10-Minute Spicy Potato Slices Recipe | Secret Maggi Masala Kids Will Love
10 मिनिटात चकत्याची भाजी चटपटीत सिक्रेट मसाला वापरुन मुलांचा डब्बा मिनिटात संपेल
शाळा सुरू झालीकी मुलांना डब्यात पोळी भाजी दिलीकी त्यांना पोळी भाजी खायचा कंटाळा येतो. पण बटाट्याची भाजी सर्व मुले आवडीने खातात पण नेहमी नेहमी एकाच पद्धतीने बनवली तर ते सुद्धा खायचा कंटाळा करतात.
आज आपण बटाट्याची चकत्याची भाजी एक सिक्रेट मसाला घालून बनवणार आहोत. चकत्याची भाजी बनवायला सोपी व झटपट होणारी आहे. तसेच मुलांना मॅगी खूप आवडते कारण की त्याचा मसाला छान चटपटीत असतो. तोच मसाला घालून आपण ही भाजी बनवली तर मुले डब्बा मिनिटात संपवतील. आपण ऑफिस ला जाताना सुद्धा अश्या प्रकारची चकत्याची भाजी नेऊ शकता.
बनवण्यासाठी: 15 मिनिट
वाढणी: 3 जणसाठी
साहित्य:
4 मध्यम आकाराचे बटाटे
1/2 टी स्पून लाल मिरची पावडर
1 मसाला मॅगीचे पॅकेट (मॅगी च्या पॅकेटमध्ये येते ते)
मीठ चवीने
2 टे स्पून कोथिंबीर (बारीक चिरून)
फोडणीसाठी:
2 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिटे
1/4 टी स्पून हिंग
1/4 टी स्पून हळद
8-10 कडीपत्ता पाने

कृती: प्रथम बटाटे सोलून त्याच्या पातळ चकत्या करून दोन वेळा पाण्यात धुवून घेऊन बाजूला ठेवा.
कोथिंबीर धुऊन बारीक चिरून घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग व कडीपत्ता घालून छान खमंग फोडणी करून घेऊन त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद व मॅगी मसाला घालून मीठ घालून बटाट्याच्या चकत्या घालून मिक्स करून 3-4 मिनिट झाकण ठेवा. मग झाकण काढून भाजी वरखाली हलवून परत 3-4 मिनिट झाकण ठेऊन मंद विस्तवावर भाजी शिजू द्या.
आता झाकण काढून चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून भाजी मंद विस्तवावर 2-3 मिनिट परतून घ्या.
चकत्याची भाजी चपाती बरोबर सर्व्ह करा.
