Kanya Pujan 2026: Ashtami or Navami? Date, Shubh Muhurat, How Many Girls to Worship?
अष्टमी व नवमी तिथी कन्या पूजन कधी करावे? त्यामुळे कंफ्यूजन होईल दूर,तारीख, मुहूर्त किती कन्या बोलवाव्या
आता शारदीय नवरात्री सुरू आहे. नवरात्रीमध्ये कन्या पूजन हे खूप पवित्र व महत्वाचे मानले जाते. नवरात्रीमध्ये अष्टमी तिथी व नवमी तिथी कन्यापूजनचे थोडे कंफ्यूजन आहे. खर म्हणजे सप्तमी तिथी ह्या वर्षी दोन दिवस आहे त्यामुळे थोडी उलझन आहे. चला तर मग पाहू या कोणत्या दिवशी म्हणजे अष्टमी का नवमी तिथीला कन्या पूजन करणे शुभ आहे.
शारदीय नवरात्रीचे कन्यापूजन कधी करायचे? थोडे कंफ्यूजन आहे. खर म्हणजे ह्या वर्षी सप्तमी तिथी दोन दिवस उदय काळ वेळ आहे त्यामुळे जरा कंफ्यूजन आहे. नवरात्री मध्ये व्रत करणारे अष्टमी किंवा नवमी तिथीला कन्या पूजन करतात. कोणाकडे अष्टमी तिथीला कन्या पूजन करतात व काही जणांकडे नवमी तिथीला कन्यापूजन करतात. ज्यांच्या कडे अष्टमी तिथीला कन्यापूजन करतात त्यांच्या कडे सप्तमी तिथीला व्रत करतात. तसेच ज्यांच्या कडे नवमी तिथीला कन्यापूजन करतात त्यांच्या कडे अष्टमी तिथीला व्रत करून पारण करतात. ह्या दिवशी नऊ देवीची रूप असणारे प्रतीक म्हणजे नऊ कन्या ह्याची पूजा करतात. ह्या दिवशी नऊ कन्या घरी आमंत्रित करून त्यांची पूजा करतात. त्याच बरोबर एका बालक सुद्धा आमंत्रण देतात. त्याला बटुक भैरव किंवा लांगूर चे रूप मानतात.
आपल्याला कोणत्या दिवशी कन्यापूजन करायचे आहे त्याचे कंफ्यूजन दूर होण्यासाठी पुढे माहिती दिली आहे. आपण पाहू या कोणत्या दिवशी अष्टमी नवमी कन्या पूजन करणे शुभ आहे.
अष्टमी 2026 कन्यापूजन कधी आहे?
अष्टमी तिथी 18 ऑक्टोबर 2026 सकाळी 8;29 मिनिट पासून आरंभ होत असून 19 ऑक्टोबर 2026 सकाळी 10:52 मिनिट पर्यन्त आहे. मग आपण उदय काळ रहित अष्टमी तिथीला कन्या पूजन करू शकता. म्हणजेच आपण 18 ऑक्टोबर किंवा 19 ऑक्टोबर ह्या तिथीला कन्यापूजन करू शकता, पूर्ण दिवस अष्टमी तिथीला संयोग आहे पण 18 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8:29 मिनिट पासून कन्यापूजन करू शकता, आपण ह्या दिवशी कन्या पूजन करून मग पारण दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 ऑक्टोबर 2026 रोजी करू शकता. मग आपले अष्टमी तिथीचे व्रत व कन्या पूजन सुद्धा होऊ शकते.
अष्टमी तिथि आरंभ: 18 ऑक्टोबर 2026 :सकाळी 8:29 मिनिट पर्यन्त
अष्टमि तिथि समाप्त: 19 ऑक्टोबर 2026: सकाळी 10:52 मिनिट पर्यन्त
नवमी तिथी कन्या पूजन कधी?
