या स्थानिक पंचांग पाहून मुहूर्त बघा.
शमी वृक्षाशी जोडली गेलेली कथा:
शमी वृक्षशी जोडली धार्मिक व पौराणिक कथा प्रचलित आहेत. ह्या कथामध्ये शमीचा विजय, शक्ति,शुभता, व समृद्धी शी जोडून पहिले आहे. शमी पूजाचे महत्व समजून घेण्यासाठी त्याच्याशी प्रमुख कथा पहिल्या पाहिजेत.
महाभारत कथा:
महाभारत कथा अनुसार, पांडवांनी आपल्या अज्ञातवासच्या दौरान आपली अस्त्र-शस्त्र एक शमीच्या वृक्षामध्ये लपवून ठेवली होती. अज्ञातवास पूर्ण झाल्यावर त्यांनी शमीच्या वृक्षा मधून आपली हत्यार काढून परत युद्ध करण्यासाठी प्रस्थान केले होते. म्हणूनच शमी वृक्षाला विजय व शक्तिशी जोडून पाहिले जाते. विजयदशमी ह्या दिवशी शमी पूजाची परंपरा ह्या कथेशी जोडली आहे.
श्रीराम व शमी:
धार्मिक मान्यता अनुसार शमी वृक्षचा संबंध भगवान श्रीराम ह्यांच्याशी सांगितला आहे. लंकावर विजय मिळवण्याच्या प्रस्थान करण्याच्या पहिले श्रीराम ह्यांनी शमीची पूजा केली होती. म्हणूनच शमी विजय व सफलताचे प्रतीक मानले जाते व दसरा ह्या दिवशी शमीची पूजा करण्याची परंपरा बऱ्याच ठिकाणी दिसून येते.
शमीची पाने व सोने:
दसराच्या दिवशी शमीची पाने एक-दुसऱ्याला देण्याची परंपरा काही ठिकाणी आहे. ही पाने सोने म्हणून वाटण्याची मान्यता आहे. त्यामागे एक प्रसिद्ध कथा राजा रघु व कौत्स शी जोडली गेली आहे. कौत्सची गुरु दक्षिणा पूर्ण करण्याससाठी राजा रंगू नी कुबेर कडे धन मागितले. मग त्यानंतर शमी व आपट्याच्या वृक्षावर सुवर्ण मुद्राची वर्षा झाली, तेव्हा पासून दसरा ह्या दिवशी शमीची पाने सोन्या समान मानून एक-दुसऱ्याला देण्याची परंपरा प्रचलित झाली आहे.
शमी पूजा विधि:
दसरा ह्या दिवशी दुपारी शमीची पूजा करण्याची परंपरा आहे. पूजा करण्याच्या अगोदर सर्व साहित्य व साफ-सफाई करण्याचे विशेष ध्यान द्या.
पूजा साहित्य: पूजा करण्यासाठी शुद्ध जल किंवा गंगाजल, रोली किंवा कुंकू, अक्षता, फूल, धूप, दीपक, नेवेद्य व आरतीची थाली बनवून ठेवा.
शमी पूजा कशी करायची:
सर्वात पहिल्यादा स्नान करून साफ कपडे परिधान करा. पूजा विजय मुहूर्तवर करा.
शमी वृक्षा जवळ जाऊन शुद्ध जल किंवा गंगाजल अर्पित करा.
मग शमी वृक्षाला रोली किंवा कुंकू, अक्षता, फूल अर्पित करा.
शमी वृक्षा जवळ धूप व दिवा लाऊन विधिपूर्वक पूजा अर्चा करा.
श्रद्धाने शमी पूजा मंत्र जाप करा. व देवाजवळ सुख-शांती, समृद्धी व विजय मिळण्यासाठी प्रार्थना करा.
मग शमी वृक्षाला नेवेद्य अर्पित करून आरती करा. पूजा झाल्यावर शमी वृक्षला प्रदक्षिणा मारा.
पूजा झाल्यावर शमी वृक्षच्या खाली पडलेली पाने गोळा करून आपले परिवार मध्ये प्रसाद किंवा आशीर्वादच्या रूपात ग्रहण करण्याची परंपरा आहे.
शमी पूजा कोणत्या दिशेला करावी?
परंपरा नुसार शमीची पूजा गावातील किंवा शहर मधील उत्तर-पूर्व (ईशान कोण) ही जागा शुभ मानली जाते. पण घरात शमी वृक्ष लावण्याची दिशा वेगळी मानली जाते.

शमी पूजा मंत्र:
शमीची पूजा करताना पुढे दिलेला मंत्र जाप करा. असे म्हणतात की श्रद्धेने ह्या मंत्राचा जाप केल्यास व्यक्तिला सुख-शांती व शुभताची कामना करता येते.
मंत्र:
अमङ्गलानां शमनीं शमनीं दुष्कृतस्य च।
दुःस्वप्ननाशिनीं धन्यां प्रपद्येहं शमीं शुभाम्।।
शमी पूजाचे लाभ:
शमी पूजाला धार्मिक आस्था, शुभता व सकारात्मक ऊर्जाशी जोडून पाहिले जाते. श्रद्धेने पूजा केल्यास व्यक्तिच्या जीवनात सुख-शांती टिकून राहते व शुभ कार्य साठी आत्मविश्वास वाढतो.
सुख-शांति व सकारात्मकता: शमी पूजेला शनती व सकारात्मक भाव वाढण्यासाठी मदत होते. नियमित पूजा केल्यास घरातील वातावरण शांत व सकारात्मक भावनाने राहते.
समृद्धि व शुभता: धार्मिक मान्यता अनुसार, शमी वृक्ष ची पूजा घरात सुख-समृद्धी व शुभता राखण्यासाठी मदतगार राहते.
वास्तु दोष निवारण: वास्तु मध्ये शमीचे वृक्ष लावणे शुभ मानले जाते. योग्य दिशा व नियमित पूजा केल्याने वास्तु दोष निघून जातो.
शनिदेवाची कृपा: श्रद्धाने शमीची पूजा केल्यास शनि देवची कृपा प्राप्त होते विशेष रूपानी शनिवार ह्या दिवशी शमीची पूजा करणे महत्वाचे आहे.
शमीची पूजा केवल धार्मिक अनुष्ठान नहीं, तर आस्था, परंपरा व शुभताशी जोडली गेले आहे. विजया दशमीच्या दिवशी शमची पूजा केल्याने विजय, सुख-शांती व समृद्धी प्राप्त होते.
