Karwa Chauth 2026: Puja Samagri, Shubh Muhurat & Complete Guide for First-Time Fasters
करवा चौथ 2026: पहिल्यांदा करवा चौथ व्रत करणार असालतर पूजा साहित्य व शुभ मुहूर्त संपूर्ण माहिती
करवा चौथ व्रत विवाहित महिलांसाठी खास आहे. ह्या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्य व सुख-समृद्धी साठी निर्जल व्रत ठेवतात. चला तर आपण पाहू या करवा चौथ ची संपूर्ण माहिती.
करवा चौथ व्रत विवाहित महिलांसाठी खूप खास मानले जाते. ह्या शुभ दिनी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्य, सुख-समृद्धी व खुशालीसाठी निर्जलव्रत ठेवतात. धार्मिक मान्यता अनुसार करवा चौथ व्रत विवाहित जीवनात सुख व सौभाग्य घेऊन येते. ह्या व्रतसाठी काही नियम आहेत त्यामुळे व्रत ठवण्याच्या अगोदर सर्व नियम समजून घेतले पाहिजेत. खास करून नवीन विवाह झालेल्या महिला पहिल्यांदाच करवा चौथ व्रत ठेवतात त्याच्यासाठी हा दिवस विशेष महत्वाचा आहे. नवीन विवाहित मुलींना ह्या व्रताची संपूर्ण माहिती नसते अश्या महिलांनी करवा चौथ व्रत विधीपूर्वक करणे शुभ मानले जाते. आता आपण पाहू या करवा चौथ व्रत साठी म्हणजेच पूजेसाठी काय काय साहित्य लागते.
करवा चौथ व्रत विवाहित महिलांसाठी खास आहे त्या आपल्या पतीसाठी दीर्घ आयुष्य व सुख समृद्धीसाठी निर्जल व्रत करतात. आता साहित्य काय लागते ते सांगत आहे.
करवा चौथ व्रत पूजा साहित्य:
धूप, अगरबत्ती, ताजी फुले व फुलाचा हार, मातीच्या कलश, दिवा, तूप, तेल व कापसाच्या वाती, माता पार्वती, भगवान शिव व भगवान गणेश ह्यांचा फोटो किंवा मूर्ती, पूजेची थाळी, पाणी भरून एक तांब्या, साफ पाणी व गंगाजल, रोली, कुंकू, हळद व अक्षता, मिठाई, फळ व प्रसाद,
पूजेसाठी वापरणात येणारे करवा व अजून काही साहित्य:
लाल ओढणी व पूजेसाठी अजून वस्त्र, चंद्राला अर्ध्य देण्यासाठी पाणी भरून अजून एक तांब्या किंवा भांडे, करवा चौथ कथा वाचण्यासाठि पुस्तक, पूजेला बसण्यासाठी आसन,
चंद्रची पूजा व व्रत पारणसाठी साहित्य:
व्रत सोडण्यासाठी पिण्याचे साफ पाणी, व्रत पारण करण्यासाठी फळ, पाणी भरून एक लोटा, नवीन चाळणी, चाळणीमध्ये ठेवण्यासाठी छोटा दिवा, रोली, अक्षता, फुले, चंद्राला अर्पित करण्यासाठी मिठाई, पूजा झाल्यावर प्रसाद ठेवण्यासाठी एक थाळी, पतीच्या आरती करण्यासाठी पूजा थाळी व दिवा, पूजा झाल्यावर लागणारी अजून काही भांडी.

करवा चौथ कधी आहे?
कार्तिक मास कृष्ण पक्ष चतुर्थी तिथीला करवा चौथ व्रत करायचे आहे. ही वर्षी चतुर्थी तिथी सुरुवात 29 ऑक्टोबर 2026 सकाळी 1:06 समाप्ती 29 ऑक्टोबर रात्री 10:09 मिनिट होणार. उदय तिथी अनुसार करवा चौथ व्रत 29 ऑक्टोबर 2026 गुरुवार रोजी करायचे आहे.
शुभ मुहूर्त:
करवा चौथ व्रत वेळ सकाळी 6:31 मिनिट पासून संध्याकाळी 8:17 मिनिट पर्यन्त आहे.
करवा चौथ पूजा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:38 मिनिट सुरू होत असून 6:56 मिनिट पर्यन्त आहे. ह्या मध्ये महिला माता करवाची पूजा करतात.