पंचांग अनुसार, 19 ऑक्टोबर ला नवमी तिथी सकाळी 10:52 मिनिट आरंभ होत आहे. मग अश्या वेळी लोक नवमी तिथीला कन्या पूजन करतात. पण कन्यापूजन करताना 10:52 मिनिट नंतर करू शकता व पारण 20 ऑक्टोबर सकाळी 12:50 मिनिट च्या आता करू शकता. नवमी तिथीचे कन्यापूजन 19 ऑक्टोबर सकाळी 10:52 मिनिट नंतर करू शकता. आपण पाहिजे तर कन्यापूजन 20 ऑक्टोबर ला सुद्धा करू शकता. पण सकाळी 12:50 मिनिट च्या अगोदर करा, कारणकी त्यानंतर दशमी तिथी आरंभ होते.
नवमी तिथि आरंभ 19 ऑक्टोबर 2026: सकाळी 10:52 मिनिट नंतर करा
नवमी तिथि का समाप्त 20 ऑक्टोबर 2026: दुपारी 12:50 मिनिट पर्यन्त समाप्ती होत आहे.
नवमी तिथि चे कन्या पूजन 19 ऑक्टोबर ला दुपारच्या आता करू शकता.

कन्या पूजनसाठी कीती वर्षा पर्यंतच्या कन्याना बोलवले पाहिजे:
शास्त्रों अनुसार, कन्या पूजनसाठी 2 ते 10 वर्ष पर्यंतच्या कन्याना बोलावले पाहिजे. ह्या वर्षाच्या कन्या म्हणजे माता दुर्गा चे स्वरूप मानले जाते. कन्याच्या बरोबर एक छोटा बालक म्हणजे मुलगा ज्याला भैरव बाबा म्हंटले जाते त्याची सुद्धा पूजा केली जाते. कन्या पूजनसाठी कन्या ना आदरपूर्वक आपल्या घरी येण्याचे आमंत्रण द्या. मग त्यांचे पाय साफ करून घ्या. कपाळाला रोलीचा तिलक लाऊन हातात कलवा बांधा. मग त्यांना लाल रंगाची चुनरी भेट म्हणून द्या. मग हलवा, पुरी व चणे चा भोग द्या. भोजन झाल्यावर आपल्या आयपती नुसार दक्षिणा, देवून त्यांचे पाय स्पर्श करून आशीर्वाद घ्या मग त्यांना विदा करा.
कन्या पुजनाचे काही विशिष्ट महत्व:
कन्या पूजनच्या दिवशी 9 पेक्षा जास्त मुलींना आमंत्रित करणे जास्त शुभ असते.
2 वर्षाच्या कन्याचे पूजन करणे जास्त शुभ मानले जाते. असे म्हणतात की त्यामुळे घरातील दरिद्र दूर होऊन सर्व बाधा पासून मुक्ती मिळते.
3 वर्षाच्या कन्या म्हणजे त्रिमूर्तिचे रूप मानले जाते. असे म्हणतात की 3 वर्षाच्या कन्याचे पूजन केल्यास घरात सुख समृद्धी येते.
असे म्हणतात की सुख समृद्धीसाठी 4 वर्षाच्या कन्याचे पूजन करणे खूप शुभ मानले जाते.
5 वर्षाच्या मुलीना रोहिणी असे म्हणतात त्याची पूजा केल्यास सर्व रोगा पासून मुक्ती मिळते.
6 वर्षाच्या मुलीना कालिकाचे रूप मानले जाते असे म्हणतात की त्यांची पूजा केल्यास सर्व कार्यामध्ये सफलता मिळते.
7 वर्षाच्या मुलीना चंडिका असे म्हणतात त्यांचे पूजन केल्यास घरात ध्यान दौलतची कधी सुद्धा कमतरता होत नाही.
8 वर्षाच्या मुलींना शांभवी असे म्हणतात असे म्हणतात की 8 वर्षाच्या मुलींची पूजा केल्यास सर्व कार्यामध्ये सफलता मिळते.
9 वर्षाच्या कन्याना माता दुर्गाचे रूप मानले जाते. त्यांचे पूजन केल्यास शत्रूवर विजय प्राप्त होतो.
10 वर्षाच्या कन्याचे पूजन केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.
