Review in Marathi of Kahani Chutneychi

Kahani Chutneychi
Review in Marathi of Kahani Chutneychi

Kahani Chutneychi, written by Mrunal Tulpule is a Marathi Book, which contains a wide and diverse collection of Chutney Recipes. The collection includes 235 Chutney Recipes, not only from Maharashtra but also from other Indian States and other parts of the World.

This recipe book of Chutneys, which has been published by Sakal Publications can be very useful for cooks and chefs, especially new housewives.

Given below is the review of Kahani Chutneychi in the Marathi language, written by me, which has been published in Saptahik Sakal, dated 22/4/1017.

कहाणी चटणीची हे विविध चटण्यांचे पुस्तक मृणाल तुळपुळे ह्यांनी लिहिले आहे. मृणाल तुळपुळे ह्याचे ह्या आगोदर “माझी खाद्य भ्रमंती” हे पुस्तक लोकप्रिय झाले.

खरच चटणीहा पदार्थ आपल्या जेवणात आवर्जून बनवला जातो व त्यामुळे जेवण चवीस्टपण लागते. ताट वाढताना चटणी ही पाहिजेच असते. आपण कोणत्याही समारंभाला, लग्नाला, पार्टीला किंवा हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर चटणी ही प्रथम टेबलावर ठेवली जाते. आपल्या भारतात चटणी खूप लोकप्रिय आहे त्याच प्रमाणे भारता बाहेर सुद्धा चटणी लोकप्रिय आहे.

 Kahani Chutneychi
Review in Marathi of Kahani Chutneychi

कहाणी चटणीची ह्या पुस्तकात विविध प्रकारच्या २३५ चटण्या दिल्या आहेत. चटणी ह्या विषयावर मृणाल तुळपुळे ह्यांनी खूप बारकाईने विचार करून लिहिले आहे. आपण घरी वेगवेगळ्या चटण्या बनवतो पण त्यामागचा आपण एव्ह्डा विचार करत नाही. पण ह्या पुस्तकात प्रतेक गोष्टीचा विचार मांडला आहे. चटणी ह्या विषयावरील मनोगत, चटणीचा इतिहास तसेच त्या विषयावर मृणाल तुळपुळे त्त्यांचे अनुभव त्यानी अगदी सोप्या शब्दात खूप छान अगदी मुद्देसूद मांडले आहेत.

पूर्वीच्या काळी पाटा-वरवंटा दगडी खलबत्ता व लोखंडी खलबता वापरला जायचा त्यामुळे पदार्थाला विशीष्ट अशी चव यायची. मला एक ह्या मधील माहिती आवडली ती म्हणजे चटणी कशी वाटावी, त्याचे पोत कसे असावे, ती कशी ठेवावी व ती कशी सर्व्ह करावी.

चटण्याच्या प्रकारामध्ये हिरवी चटणी, लाल चटणी, पांढरी चटणी ही भारतात कोणत्या प्रांतात बनवली जाते, कोणत्या पदार्था बरोबर सर्व्ह केली जाते, त्याचा लाल-हिरवा रंग व त्याच्या स्वादामुळे चटणीची लज्जत कशी वाढते व त्याचे विविध प्रकार दिले आहेत.

वनौषधी वापरून म्हणजेच कोथबीर, पुदिना, कडीपत्ता, मिरची, आले, लसून वापरून केलेल्या चटण्या त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत, त्याच्या स्वादामुळे त्याची चव कशी बदलते हे छान थोडक्या शब्दात लिहिले आहे.

पावसाळ्यामध्ये नेहमी पोटाचा त्रास होतो त्यासाठी काही चटण्या आहेत की त्यामुळे आपल्या पोटाला कसा आराम मिळेल.

ठेचा व खर्डा बनवून त्याला फोडणी देऊन त्याला वाफ कशी आणावी हे सुद्धा सोप्या शब्दात लिहिले आहे.

आपल्याला तेलबिया माहिती आहेत. म्हणजेच तील, जवस, कारळे, शेगदाणे, सुके खोबरे वापरून बनवलेल्या सुक्या टिकाऊ चटण्या भाकरी बरोबर किंवा पोळी बरोबर खाल्या जातात. तसेच त्याच्या नैसर्गिक तेलामुळे त्याची चवपण चांगली लागते. हेपण थोडक्यात त्यानी समजावून सांगितले आहे.

आपल्या जेवणातील नेहमीच्या चटण्या कश्या बनवायच्या आहेत हे दिले आहे. तसेच परदेशातील चटण्याचे विविध प्रकारा विषयी व त्या बनवण्याची कृती ह्या पुस्तकात आहेत.

आपली सर्वांची आवडती अगदी लहान मुलांपासून मोठ्या परंत भेळ, शेवपुरी, चाट, इडली, डोसा, ढोकळा, बटाटेवडा इत्यादी चटपटीत, चवीस्ट व चहा नाश्त्याला खाणारे पदार्थ ह्या बरोबरच्या चटण्या आहेत.

एक विशेष गोष्ट म्हणजे नारळाचे दुध काढल्यावर राहिलेल्या खोबऱ्याच्या चोथ्याचे काय करायचे म्हणजे तो वाया जाणार नाही. तसेच चटणीचा उपयोग करून वेगवेगळ्या चवीच्या इडल्या कश्या बनवायच्या ह्या बद्दल फार उपयोगी व चांगली माहिती दिली आहे.

उपवासाच्या दिवशी आपण काही उपवासाचे पदार्थ बनवतो त्या सोबत कोणत्या चटण्या चांगल्या लागतील ह्या बाबत त्यांनी आपले मत मांडले आहे.

आपण नेहमी आंबट, गोड, तिखट, खारट चटण्या बनवतो पण कडू चटण्या बनवत नाही पण खर म्हणजे कडू पदार्थामुळे चव येते, त्यासाठी कारली व मेथी वापरून चटणी दिली आहे.

एक खूप जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपल्या आईच्या हाताच्या चटण्या किंवा काही नाविन्यपूर्ण पदार्थ बनवण्या बद्दल माहिती सुद्धा दिले आहे. वेगळ्या प्रकारच्या चटण्या किंवा भाज्या व फळे वापरून बनवलेल्या चटण्याची कृती व तसेच भारतात विविध प्रांतात बनवल्या जाणाऱ्या चटण्या त्याचे प्रमाण व कश्या बनवाव्यात हे पण दिले आहे. मोमोज ह्या परदेशी डीश बद्दल त्यानी काही विशीष्ट चटण्या दिल्या आहेत की ज्या मोमोज ह्या डीश बरोबर सूट होतात.

महिलांचा आवडतीचा विषय म्हणजे डाएट होय. त्याचा सुद्धा ह्या मध्ये उलेख करून नाविन्यपूर्ण चटण्या दिल्या आहेत.

एक गमतीची गोष्ट म्हणजे चटणी नावातल्या गमती जमती पण छान दिल्या आहेत.

मला एकंदरीत असे वाटते की कहाणी चटणीची ह्या पुस्तकात सगळ्या गोष्टींचा विचार केला आहे. महिलांना तसेच नवीन लग्न झालेल्या मुलीना किंवा नवीन स्वयंपाक शिकत असणाऱ्या मुला-मुलींना चटण्या बनवण्यासाठी ह्या पुस्तकाचा चांगला उपयोग होईल. तसेच पुस्तकाची मांडणी, विविध चित्रे व मुखपृष्ठ पण आकर्षक आहे व तसेच कुठे आलोचना करण्यासाठी त्यानी जागा ठेवलेली नाही.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.