Kaal Bhairav Jayanti 2026 Date, Puja Muhurat, 5 Powerful Remedies for Rahu-Ketu Dosha
कालभैरव जयंती 2026 कधी आहे? 1 डिसेंबरला करा हे 5 उपाय, राहू-केतू दोष व जीवनातील संकटांपासून मिळेल मुक्ती!
धार्मिक मान्यता अनुसार कार्तिक मास कृष्ण पक्ष अष्टमी तिथी ह्या दिवशी काल भैरव प्रकट झाले हप्ते. म्हणूनच ह्या दिवशी काल भैरव जयंती ह्या रूपात साजरे करतात. आता आपण पाहू या काल भैरव जयंती तिथी. शुभ मुहूर्त व अजून काही महत्वाची माहिती.
हिन्दी पंचांग अनुसार, प्रतेक महिन्यात कृष्ण पक्ष अष्टमी तिथी ला कालाष्टमी व्रत केले जाते. पण कार्तिक मास कृष्ण पक्ष अष्टमी तिथी ही खूप महत्वाची आहे. कारणकी ह्या दिवशी काल भैरव प्रकट झाले होते. म्हणूनच ह्या दिवसाला काल भैरव जयंती ह्या नावानी समजले जाते. हिंदू धर्मा मध्ये भगवान काल भैरव ह्यांना भगवान शिव ह्यांचे उग्र व शक्तिशाली स्वरूप मानले जाते. ह्या दिवशी भगवान काल भैरव ह्यांची विधी पूर्वक पूजा करून त्याच बरोबर काळ्या कुत्र्याला भोजन देणे शुभ मानले जाते.
काल भैरव जयंती कधी आहे?
कार्तिक मास कृष्ण पक्ष अष्टमी तिथी आरंभ: 1 डिसेंबर रात्री 12:11 मिनिट पासून
कार्तिक मास कृश पक्ष अष्टमी तिथी समाप्त: 1 डिसेंबर रात्री 11:13 मिनिट
आपल्याला एक गोष्ट माहिती असेलच भगवान काल भैरव ह्यांचा जन्मोउत्सव रात्री निशात काल मध्ये पूजा करणे शुभ मानले जाते. म्हणून 1 डिसेंबर 2026 मंगळवार ह्या दिवस आहे.
काल भैरव जयंती 2026 शुभ मुहूर्त:
ब्रह्म मुहूर्त सकाळी 05:08 पासून 06:02 मिनिट पर्यन्त
अभिजीत मुहूर्त सकाळी 11:49 मिनिट ते दुपारी 12:31 मिनिट पर्यन्त
निशित मुहूर्त रात्री 11:43 मिनिट पासून 12:38 मिनिट पर्यन्त
काल भैरव जयंती धार्मिक महत्व:
धार्मिक मान्यता अनुसार, काल भैरवची पूजा केल्याने व्यक्तिच्या मनामधील भय दूर होते. त्याच बरोबर त्यांची आराधना केल्याने साहस व आत्मविश्वास मध्ये वृद्धी होते. काल भैरव ह्यांना वेळेचे अधिपति मानले जाते. त्यांची उपासना केल्याने व्यक्ति ला वेळेचे महत्व समजते. आपल्या कर्माच्या बाबतीत जागृत रहा, धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते त्याच बरोबर भगवान काल भैरव ह्यांचे दर्शन घेतल्याने जीवनातील अडचणी कमी होतात किंवा दूर होतात सर्व पापा पासून मुक्ती मिळून आध्यात्मिक कल्याणची प्रेरणा मिळते.

काल भैरव जयंती उपाय:
1. काळ्या कुत्र्याला भोजन द्या: काल भैरव ह्यांचे वाहन काळा कुत्रा आहे, ह्या दिवशी काळ्या कुत्र्याला भोजन द्या त्यामध्ये गोड रोटी देणे शुभ मानले जाते.
2. मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा: भगवान काल भैरव ह्यांच्या समोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा, त्यामुळे भय व नाकारात्मकता दूर होण्यास मदत होते.
3. काळे उडीदची डाळ अर्पित करा. काळ्या कापडात काळे उडीद बांधून भगवान काल भैरव ह्यांना अर्पित करा.
4. भोग व पठन करा: पूजा झाल्यावर गोड रोटी, नारळ, जिळेबीचा भोग अर्पित करा व भैरव चाळिसा किंवा भैरव अष्टक चे पठन करा.
5. राहू – केतू उपाय साठी मंत्र जाप करा:
ॐ काल भैरवाय नम: ह्या मंत्राचा 108 वेळा जाप करणे शुभ मानले जाते.
कुंडलीमधील राहू-केतू च्या परेशानी किंवा अडचणी असतील तर मंत्र जाप व दीपदान केले जाते.
