गुरुपूर्णिमा 2026: अजूनही वेळ गेलीनाही 5 दिवस स्वामींची सेवा करून आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील
Guru Purnima 2026: 5-Day Shree Swami Samarth Seva for Wish Fulfillment
29 जुलै 2026,बुधवार ह्या दिवशी गुरु पूर्णिमा आहे. आपण आपल्या गुरूंसाठी म्हणजेच श्री स्वामी समर्थ ह्यांच्यासाठी 5 दिवसाची सेवा (25 जुलै 2026 ते 29 जुलै 2026) कशी करायची ते ह्या अगोदर पाहिले. 5 दिवसांची सेवा करताना रोज सकाळी किंवा संध्याकाळी 1 ते 21 श्री स्वामी समर्थ ह्यांचे श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन करायचे किंवा 1 माळ किंवा 11 माळा श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जाप करायचा किंवा तारक मंत्राचा 11 वेळा रोज जाप करायचा ह्याची संपूर्ण माहिती पाहिली.
स्वामी असे म्हणत नाहीत की तुम्ही तुमचे कर्तव्य सोडून दिवसभर माझी सेवा करा. स्वामी आपल्या सर्व अडचणी समजून घेतात. त्यांना आपल्या जिवना विषयी सर्व माहिती आहे, आपल्याला जीवनात काय काय अडचणी आहेत किंवा पुढे सुद्धा काय अडचणी येणार आहेत. पण गोष्ट लाक्षात ठेवा आपण गुरु मानून त्यांची सेवा केली तर आपल्या मनाला खूप शांती मिळते. त्या सेवेचे खूप लाभ सुद्धा आहेत. कोणते लाभ आहेत ते सुद्धा आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत.
आपण फक्त रोज सकाळी किंवा संध्याकाळी पुढे दिलेली सेवा मनोभावे करा. आपण संपूर्ण दिवस भरात 10 मिनिट वेळ तर काढू शकताच. आपण 25 जुलै पासून 29 जुलै 2026 पर्यन्त फक्त 10 मिनिट वेळ काढून ही प्रभावी सेवा करायची आहे.
25 जुलै रोजी श्री स्वामी समर्थ ह्यांचा मठात जाऊन एक संकल्प करा की मी रोज थोडा वेळ मनोभावे सेवा करीत आहे व आपली मनोकामना स्वामिना सांगा.
स्वामींच्या माठात जाताना एक नारळ, फूल व खडीसाखर बरोबर घेऊन जा व स्वामीच्या मूर्ती किंवा प्रतिमा समोर बसून त्यांच्या समोर नारळ, फूल व खडीसाखर ठेवून प्रार्थना करा व संकल्प करा की मी 25 जुलै ते 29 जुलै रोज काही वेळ आपली सेवा करणार आहे. आपली मनोकामना लवकरच पूर्ण होईल स्वामी आपल्या भक्तांना कधी सुद्धा निराश करीत नाहीत. ते नेहमी भक्ताच्या अडी-अडचणीला धाऊन येतात.
आपण श्री स्वामी समर्थ ह्यांची सेवा तीन प्रकारे करू शकता:
पहिली सेवा: श्री स्वामी समर्थ ह्यांची सेवा करताना आपण श्री स्वामी समर्थ ह्यांचे श्री स्वामी चरित्र सारामृत 1 ते 21 अध्याय पठन करायचे आहे. ही सेवा अत्यंत प्रभावी सेवा आहे. आपण रोज श्री स्वामी चरित्र सारामृत चे 21 अध्याय पठन करायचे आहेत. मग आपण ही सेवा सकाळी लवकर उठून स्नान करून करू शकता किंवा संध्याकाळी देवे लागणीच्या वेळी सुद्धा करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा दुपारी 12 ते 12:30 ह्या वेळेत सेवा करू नये तसेच आपले जेवण करून लगेच सेवा करायला बसू नये. आपण रोज 21 अध्याय पठन केले की आपले एक पारायण झाले असे आपल्याला 5 दिवस पठन करायचे आहे. म्हणजे आपले 5 पारायण करायची आहेत.
जर आपल्याला एकाच बैठकीत 21 अध्याय पठन करणे शक्य नसेल म्हणजे घरात लहान मुले, आजारी माणसे असतील तर एका बैठकीत करणे शक्य नसते तर आपण 5 दिवस रोज 4+4+4+4+5 असे अध्याय दिवस भरात पठन करू शकता म्हणजे आपले एक पारायण पूर्ण होईल.
आपन नोकरी करीत असाल किंवा व्यवसाय करीत असला किंवा अजून काही कारणांनी आपल्याला दिवस भरात घरी सेवा करणे शक्य नसेलतर आपण ऑफिस मध्ये किंवा कामाच्या ठिकाणी वेळ मिळेल तेव्हा सेवा करू शकता पण प्रवास करताना सेवा करू नये फक्त शांत व एकाग्र वातावरणात सेवा करावी.
