मोक्षदा एकादशी व्रत कसे करावे, शुभ मुहूर्त, महत्व व सोपे उपाय केलेतर पापांपासून मिळेल मुक्ती
Mokshada Ekadashi 2025 Full Information And Upay In Marathi
वैदिक पंचांग नुसार मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्लपक्ष एकादशी तिथीला मोक्षदा एकादशी व्रत केले जाते. धार्मिक मान्यता अनुसार एकादशीचे व्रत विधीपूर्वक केल्यास व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी व शांती राहते. त्याच बरोबर शुभ फळ सुद्धा मिळते.
आता आपण पाहू या मोक्षदा एकादशीचे पारण कसे केले जाते.
वैदिक पंचांग अनुसार 1 डिसेंबर 2025 सोमवार ह्या दिवशी मोक्षदा एकादशी व्रत आहे. ह्या दिवशी भगवान विष्णु व माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा अर्चा केली जाते. ह्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळून श्रीहरीची कृपा प्राप्त होते.
मोक्षदा एकादशी शुभ मुहूर्त:
वैदिक पंचांग नुसार मोक्षदा एकादशी तिथी व्रत प्रारंभ 30 नोव्हेंबर रात्री 9:29 मिनिट पासून
मार्गशीर्ष महिना शुक्ल पक्ष एकादशी तिथी समाप्ती 1 डिसेंबर रात्री 7:01 मिनिट पर्यन्त
मोक्षदा एकादशी व्रत पारण म्हणजे उपवास समाप्ती 2 डिसेंबर सकाळी 6:51 ते 9:04 मिनिट पर्यन्त
मोक्षदा एकादशी व्रत पारण विधि:
द्वादशी तिथी म्हणजे दूसरा दिवस त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्य देवाला अर्ध द्या. मग भगवान विष्णु व माता लक्ष्मीची पूजा करा मंत्र जाप करा. आपल्या जीवनात सुख समृद्धी शांती मिळावी म्हणून प्रार्थना करा. मग सात्विक भोजनचा भोग दाखवून मग लोकाना प्रसाद देवून मग उपवास सोडा, नेवेद्याच्या ताटात तुळशीचे पान ठेवायला विसरू नका.
मोक्षदा एकादशीच्या दिवशी दान धर्म करा:
मोक्षदा एकादशीच्या दिवशी दान धर्म करणे खूप महत्वाचे आहे. ह्या दिवशी मंदिरमध्ये व गरीब लोकांना भोजन द्या, कपडे व धन दान केल्याने व्रत पूर्ण होऊन फळ प्राप्त होऊन सुख समृद्धी मिळते व आर्थिक संकट दूर होतात.
मोक्षदा एकादशी व गीता जयंती शुभ संयोग करा हे उपाय:
आपल्याला जर सुख प्राप्ती पाहिजे असेलतर 1 डिसेंबर ह्या दिवशी भगवान दामोदरना सिंदूर लाऊन ॐ गोविंदाय नम: किंवा ॐ वामनाय नम: ह्या मंत्राचा 11 वेळा जाप करा. असे केल्याने सुख प्राप्त होते.
आपल्याला धन प्राप्ती पाहिजे असेलतर 1 डिसेंबरला भगवान दामोदरना कमल गट्टे अप्रीत करून त्यांचे स्मरण करा. असे केल्याने धन वृद्धी होते.
1 डिसेंबर रोजी भगवान दामोदर ह्यांना तुळशी अर्पित करून ॐ माधवाय नम: किंवा ॐ नारायणाय नम: ह्या मंत्राचा जाप करा असे केलाने आपली शक्ति वाढते.

जर आपण परिवारीक समस्या पासून मुक्ती मिळण्यासाठी प्रयत्न करीत असाल तर भगवान दामोदर ह्यांना दही-साखर चा नेवेद्य दाखवा व त्यांचे स्मरण करा. असे केल्याने पारिवारीक समस्या सुटतील.
तुम्हाला जर प्रेमामध्ये सफलता पाहिजे असेलतर भगवान दामोदर ह्यांना रोली-अक्षताचा टिळा लावून ॐ पद्मनाभाय नम: किंवा ॐ हृषिकेषाय नमः ह्या मंत्राचा 5 वेळा जाप करा. असे केल्याने प्रेम संबंधामध्ये सफलता मिळेल.
आपणाला आपले व आपल्या परिवाराचे चांगले स्वास्थ पाहिजे असेलतर भगवान दामोदर ह्यांना हिरवे मुग अर्पित करा व भगवान दामोदर ह्यांचे स्मरण करा. असे केल्याने रोगा पासून मुक्ती मिळेल.
आपल्याला सर्व प्रकारची सुरक्षा पाहिजे असेलतर भगवान दामोदर ह्यांना लाल चंदन अर्पित करून त्यांचे स्मरण करा. असे केल्याने सर्व प्रकारची सुरक्षा मिळेल.
जर आपल्याला सौभाग्य प्राप्ती पाहिजे असेलतर भगवान दामोदर ह्यांना 2 हळकुंड अर्पित करा. व ॐ श्रीधराय नम: ह्या मंत्राचा जाप करा. असे केल्याने सौभाग्य प्राप्ती होईल.