21 March 2026 Chaitra Gangaur Puja Muhurt, Pujavidhi wa Mahatw In Marathi

Chaitra Gangaur Puja
21 March 2026 Chaitra Gangaur Puja Muhurt, Pujavidhi wa Mahatw

21 मार्च 2026 चैत्र गणगौर पूजा शुभ मुहूर्त, महत्व व पूजाविधी संपूर्ण माहिती

21 March 2026 Chaitra Gangaur Puja Muhurt, Pujavidhi wa Mahatw In Marathi

गणगौर पूजाचा पावन पर्व चैत्र शुक्ल पक्ष तृतीया तिथी म्हणजेच चैत्र नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. हा पर्व भगवान शिव व माता पार्वतीला समर्पित आहे. ह्या दिवसाला गौरी तृतीया ह्या नावानी सुद्धा संबोधले जाते.

गणगौर पूजाचा पर्व फक्त विवाहित स्त्रियाच नाहीतर अविवाहित कन्या सुद्धा ही पूजा करू शकतात. गणगौर ह्या दिवशी भगवान शिव व माता पार्वतीची पूजा केली जाते. हिंदू धर्ममध्ये गौरी पूजेचे खूप महत्व आहे. गौरी पूजेमध्ये महिला माता पार्वतीची पूजा अर्चा करतात. हा सण महाराष्ट्र मध्ये साजरा करतात. ह्या दिवशी माता पार्वतीला आव्हान केले जाते. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीया ह्या दिवशी चैत्र गौर बसवली जाते.

गणगौर पूजा कधी करायची:
गणगौर पूजा – 21 मार्च 2026, शनिवार
तृतीया तिथि प्रारम्भ – 21 मार्च 2026 02:30 AM वाजता
तृतीया तिथि समाप्त – 21 मार्च 2026 11:56 PM वाजता

गणगौर पूजा मुहूर्त 2026
शुभ – उत्तम – 07:55 AM पासून 09:26 AM
लाभ – उन्नति – 02:00 PM पासून 03:31 PM
अमृत – सर्वोत्तम – 03:31 PM पासून 05:02 PM
लाभ – उन्नति – 06:33 PM पासून 08:02 PM

गणगौर पूजा का महत्व (Gangaur Puja Ka Mahatva)
गणगौर पर्वाचे इष्ट देवता भगवान शिव व माता पार्वती आहे. असे म्हणतात की ज्या सुहागन महिला गणगौरचे व्रत व पूजा करून कहाणी आईकतात त्याना अखंड सौभाग्य प्राप्त होते. ह्या दिवशी महिला सोळा शृंगार करून पूजा करून संध्याकाळी कहाणी आईकतात व संध्याकाळी नदी किनारी वाळूची गणगौर बनवून तिला जल अर्पित करून दुसऱ्या दिवशी विसर्जन केली जाते. असे म्हणतात की जया जागी गणगौरची पूजा केली जाते ती जागा म्हणजे तिचे माहेर व जय जागी विसर्जन केले जाते ती जागा म्हणजे सासर असे मानले जाते. गणगौर ह्या दिवशी मैदा, आटा किंवा बेसन व हळदी नी बनवलेले दागिने अर्पित केले जातात. असे म्हणतात की स्त्रिया ह्या दिवशी जितके दागिने अर्पित करतात तिच्या दुपटीने अधिक त्या स्त्रियांना धन-वैभव प्राप्त होते.

चैत्र महिन्यात चैत्रगौरीची स्थापना कशी करावी सोपी पद्धत:
चैत्र महिन्यात शिवपत्नी पार्वती माता गौरी रूपात पूजन केले जाते.
शिवपत्नी पार्वतीची ही गौरी रूपात पूजली जाते. गौरीची स्थापना करण्यापूर्वी घराच्या अंगणात चैत्रांगण काढावे. गौरी महिनाभर माहेरी येते म्हणून या दरम्यान दररोज अंगणात चैत्रांगण काढलं जातं.

माता अन्नपूर्णा म्हणजेच पार्वती माता होय. तिच्या स्वागता साठी आपल्या घरासमोर अंगण झाडून सारवून त्यावर वैशिष्ट पूर्ण रांगोळी काढली जाते. त्यालाच चैत्रागण असे म्हणतात.

Chaitra Gangaur Puja
21 March 2026 Chaitra Gangaur Puja Muhurt, Pujavidhi wa Mahatw

चैत्रागण म्हणजे 51 प्रकारची शुभ चिन्ह असतात. जर आपल्याला ती काढणे शक्य नसेल तर बाजारात त्याचा साचा मिळतो त्याचा वापर करावा. त्यामध्ये आपल्या हिंदू संस्कृतिचे प्रतीक असते. अश्या प्रकारची रांगोळी काढली की अप्रतिम दिसते.
देवघरात अन्नपूर्ण मातेला स्वच्छ करून पाळण्यात बसवतात महिनाभर म्हणजेच वैशाख शुल्क तृतीया म्हणजेच अक्षयतृतीया पर्यन्त तिची पूजा अर्चा करतात. चित्र गौरची स्थापना केल्यावर तिच्या समोर शोभिवंत आरस करतात.

चैत्र महिन्यात देवीची स्थापना केल्यावर महिना भरात कोणत्या सुद्धा एका दिवशी सवाष्ण ला जेवायला बोलवावे. डाळकैरी व पन्हे द्यावे. तसेच ह्या महिन्यात जमेल तेव्हा एक दिवस आपल्या नातेवाईक किंवा सखी किंवा आजू बाजूला राहणाऱ्या महिलाना हळदी-कुंकू साठी बोलवावे. त्याना हळद-कुंकू लावून त्यांची भिजवलेल्या हरबरे व फळ ह्यांनी ओटी भरावी व त्याना प्रसाद म्हणून कैरीचे पन्हे, कैरी घालून वाटलेली हरभराडाळ द्यावी. व त्याना चांगले सुगंधी फूल द्यावे.

हे व्रत केल्याने आपल्याला सर्व कष्टा पासून मुक्ती मिळते व जीवनात सफलता मिळते. हे व्रत पूर्ण केल्यावर त्याचे उद्यापन करावे. त्याच्या मुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

 

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.