Do These 6 Simple Remedies on Shravan Thursdays | Financial Problems Will Be Removed and Prosperity Will Increase! | Shravan Guruvar Upay
श्रावण महिन्यातील गुरुवारी करा सोपे उपाय, धन संबंधित परेशानी होतील दूर
धार्मिक मान्यता अनुसार भगवान शिव ह्यांची पूजा अर्चा केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व परेशानी दूर होतील. त्याच बरोबर घरात सुख-समृद्धी येते. श्रावण महिन्यात शिव भक्त भगवान शिव ह्यांची मनोभावे पूजा अर्चा करतात व सोमवारचे व्रत करतात.
आपल्याला माहिती असेलच गुरु ग्रह आपले भाग्य देवता आहेत. गुरुवार हा दिवस धनसंपदा च्या दृष्टीने खूप शुभदायक आहे. श्रावणच्या पवित्र महिन्यात गुरुवारी भगवान महादेव ह्यांची आराधना करा त्यामुळे गुरुग्रह वैवाहिक जीवन व भाग्य कारक ग्रह मानला जातो. सर्व ग्रहांमध्ये गुरु ग्रह हा सर्वात श्रेष्ठ ग्रह मानला जातो व ते सर्व देवतांचे गुरु सुद्धा मानले जातात.
भगवान शिव ह्यांना श्रावण महिना अतिप्रिय आहे. ह्या महिन्यात भगवान शिव माता पार्वती कनखल मध्ये निवास करतात. असे म्हणतात की श्रावण महिन्यात भगवान शिव प्रथम आपल्या सासरी कनखलमध्ये राहतात. तेव्हा देवांचे देव महादेव ह्यांची विशेष पूजा केली जाते. शिव पुराण मध्ये वर्णीत भगवान शिव अगदी भोळे आहेत. भगवान शिव आपल्या भक्ताच्या भक्तीवर खुश होऊन त्याला मनासारखे फळ प्रदान करतात. म्हणून साधक श्रावण महिन्यात भगवान शिव ह्यांची विशेष पूजा अर्चा करून काही सोपे विशेष उपाय सुद्धा करतात. आपण सुद्धा धन संबंधित परेशानी मध्ये आहात तर श्रावण महिन्यात गुरुवारी पूजा करताना काही लक्ष्मी प्राप्तीचे उपाय जरूर करा.
श्रावण गुरुवारी करा धन प्राप्तीचे उपाय:
1. आपल्याला जर धनप्राप्ती परेशानी पासून मुक्ती पाहिजे असेलतर श्रावण महिन्यातील गुरुवारी स्नान झाल्यावर भगवान शिव ह्यांची विधीपूर्वक पूजा अर्चा करा. पूजा करताना कचे दूध घेऊन त्यामध्ये केसर मिक्स करून भगवान शिव ह्यांना अभिषेक घाला, असे केल्याने कुंडली मधील गुरुग्रह मजबूत बनतो व धन संबंधित समस्या दूर होतात.
2. आपण भगवान विष्णु ह्यांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेलतर श्रावण गुरुवारी पूजा करताना भगवान शिव ह्यांना एकाक्षी नारळ अर्पित करा. हा उपाय केल्याने लक्ष्मी नारायण प्रसन्न होऊन महादेव भगवान ह्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
3. आपण जर आर्थिक तंगी पासून मुक्त व्हायचे ठरवत असालतर श्रावण गुरुवारी ऊसाच्या रसानी भगवान शिव ह्यांना अभिषेक घाला. हा उपाय केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
4. आपल्याला वैवाहिक जीवनात प्रसन्नता पाहिजे असेलतर श्रावण गुरुवारी पूजा करताना देवी माता पार्वतील सिंदूर अर्पित करून देवांचे देव महादेव ह्यांना पांढरे वस्त्र अर्पित करा. हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनातील संबंध सुधारतात.
5. कुंडलीमधील गुरु मजबूत करण्यासाठी श्रावण गुरुवारी पूजा झाल्यावर पिकलेली केळी, चनाडाळ, पिकलेली पोपई, बेसन, पिवळे वस्त्र ह्या वस्तूंचे दान करा. त्याच बरोबर विवाहित महिलेला हिरव्या बांगड्या दान करा.
6. श्रावण महिन्यात गुरुवारी भगवान विष्णु, देवगुरु बृहस्पति व भगवान शिव ह्यांची पूजा केली जाते. ह्या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करा, केळीच्या वृक्षाची पूजा करा व चनाडाळ व गूळ अर्पित करा. त्याच बरोबर ‘ॐ बृं बृहस्पतये नमः’ ह्या मंत्राचा 108 वेळा जाप करा.

श्रावण महिन्यात गुरुवारी पूजा करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा.
गुरुवारी सूर्योदयच्या अगोदर उठून स्नान करा. मग भगवान विष्णु हा तुपाचा दिवा लावा मग विष्णु सहस्त्रचे पठन करा.
गुरुवारी शिव मंदिरमध्ये जाऊन भगवान भोळेनाथची पूजा करा, गुरुवारी संध्याकाळी केल्याच्या रोपाजवळ दिवा जरूर लावा व पूजा करा.
गुरुवारी पूजा झाल्यावर केसर व चंदनचा तिलक जरूर लावावा. जर केसर नसेलतर हळदीचा उपयोग करा.
गुरुवारी गुरुशी जोडले गेलेले पिवळी वस्तु, जसे की सोने, हळद, चनाडाळ दान करा.
गुरुवारी आपल्या वडीलधारे आई-वडील ह्याचा आशीर्वाद घ्या त्यामुळे आपले भाग्य प्रबळ होते व धन संपत्तिमध्ये वृद्धी होते.
गुरुवारी संध्याकाळी गरीब मुलांना केळी दान करा. त्यामुळे जीवनातील परेशानी व आर्थिक तंगी दूर होईल.
