26 मार्च 2026 रामनवमी तिथी, पूजा मुहूर्त, व्रत विधी, धार्मिक महत्व, व्रत लाभ
26 March 2026 Ram Navami Tithi Puja Muhurat Vrat Vidhi Wa Dharmik Mahatwa In Marathi
राम नवमीच्या दिवशी भोग दाखवण्याचे महत्व, तुळशी पत्रचे महत्व, व्रत लाभ संतान प्राप्ती, विवाह योग, आर्थिक समस्या पासून मुक्ती, जीवनात सफलता, मनशांति
रामनवमी हिंदू लोकांचा एक अत्यंत पवित्र व महत्वपूर्ण पर्व आहे. ह्या दिवशी भगवान विष्णु ह्यांचे सातवे आवतार मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामह्यांचा जन्म उत्सव ह्या रूपात साजरा करतात. हा पर्व नकेवल धार्मिक आस्था चे प्रतीक आहे तर धर्म, सत्य. मर्यादा व न्यायाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा पण देते.
दरवर्षी रामनवमीचा हा सण चैत्र महिन्यात शुक्ल पक्ष नवमी तिथीला साजरा करतात. जो दिवस म्हणजे चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो. धार्मिक मान्यता अनुसार ह्या दिवशी अयोध्यामध्ये भगवान श्री राम ह्यांचा जन्म झाला होता.
रामनवमी 2026 तिथी:
26 मार्च 2026 गुरुवार ह्या दिवशी राम नवमी आहे.
नवमी तिथि प्रारंभ:
26 मार्च 2026 सकाळी 11:48 पासून
नवमी तिथि समाप्त:
27 मार्च 2026 सकाळी 10:06 पर्यन्त
उदय तिथी अनुसार 26 मार्च ह्या दिवशी राम नवमी आहे. म्हणून ह्या दिवशी व्रत व पूजा करणे खूप शुभ आहे.
रामनवमी 2026 पूजा शुभ मुहूर्त
शास्त्रा नुसार श्री राम ह्यांचा जन्म दुपारी झाला होता त्यामुळे ह्या वेळी पूजा करणे खूप शुभ आहे.
मध्याह्न (दुपारी) पूजा मुहूर्त:
सकली 11:13 पासून दुपारी 1:41 पर्यन्त
राम जन्म मध्याह्न क्षण:
दुपारी 12:27 वाजता
ह्या वेळी भगवान श्री राम ह्यांची पूजा करणे विशेष फलदायी आहे.
राम नवमी ह्या दिवशी का करायची दुपारी (मध्याह्न काल) पूजा?
हिंदू धर्म शास्त्र अनुसार भगवान श्री राम ह्यांचा जन्म चैत्र शुक्ल नवमी ह्या दिवशी दुपारी झाला होता. म्हणूनच दुपारी 12:27 मिनिटांनी रामनवमीला भगवान श्री राम ह्यांची पूजा करणे शुभ मानले जाते.
मध्याह्न काल म्हणजे दिवसाची ती वेळ जेव्हा सूर्य आपल्या सर्वोच्च बिंदु वर असतो व ही वेळ आध्यात्मिक ऊर्जाने भरलेली वेळ मानली जाते
मध्याह्न कालमध्ये पूजा केल्याने बरेच लाभ होतात:
भगवान श्री राम ह्यांची विशेष कृपा प्राप्त होते
घरात सकारात्मक ऊर्जाचा संचार होतो
मानसिक शांती व आत्मबळ वाढते
जीवनात सर्व कार्यामध्ये सफलता प्राप्त होते
म्हणूनच राम जन्मच्या दिवशी योग्य वेळी पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते
रामनवमीच्या दिवशी पूजेमध्ये तुळशी पत्रचे महत्व:
भगवान श्री राम ह्यांच्या पूजेमध्ये तुळशी पत्र अर्पित करणे विशेष शुभ मानले जाते
धार्मिक मान्यता अनुसार तुलसी माता भगवान विष्णु ह्यांची अत्यंत प्रिय आहे.
श्रीराम ही भगवान विष्णु ह्यांचे अवतार आहेत. म्हणूनच पूजेमध्ये तुळशी पत्र अर्पण केल्याने पूजा पूर्ण मानली जाते.
तुळशी पत्र अर्पित केल्याने पापंचा नाश होतो. घरात लक्ष्मीचा वास होतो. मानसिक तनाव दूर होतो. रोगान पासून सुरक्षा मिळते. राम नवमी ह्या दिवशी तुळशी पत्र अर्पित केल्याने अधिक पुण्य मिळते.
राम नवमीच्या दिवशी भोग दाखवण्याचे महत्व:
राम नवमीच्या दिवशी श्री राम ह्यांना नेवेद्य (भोग) दाखवणे अत्यंत आवश्यक मानले जाते.
विशेष रूपात अर्पित केले जाणारे भोग:
पंचामृत, खीर, फळ, सुका-मेवा, गुळाचे पदार्थ
पंचामृत बनवताना दूध, दही,तूप, मध, व साखर मिक्स करून बनवले जाते. ह्यामध्ये पाच तत्व असण्याचे प्रतीक मानले जाते.
असे म्हणतात की भगवान श्री राम ह्यांना अर्पित केलेल्या प्रसाद भक्तांच्या जीवनात सुख-समृद्धी आणतो.
रामनवमीचे व्रत ही फक्त धार्मिक परंपरा नाही तर आत्मशुद्धीचे माध्यम आहे. रामनवमी चे व्रत केल्याने शरीर व मन दोन्ही शुद्ध होते
आत्मसंयम ची भावना विकसित होते
नकारात्मक विचार समाप्त होतात
आध्यात्मिक ऊर्जा मध्ये वृद्धि होते

धार्मिक मान्यता अनुसार राम नवमीचे व्रत केल्याने संतान प्राप्तीचे योग येतात, विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात, आर्थिक समस्या पासून मुक्ती मिळते, जीवनात सफलताचे नवीन मार्ग मिळतात. राम नवमी च्या दिवशी राम भक्त फलाहार किंवा निर्जल व्रत करतात व दिवसभर श्री राम नाम जाप करतात.
रामायण पाठ व मंत्र जाप महत्व:
रामनवमीच्या दिवशी रामचरितमानस का पाठ, राम रक्षा स्तोत्र, सुंदरकांड, श्रीराम नाम जाप करणे अत्यंत शुभ मानले जाते
“ॐ श्री रामाय नमः” मंत्र चा 108 वेळा जाप करावा
मानशांति प्राप्त होते, भय समाप्त होते, जीवनात आत्मविश्वास वाढतो, ग्रह दोष शांत होतो. शास्त्रामध्ये असे म्हंटले आहे की राम नाम जाप केल्यास सर्व कष्टा पासून मुक्ती मिळते
रामनवमीचा आध्यात्मिक संदेश:
रामनवमी हा फक्त उत्सव नसून, भगवान श्री राम ह्यांच्या आदर्श जीवनाची प्रेरणाचा संदेश आहे.
भगवान श्रीराम आपल्या असे शिकवतात की सत्य मार्गवर चालावे, आई-वडिलांचा आदर करावा, धर्माचे पालन करावे, कठीण परिस्थितिमध्ये धैर्यने चालावे. राम नवमीचा पर्व म्हणजे बुराई पर अच्छाई की विजय असा संदेश देतो.
