15 मार्च 2026 पापमोचनी एकादशी शुभ मुहूर्त तिथी, महत्व, मंत्र व 4 कामे करू नयेत
15 March 2026 Papmochani Ekadashi Full Information In Marathi
15 मार्च 2026 रविवार पापमोचनी एकादशी आहे, ह्या दिवशी भगवान विष्णु ह्यांची कृपा मिळण्यासाठी व पापांपासून मुक्ती मिळण्यासाठी चुकून सुद्धा ह्या चुका करू नयेत.
हिंदू धर्मामध्ये पापमोचनी एकादशी व्रत खूप महत्वपूर्ण मानले जाते. ही एकादशी पाप नष्ट करणारी एकादशी महणून संबोधली जाते.
पापमोचनी एकादशी ही केवळ व्रत करण्यासाठी नाही तर, आपल्या मधील दुर्गुण सोडण्यासाठी सुद्धा चांगली संधि आहे. 15 मार्च ह्या दिवशी पूर्ण श्रद्धा ठेवून व्रत करून आपली वाणी व व्यवहार मधुर ठेवा.
पापमोचनी एकादशी 2026: शुभ तिथि, मुहूर्त:
एकादशी तिथि प्रारंभ: 14 मार्च 2026, शनिवार सकाळी 08:11 वाजता सुरू होत असून
एकादशी तिथि समाप्ती: 15 मार्च 2026, रविवार सकाळी 09:17 पर्यन्त आहे.
हिंदू धर्मामध्ये उदय तिथी (सूर्योदय वेळ) विशेष महत्वाची मानली जाते. 15 मार्च ला सूर्योदय तिथी आहे. म्हणून पापमोचनी एकादशी 15 मार्च 2026 रविवार ह्या दिवशी आहे.
पारण वेळ: पारण वेळ 16 मार्च सोमवार ह्या दिवशी सकाळी शुभ मुहूर्तवर आहे.
पापमोचनी एकादशी ह्या दिवशी चुकून सुद्धा पुढे दिलेल्या चुका करू नका:
असे म्हणतात की पापमोचनी एकादशीचे व्रत जेव्हडे फलदायी आहे तेव्हडेच ते सावधानी ठेवून केले पाहिजे. आपल्या नकळत काही चुका होऊन जातात मग त्यामुळे आपल्याला व्रत केल्याचे पुण्य मिळत नाही.
1. भात सेवन करणे: पौराणिक ग्रंथामध्ये एकादशीच्या दिवशी भात सेवन करू नये. कारण असे मानतात की भाता मध्ये अशुद्धीचा वास असतो.
2. क्रोध व वाद-विवाद: पापमोचनी एकादशीच्या दिवशी शांत राहावे, घरात क्लेश करू नये किंवा कोणाची निंदा सुद्धा करू नये. त्यामुळे आपले मानसिक पुण्य कमी होते.
3. तुळशीच्या रोपांची पाने तोडू नये: एकादशीच्या दिवशी तुळशीच्या वृक्षाला पाणी घालणे शुभ आहे पण पाने तोडणे चांगले नाही. पूजेसाठी पाने पाहिजे असतीलतर आधल्या दिवशीच पाने तोडून ठेवावीत.
4. मसालेदार जेवण वर्ज करावे: पापमोचनी एकादशीच्या दिवशी आल-लसूण-कांदा बिलकुल सेवन करू नये जरी आपण व्रत करीत नसाल तरी सेवन करू नये. सात्विक भोजन करणे चांगले मानले जाते.

पूजाविधी सोप्या पद्धतीने:
पापमोचनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णु ह्यांच्या ‘चतुर्भुज’ रूपाची पूजा केली जाते.
सकाळी लवकर उठून स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करावे.
भगवान विष्णु ह्यांना पिवळी फुले, फळ व पंचामृत अर्पित करावे.
पापमोचनी एकादशी व्रत कथा जरूर वाचावी किंवा आइकावी.
विष्णु मंत्र
1. ॐ नमोः नारायणाय॥
2. विष्णु भगवते वासुदेवाय मन्त्र
ॐ नमोः भगवते वासुदेवाय॥
3. ॐ श्री विष्णवे च विद्महे वासुदेवाय धीमहि।
तन्नो विष्णुः प्रचोदयात्॥
