Why Do We Hang Lemon and Green Chillies at the Door During Diwali? | Goddess Lakshmi & Alakshmi’s Mysterious Story
दिवाळीच्या पहिले दरवाजावर लिंबू-मिरची का लावायची? लक्ष्मी माताची मोठी बहीण अलक्ष्मीशी जोडली गेली आहे कथा
आता दिवाळी हा सण आरंभ झाला आहे. 8 नोव्हेंबर 2026 रविवार ह्या दिवशी लक्ष्मी पूजन आहे. लक्ष्मी पूजनच्या अगोदर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर लिंबू-मिरची लावायची ते का लावायचे ह्याचे धार्मिक महत्व आहे तसेच माता लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मीची कहाणी पुराणिक कथाशी जोडली गेलेली आहे. ह्याची माहिती आपण पहाणार आहोत.
दिवाळी हा सण व माता लक्ष्मीचे स्वागत हे घरात सुख-समृद्धी आणणारे पर्व आहे असे मानले जाते. ह्या दिवशी लोक आपल्या घराची साफ-सफाई करतात, मुख्य दरवाजावर फुलांच्या हार व रंगोली काढतात. मग संध्याकाळी विधी पूर्वक माता लक्ष्मी व भगवान गणेश ह्यांची पूजा करतात. तसेच घराच्या मुख्य दरवाजावर लिंबू-मिरची टांगन्याची परंपरा आहे ती परंपरा खूप सारे लोक पाळतात. आपण पाहिले सुद्धा असेल दिवाळीच्या अगोदर घराच्या मुख्य दरवाजावर व त्याच बरोबर दुकान किंवा ऑफिसच्या मुख्य दरवाजावर लिंबू-मिरची टांगतात.
आपल्याला माहिती आहे का दिवाळीतील ह्या परंपराचे महत्व काय आहे? हे खरे आहे का माता लक्ष्मीची पूजा पहिले दारिद्रताची देवी आंबट-तिखट सेवन करण्यासाठी येते का? चला आपण पाहू या ह्याचे धार्मिक मान्यता व लिंबू-मिरची टांगण्याचे कारण काय आहे.
दिवाळीच्या वेळी मुख्य दरवाजावर लिंबू-मिरची का टांगतात?
हिंदू धर्मामध्ये घराचा मुख्य दरवाजा महत्वपूर्ण मानला जातो. असे म्हणतात की ह्याच्या दरवाजातून सकारात्मक ऊर्जा व सुख-समृद्धी प्रवेश करते. म्हणून लोक मुख्य दरवाजा साफ करून त्याला शुभ वस्तु लाऊन सजवतात. लिंबू-मिरची टांगणे ही सुद्धा एक परंपरा ह्यामधील एक मानली जाते.

घराच्या मुख्य दरवाजावर लिंबू-मिरची टांगल्याने घराला वाईट नजर व नाकारात्मक शक्ति पासून बचाव होतो. दिवाळीच्या शुभ अवसरवर लोक विचार करतात की त्यांच्या घरात माता लक्ष्मीचा वास राहू दे व कोणती सुद्धा नकारात्मक प्रवेश करू नको दे. म्हणूनच मुख्य दरवाजावर लिंबू-मिरची तंगण्याची परंपरा पाळली जाते.
माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी शी जोडली गेली आहे:
धार्मिक मान्यतामध्ये माता लक्ष्मीची मोठी बहिणीचा उल्लेख मिळतो जिला अलक्ष्मी असे म्हणतात. त्यांना दरिद्रता व दुर्भाग्य चे प्रतीक मानले जाते. प्रचलित कथा अनुसार माता लक्ष्मीला गोड व मिठाई आवडते. व अलक्ष्मीला आंबट व तिखट स्वाद प्रिय आहे.
लिंबू-मिरचीशी जोडली गेली आहे ही कथा:
एक प्रचलित लोकमान्यता अनुसार दिवाळीची रात्र लक्ष्मी पूजनच्या पहिले अलक्ष्मी घराच्या आसपास येते. असे म्हणतात की घराच्या मुख्य दरवाजावर लिंबू-मिरची टांगल्याने अलक्ष्मी आंबट-तिखट स्वाद सेवन करते व घरात प्रवेश करीत नाही. म्हणूनच लोक दिवाळीच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजावर लिंबू-मिरची टांगतात, मग दारिद्रता घरा पासून दूर राहते व माता लक्ष्मीचे आगमन होते.
म्हणूनच आपल्या घराला अलक्ष्मीच्या वाईट नजर पासून वाचायचे असेलतर घराच्या मुख्य दरवाजावर लिंबू-मिरची टांगून ठेवा.
