पुत्रदा एकादशी पूजा मुहूर्त,महत्व, पुत्रदा एकादशी फक्त मुलासाठी नाहीतर मुलीसाठी खूप महत्वाची
Putrada Ekadashi 2026: Puja Muhurat, Vrat Vidhi & Importance | 23 August 2026 | Not Just for Sons!
श्रावण पुत्रदा एकादशी भगवान विष्णु ह्यांना समर्पित असून महत्वपूर्ण व्रता पैकी एक व्रत आहे. ह्या दिवशी विधी पूर्वक पूजा व व्रत केल्याने सुख-समृद्धी व संतान सुख प्राप्त होते. चला तर मग पाहू या पुत्रदा एकादशीची तारीख, पूजा शुभ मुहूर्त व धार्मिक महत्व काय आहे तसेच पुत्रदा एकादशी फक्त मुलासाठी नाहीतर मुलीच्यासाठी सुद्धा खूप महत्वाची आहे.
श्रावण मास मधील शुक्ल पक्ष एकादशीला श्रावण पुत्रदा एकादशी किंवा पवित्र एकादशी ह्या नावांनी ओळखली जाते. हिंदू धर्मामध्ये ह्या एकादशीचे विशेष धार्मिक महत्व आहे मान्यता अनुसार ह्या दिवशी व्रत ठेवल्याने व भगवान विष्णुची विधी पूर्वक पूजा केल्याने संतान सुख, संतानचे उत्तम आरोग्य व परिवारातील सुख-समृद्धीची कामना पूर्ण होते.
23 ऑगस्ट 2026 रविवार ह्या दिवशी श्रावण पुत्रदा एकादशी व्रत करायचे आहे. ह्या पवित्र तिथीवर श्रद्धेने व नियमपूर्वक व्रत पूजन केल्याने भगवान श्रीहरी विष्णु ह्यांची कृपा प्राप्त होते. त्याच बरोबर परिवारात सुख-शांती राहते व मनाला सकारात्मक ऊर्जा मिळते.
पुत्रदा एकादशी फक्त पुत्र प्राप्तीसाठी आहे, जर पुत्रि म्हणजेच मुलगी पाहिजे असेलतर काय करावे?
पुत्रदा एकादशी खास करून संतान सुख शी जोडली गेलेली आहे. पण पुत्रदा एकादशी ह्या नावात पुत्र ह्या शब्दाचा उल्लेख आहे पण जर ज्यांना मुलीची आवड आहे त्यांनी हे व्रत करावे का? ह्याची माहिती आपण जाणून घेवू या.
एकादशी तिथि व विष्णु पूजा शुभ मुहूर्त:
पंचांग अनुसार श्रावण पुत्रदा एकादशी 23 ऑगस्ट 2026 रविवार ह्या दिवशी साजरी करायची आहे.
एकादशी तिथी 23 ऑगस्ट 2026 रात्री 2 वाजता प्रारंभ
एकादशी तिथी 24 ऑगस्ट 2026 सकाळी 4:18 वाजता समाप्ती
एकादशी पारण वेळ: २४ ऑगस्ट रोजी सकाळी १०:४९ वाजता हरि वसरा संपल्यानंतर, दुपारी 1:41 मिनिट ते 4:16 मिनिट ही पराणाची वेळ आहे.
एकादशी तिथीला भगवान विष्णु ह्यांच्या पूजेची वेळ सकाळी 7:32 मिनिट ते दुपारी 12:24 मिनिट पर्यन्त आहे. भक्त ह्या वेळेत स्नान करून विधी पूर्वक पूजा अर्चा करू शकतात. धार्मिक मान्यता अनुसार ह्या दिवशी श्रद्धा पूर्वक श्री हरी स्मरण व पूजा केल्याने मनाला शांती मिळते व परिवारात सकारात्मक वातावरण राहते.
श्रावण पुत्रदा एकादशी धार्मिक महत्व:
श्रावण पुत्रदा एकादशीही संतान सुख व परिववारातील खुशाली साठी विशेष फलदायी मानली जाते. पौराणिक मान्यता अनुसार पद्म पुराण मध्ये ह्या एकादशी शी जुडली गेलेली कथा मिळते. असे म्हणतात की प्रचिन काळी राजा महीजित व राजा सुकेतुमान ह्यांनी ऋषि मुनींचे मत लक्षात घेऊन ह्या व्रताचे पालन केले होते. भगवान विष्णु ह्यांची भक्ति व एकादशी व्रत केल्याने त्यांना योग्य व यशस्वी संतान सुख प्राप्त झाले होते. धार्मिक मान्यता अनुसार एकादशी व्रत केल्याने संतानची प्रगती, सुख-समृद्धी व चांगले आरोग्यची कामना पूर्ण होते. त्याच बरोबर भगवान श्रीहरी विष्णु व माता लक्ष्मीची कृपा मिळाल्याने घर परिवारात सुख-शांती राहते. असे म्हणतात की ह्या दिवशी श्रद्धा व नियमित व्रत पालन केल्याने व्यक्तीच्या जीवनातील पूर्वीच्या कर्माचा नकारात्मक प्रभाव पासून मुक्ती मिळते व जीवनातील परेशानी कमी होतात.
