19 मार्च 2026 चैत्र नवरात्री पासून सुरू, घटस्थापना मुहूर्त व धार्मिक महत्व
Chaitra Navratri 2026 Ghatasthapana, Muhurat Wa Dharmik Mahatva In Marathi
चैत्र महिना सुरू झालकी चैत्र नवरात्री सुरू होते. चैत्र नवरात्री 9 दिवसांची असून अष्टमी किंवा नवमी ह्या तिथीला कन्या पूजन केले जाते. धार्मिक मान्यता अनुसार, नवरात्री च्या वेळी माता दुर्गाचे पृथ्वीवर आगमन होते. चला तर मग आपण पाहू या चैत्र नवरात्रीची संपूर्ण माहिती.
वैदिक पंचांग नुसार 4 मार्च 2026 बुधवार ह्या दिवशी चैत्र महिन्याची सुरुवात होते. सनातन धर्मामध्ये चैत्र महिन्याचे विशेष महत्व आहे चैत्र महिन्यात शुक्ल पक्ष प्रतिपदा ह्या तिथीला चैत्र नवरात्रीची सुरुवात होते. ह्या मध्ये माता दुर्गाची विशेष पूजा अर्चा केली जाते. त्याच बरोबर सुख-शांती च्या प्राप्तीसाठी व्रत केले जाते.
चैत्र नवरात्रीला माता राणीची कृपा मिळण्यासाठी मनोभावे व्रत व पूजा अर्चा करावी. ह्या वर्षी माता राणी डोली मध्ये बसून आगमन करीत आहे. ह्यावर्षी सुख-समृद्धी घेऊन येत आहे.
धार्मिक मान्यता अनुसार चैत्र नवरात्री मध्ये माता दुर्गाची आराधना केल्याने जीवनातील संकट दूर होऊन शुभ फळ मिळतात.
चैत्र नवरात्र शुभ मुहूर्त:
वैदिक पंचांग अनुसार, चित्र महिना 19 मार्च पासून सुरू होत असून 27 मार्च ह्यादिवशी समाप्ती होत आहे.
चैत्र नवरात्र 2026 कलश स्थापन मुहूर्त:
चैत्र महिन्यात चैत्र नवरात्रीला पहिल्या दिवशी विधीपूर्वक कलश स्थापना केली जाते. ह्या वर्षी 19 मार्च 2026 गुरुवार रोजी स्थापना करायची आहे.
घटस्थापना मुहूर्त – 06 वाजून 52 मिनट पासून 07 वाजून 46 मिनट
घटस्थापना अभिजित मुहूर्त – 12 वाजून 04 मिनट ते 12 वाजून 52 मिनट
शुभ मुहूर्त:
ब्रह्म मुहूर्त – सकाळी 04 वाजून 51 मिनट ते 05 वाजून 59 मिनट पर्यन्त
अभिजीत मुहूर्त- दुपारी 12 वाजून 05 मिनट ते दुपारी 12 वाजून 53 मिनट पर्यन्त
विजय मुहूर्त – दुपारी 02 वाजून 30 मिनट ते 03 वाजून 18 मिनट पर्यन्त
गोधूलि मुहूर्त – संध्याकाळी 06 वाजून 29 मिनट ते 06 वाजून 53 मिनट पर्यन्त

चैत्र नवरात्र धार्मिक महत्व:
चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हिंदू धर्माच्या नवीन वर्षांची सुरुवात होते. धार्मिक मान्यता अनुसार ह्या दिवशी भगवान ब्रह्मा ह्यांनी सृष्टिची रचना सुरू केली होती. चैत्र नवरात्री मध्ये माता दुर्गाची विशेष पूजा अर्चा केली जाते. त्याच बरोबर विधीपूर्वक व्रत सुद्धा केले जाते. असे म्हणतात की नवरात्रीचे व्रत केल्याने नकारात्मकता पासून मुक्ती मिळून माता दुर्गाचे घरात आगमन होते. चैत्र नवरात्रीच्या तिथीला प्रभू रामचंद्र ह्यांचा जन्म झाला होता. त्यामुळेच चैत्र नवरात्रीची महत्व अधिक वाढते. चैत्र नवरात्रीच्या अष्टमी व नवमी तिथीला कन्या पूजन केले जाते.