दुसरी सेवा:
आपण श्री स्वामी समर्थ ह्यांची सेवा करताना “श्री स्वामी समर्थ” ह्या मंत्राचा पाहिजे तितका रोज 5 दिवस जाप करू शकता, किंवा प्रभावी तारक मंत्राचा सुद्धा रोज पाहिजे तितका जाप करू शकता आपली जशी इछा असेल तशी आपण सेवा करू शकता. आपल्याला 5 दिवसांची सेवा करताना रोज 11 माळ “श्री स्वामी समर्थ” ह्या प्रभावी मंत्राचा जाप करायचा आहे
तिसरी सेवा:
आपण रोज तारक मंत्र म्हणू शकता. आपण 5 दिवस तारक मंत्राचे पाहिजे तेव्हडा जाप करू शकता.
श्री स्वामी समर्थ ह्या प्रभावी मंत्राचा जाप करताना किंवा तारक मंत्राचा जाप करताना एका ग्लासमध्ये पाणी भरून ठेवा मग मंत्र जाप सुरू करा. मंत्र जाप झाल्यावर ते पवित्र पाणी घरातील व्यक्तिना तीर्थ महणून द्या किंवा घरातील पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स करा त्यामुळेमानसिक शांती व सकारात्मकता चांगला अनुभव येतो.
आपल्याला जेवहडी जास्त सेवा करणे शक्य आहे तेवहडी आपण सेवा करायची आहे. सेवा करताना फक्त एक नियम अगदी काटाक्षाने पाळाव्याचा आहे. तो नियम म्हणजे मांसाहार टाळायचा आहे. बाकी काही विशेष नियम नाहीत.
आपण मनापासून स्वामींची सेवा केली तर स्वामी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतील.

सेवा सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला एक संकल्प करायचा आहे. आपण संकल्प स्वामींच्या माठात जाऊन करू शकता किंवा घरीच स्वामीच्या समोर बसून सुद्धा संकल्प करू शकता. संकल्प करताना एक श्रीफळ म्हणजेच नारळ व थोडी खडीसाखर स्वामीच्या समोर ठेवून संकल्प करून मगच सेवा सुरू करायची आहे.
आता आपण पाहू या संकल्प कसा करायचा.
सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून स्वामींच्या फोटो किंवा मूर्ती समोर आसन घालून बसावे व स्वतः ला गंध लाऊन घ्यावे. एका तांब्यात पाणी घ्यावे व ताम्हण व पळी घ्यावी. मग हातात पळीने पाणी घेऊन आपल्या मनातील मनोकामना मनातल्या मनात बोलून म्हणजेच स्वामींना सांगून आपण ही सेवा मनोकामना पूर्ण होण्यासाठी किती दिवस करीत आहोत ते सांगावे. मग हातातील पाणी ताम्हणात सोडावे.
आपल्याला श्री स्वामी समर्थ ह्यांची सेवा करायची असेलतर सोपे काही नियम पाळायचे आहेत.
* आपण ही सेवा सकाळी किंवा दिवस भरामद्धे कधी सुद्धा करू शकता. पण आपण रोज शक्यतो रोज नियमित त्याच वेळेला सेवा करावी. जर सकाळी स्नान झाल्यावर करणार असालतर रोज सकाळीच करा, किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी करणार असाल तर संध्याकाळी करा, रोज वेळत बदल करू नका.
* सेवा करताना स्वामींच्या फोटो किंवा मूर्ती समोर बसून दिवा व आगरबती लाऊन आसन घालून बसावे. आपले आसन कोणाला सुद्धा वापरायला देवू नये.
* सेवा सुरू केली की मांसाहार करू नये. पण आपल्या घरातील व्यक्तिना पाहिजे असेलतर बनवून द्यावा पण स्वतः सेवन करू नये. आपली सेवा पूर्ण करून मगच बनवावा.
* सेवा करताना मासिक पाळी आली तर 4 दिवस सेवा करू नये जर घरातील व्यक्ति वाचन करू शकत असतील तर त्यांना वाचन करू द्यावे म्हणजे आपल्या सेवे मध्ये खंड पडणार नाही. जर सूतक असेलतर तेवहडे दिवस सेवा करू नये. आपण जर बाहेर गावी जाणार असालतर आपण बाहेर सुद्धा वाचन करू शकता.
* सेवा करताना शुद्ध विचार ठेवावे, कोणची सुद्धा निंदा करू नये. घरातील वातावरण आनंदी ठेवावे त्यामुळे घरात सकारात्मकता येते.
श्री स्वामी समर्थ ह्यांचे नामस्मरण करण्याचे महत्व किंवा लाभ:
प्रारब्धाची तीव्रता कमी होते.
मन शांत व आनंदी राहते.
सेवा केल्याचे समाधान मिळते
आपली वास्तु शुद्ध होते व वास्तु दोष असेलतर निघून जातो
प्रारब्धा भोगण्याची क्षमता वाढते
घरात सात्विकता वाढते व घरातील वातावरण चांगले राहते
संसारीक अडचणी कमी होतात किंवा दूर होतात
घरातील व्यक्तिमद्धे प्रेमभाव निर्माण होतो
घरात भगवंताचा वास राहतो.
काळजी मिटून भीती जाते
संकटाला सामोरे जाण्याच्या शक्ति मिळते
आपण स्वभाव बदलत जातो व सकारात्मकता येते
आपल्या सदगुणांत जलद गती येवून वृद्धी होते
साकक्षांत सद्गुरूनचा हात आपल्या मस्तकी असतो.