पुत्रदा एकादशी व्रत पूजा विधि:
सकाळी लवकर उठून स्नान करून स्वछ कपडे परिधान करून व्रत संकल्प करा.
घरातील पूजा घर साफ करून एका चौरंगावर भगवान विष्णु ह्यांची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करा.
भगवान विष्णु ह्यांच्या समोर दिवा लाऊन अगरबत्ती लावा मग फुले अर्पित करून फळे ठेवा.
पूजेमध्ये रोली, कुंकू, नेवेद्य बरोबर श्रद्धेने पूजा साहित्य ठेवा.
भगवान विष्णु ह्यांना तुलसी पत्र जरूर अर्पित करा. करणकी विष्णु पूजेमध्ये तुळशीचे विशेष महव आहे.
त्यानंतर पुत्रदा एकादशीची व्रत कथा वाचन करा किंवा आइका मग भगवान विष्णु मंत्र जाप करा.
मग शेवटी भगवान विष्णु ह्यांची आरती म्हणून परिवाराच्या सुख-समृद्धी व संतान कल्याणासाठी प्रार्थना करा.
आता आपण पाहू या पुत्रदा एकादशी फक्त मुलाच्या प्राप्तीसाठी आहे का?
पुत्रदा एकादशीची धार्मिक कथा राजा सुकेतुमान व त्यांची पत्नी ह्यांच्याशी जोडली गेलेली आहे. जे संतान नाही म्हणून चिंतित होते. पद्म पुराण मध्ये ही एकादशी संतान प्राप्तीशी जोडली गेलेली आहे. ह्या कथेमध्ये राजाची मनोकामना ही पुत्र प्राप्तीसाठी होती व राजाला फळ्स्वरूप तेजस्वी पुत्राची प्राप्ती होते. म्हणूनच पारंपारिक रूप पुत्रदा एकादशीला पुत्र प्राप्ती कामनाशी जोडले गेलेले आहे. म्हणूनच ह्या संदर्भात फक्त मुलगा पाहिजे ह्याच्या पर्यन्त ही सीमित राहिली नाहीतर संतान सुख ची कामना ठेवणारे जोडपे भगवान विष्णु ह्यांची श्रद्धा पूर्वक आराधना करू शकतात.
मुलीची आस ठेवणारे दंपतीनी काय करावे?
मुलीची आस ठेवणारे दंपती एकादशी व्रत ठेवून भगवान विष्णु ह्यांची पूजा करून स्वस्थ, संस्कारि व सुखी संतान मिळावे म्हणून व्रत करून प्रार्थना करू शकतात.
धार्मिक परंपरा नुसार पुत्र किंवा पुत्रि हे दोघे सुद्धा समान व महत्वपूर्ण आहेत. आपली संतान मुलगी असो किंवा मुलगा असो हे महत्व पूर्ण आहे की ती स्वस्थ, संस्कारि, सुरक्षित व सुखी पाहिजे. व आपल्या धार्मिक अनुष्ठान नुसार सकारात्मक भावना व श्रद्धा जुडली गेली पाहिजे.

आपल्याला मुलगी पाहिजे असेलतर पुत्रदा एकादशीला अश्या प्रकारे पूजा करू शकता:
पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णु ह्यांच्या पूजे बरोबर माता लक्ष्मीची पण पूजा करा. लक्ष्मी देवीला फक्त धनची देवी नाही तर समृद्धी, सौभाग्य, ऐश्वर्य व गृहस्थ सुख शी जोडलेले आहे.
भगवान विष्णु ह्यांना तुळशी पत्र अर्पित करा व माता लक्षीला कमळ किंवा पांढरे किवा लाल पुष्प अर्पित करा.
“ॐ श्रीं महालक्ष्म्यै नमः” मंत्र जाप करा.
भगवान विष्णु ह्यांना आपल्या मनातील मनोकामना प्रार्थनाच्या रूपात सांगा व आपल्या सामर्थ्य नुसार जरूरत मंद लोकांना भोजन किंवा आवश्यक वस्तु दान करा.
टीप: वरील लेखात दिलेली माहिती ह्याची कोणती सुद्धा हमी घेत नाही, फक्त आपल्या माहितीसाठी ही माहिती देत आहोत. कृपया ह्याची नोंद घ्यावी.
