2 एप्रिल 2026 हनुमान जयंती पूजाविधी, शुभ मुहूर्त, महत्व, वास्तु उपाय, कोणत्या वस्तु खरेदी करणे शुभ
Hanuman Jayanti 2026 Puja Vidhi, Mahatva, Vastu Upay In Marathi
2 एप्रिल 2026 गुरुवार हनुमान जयंती आहे. त्याच बरोबर पूर्णिमा तिथी सुद्धा आहे. हनुमानजी भगवान शिवचे अवतार व श्री राम ह्यांचे परम भक्त आहेत. हनुमान जयंती ह्या दिवशी स्नान, दिवा लावणे, हनुमान जिना लाडू भोग म्हणून दाखवणे, हनुमान चालीसाचे पठन करून मंत्र जाप करणे खूप शुभ मानले जाते.
हनुमान जयंती हिंदू धर्मा मधील एक मुख्य दिवस आहे. जो भगवान हनुमान ह्यांना समर्पित आहे. त्यांना चिरंजीव (अमर) मानले जाते. ह्याचा अर्थ ते आज पण पृथ्वीवर आहेत. हा दिवस हनुमान जीनचा जन्म दिवस म्हणून साजरा करतात. भगवान हनुमान ह्यांचा जन्म चैत्र महिन्यात शुक्ल पक्ष पूर्णिमा तिथीला झाला. त्यामुळे ह्यावर्षी 2 एप्रिल 2026 गुरुवार रोजी हनुमान जयंती आहे.
तिथि व वेळ:
पूर्णिमा तिथि प्रारंभ: 1 एप्रिल 2026, सकाळी 7:06 वाजता
पूर्णिमा तिथि समाप्त: 2 एप्रिल 2026, सकाळी 7:41 वाजता
हनुमान जयंती पूजा शुभ मुहूर्त:
2 एप्रिल 2026 गुरुवार सकाळी 6:10 मिनिट ते सकाळी 7:44 मिनिट पर्यन्त सर्वश्रेष्ठ मुहूर्त
संध्याकाळी 6:39 मिनिट ते 8:06 मिनिट पर्यन्त दूसरा पूजा मुहूर्त
हनुमान जयंतीचे महत्व:
हनुमान जयंती भगवान हनुमान ह्यांची पूजा करण्यासाठी खास दिवस आहे. ह्या दिवशी त्याचा जन्म माता अंजनी व वानरराज केसरी ह्यांच्या घरी झाला, म्हणून त्यांना अंजनी पुत्र व केसरी नंदन म्हणून संभोंदतात. त्यांना भगवान शिव ह्यांचा अवतार मानले जाते. त्यांचा जन्म भगवान श्रीराम ह्यांच्या सेवेसाठीच झाला होता ते जीवनभर भगवान श्रीराम ह्यांचे परमभक्त होते.
भगवान हनुमान वाईट शक्ति व नकरात्मक ऊर्जा दूर करणारे मानले जातात. त्यांच्या जवळ अष्ट सिद्धी व नव निधीचे वरदान आहे. जे भक्त मनोभावे श्रद्धा पूर्वक पूजा करतात त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात व सुख-समृद्धी प्राप्त होते.
हनुमान जयंती चैत्र पूर्णिमा तिथीला साजरी करायची आहे ह्या दिवशी हस्त नक्षत्र व चित्रा नक्षत्र आहे त्याचा बरोबर ध्रुव योग सुद्धा आहे.
पूजा विधि:
सकाळी लवकर उठून स्नान करून स्वछ कपडे परिधान करा. पूजेची जागा साफ करून एक लाकडी चौरंग ठेवून त्यावर हनुमान जीनची मूर्ती स्थापित करा. मग फोटो किंवा मूर्ती समोर तुपाचा दिवा किंवा चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा. हनुमान जिना बुंदी किंवा बुंदीचा लाडू भोग म्हणून दाखवा. मग हनुमान चालीसाचे पठन करा. हनुमान जीनच्या मंदिरात जाऊन लड्डू, चोला, चमेलीच्या तेलाचा दिवा, नारळ व बुद्धी अर्पित करा.
हनुमान जीनच्या मंत्राचा जाप, सुंदर कांड व श्रीराम नाम जाप करा.
हनुमानजीनचे प्रभावी मंत्र:
ॐ हं हनुमते नमः
ॐ अंजनये विद्महे वायुपुत्राय धीमहि, तन्नो हनुमंत प्रचोदयात्
हनुमान जयंतीच्या दिवशी करा सटीक उपाय:

आरोग्या संबंधित समस्या पासून मुक्ती मिळण्यासाठी:
हनुमान जयंतीच्या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करा मग हनुमानजिना सिंदूर, लाल फूल व मिठाई अर्पित करा. मग हनुमानजिच्या समोर हनुनाम बाहुक चे पठन करा. आपल्या स्वास्थ्यसाठी मनोभावे प्रार्थना करा.
आर्थिक लाभ व कर्ज मुक्तिसाठी:
हनुमान जयंती ह्यादिवशी हनुमान जीनच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा. हनुमानजिना गूळचा भोग दाखवावा, हनुमान चालीसा 11 वेळा पठन करावे मग कोणत्या सुद्धा गोड पदार्थाचे दान करावे.
हनुमान जयंतीच्या दिवशी कोणत्या वस्तु आणाव्यात:
1) शेंदूर:
भगवान हमुमान ह्यांना शेंदूर अत्यंत प्रिय आहे. धार्मिक मान्यता अनुसार शेंदूर हा भगवान हनुमानच्या प्रती प्रेम, भक्ति व समर्पणचे प्रतीक आहे. असे म्हणतात की भक्त शेंदूर अर्पित करतात तर त्यांना हनुमान जीनची विशेष कृपा मिळते.
हनुमान जयंतीच्या दिवशी घरात शेंदूर आणणे व हनुमान जिना अर्पित करणे खूप शुभ मानले जाते. हे फक्त पूजेचा भाग नसून सौभाग्य व सकारात्मक ऊर्जेचे आमंत्रण करण्याचा एक सोपा उपाय आहे.
असे केल्याने घरात सुख-समृद्धी येते, आर्थिक परेशानी दूर होऊन नकारात्मक ऊर्जा दूर होते.
2) वानराचे चित्र किंवा मूर्ति:
भगवान हनुमान ह्यांना वानराच्या रूपात दर्शविले जाते. जे त्यांच्या भक्ति, शक्ति व बुद्धीचे प्रतीक आहे. त्यांचे हे रूप साहस, निष्टा, व सेवा भावची भावना दर्शवतो. घरात वानररूपी हनुमानजीनचे चित्र, फोटो किंवा मूर्ती ठेवणे खूप शुभ मानले जाते. असे म्हणतात की त्यामुळे घरातिल नकारात्मक ऊर्जा दूर होते.
3) हनुमानजी ची गदा:
गदा भगवान हनुमान जीनची शक्ति, साहस व सुरक्षाचे प्रतीक मानले जाते. हे केवल अस्त्र नसून बुराई पर अच्छाई की जीत ह्याचे संकेत आहे. असे म्हणतात की जसे हनुमानजी आपली गदा वापरुन नकारात्मक शक्तिचा नाश करतात त्याच बरोबर घरात गदा ठेवल्याने घरात सुरक्षा व सकारात्मक ऊर्जा वाढते. हनुमान जयंतीच्या दिवशी घरात गदा आणून पूजा करणे खूप शुभ मानले जाते. पूजा झाल्यावर घरातील पूर्व दिशेला गदा ठेवावी कारणकी पूर्व दिशेला ऊर्जा व शुभताचे स्तोत्र मानले जाते. असे केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव, भीती, व अशांती हळू-हळू कमी होते.
4) तांब्याचा धातूचा छोटा तांब्या:
जर घरात वास्तु दोष किंवा वास्तुच्या संबंधित काही समस्या असतील तर हनुमान जयंतीच्या दिवशी तांब्याचा छोटा तांब्या घरात आणणे शुभ मानले जाते. ही केवळ वस्तु नसून घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून घरात सकारात्मक ऊर्जा संतुलित करण्याचे प्रतीक मानले जाते. असे म्हणतात की तांबे हा धातू स्वयं शुद्ध व ऊर्जा संतुलित करते. घरात तांब्याचा छोटा तांब्या आणून त्याची पूजा करावी त्यामुळे आसपासची नकारात्मक शक्ति कमी होण्यास मदत होते.
तांब्या साफ व पवित्र जागी ठेवावा असे केल्याने घरातील वातावरण हळू हळू शांत, सकारात्मक व संतुलित होते.
