चैत्र नवरात्री 19 ते 27 मार्च 2026 वास्तु उपाय, पूजा विधी व मुहूर्त, कलश स्थापना दिशा, नियम कोणते
19 March To 27 March 2026 Chaitra Navratri Puja Muhurt, Kalash Sthapna, Niyam In Marathi
19 मार्च 2026 गुरुवार चैत्र नवरात्रि प्रारंभ होण असून 27 मार्च 2026 शुक्रवार समाप्ती होत आहे. चैत्र नवरात्री फक्त आध्यात्मिक शुद्धी नाही तर आपल्या घरातील भाग्य चांगले करण्याचा काळ सुद्धा आहे.
माता दुर्गाची कृपा मिळण्यासाठी चैत्र नवरात्री ही विशेष महत्वाची मानली जाते. ह्या मध्ये कलश स्थापना करणे सुद्धा खूप महत्वाचे आहे. जे आपण वास्तु नियमांचे पालन करीत असाल तर चैत्र नवरात्री ची तयारी करताना तुम्हाला त्याचे चांगले परिणाम सुद्धा पाहायला मिळतील. आज आपण नवरात्रीमध्ये कोणते वास्तु उपाय करायचे आहेत त्यामुळे आपल्याला त्याचे लाभ सुद्धा मिळतील ते पाहू या.
कशी करायची तयारी:
नवरात्रीमध्ये घरातील सजावटीवर सुद्धा विशेष लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानाचे तोरण लावावे त्यामुळे घराची शोभा वाढते व त्याच बरोबर आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधुन नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही व मंगल ऊर्जा घरात प्रवेश करते.
पूजा घराच्या भिंतीवर फिकट पिवळा किंवा पांढरा किंवा कोणता सुद्धा हलका रंग लावला पाहिजे. ही रंग मानसिक शांती प्रदान करतात व चांगली ऊर्जा वाढवण्यास मदत करतात.
तामसिक रंग म्हणजे काले, निळे, भुरे रंग पूजा घरात उपयोगात आणू नये. कारण की ही रंग सकारात्मक ऊर्जा आणत नाहीत.
वास्तु शास्त्रा नुसार आपले पूजा घर नेहमी साफ ठेवले पाहिजे. त्यामुळे घरात दिव्य शक्ति आकर्षित करण्यास मदत होते.
कलश स्थापना कोणती दिशा:
हिंदू धर्मा मध्ये कलश स्थापना ही सुख, वैभव व मंगल कार्याचे प्रतीक मानले जाते. जर कलश स्थापना करताना वास्तु शास्त्राचे नियम पाहून स्थापना केली तर वास्तु दोषाचा प्रभाव कमी होतो.
वास्तु शास्त्रा नुसार उत्तर-पूर्व म्हणजेच ईशान्य कोन हा ईश्वराचे स्थान मानले जाते. ह्या ठिकाणी सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा असते. म्हणून आपण ह्याच दिशेला कलश स्थापना करावी.
दुर्गा माताची प्रतिमा व अखंड ज्योतची स्थापना सुद्धा ईशान्य कोनमध्ये केली पाहिजे.
एका तांब्याच्या कलशमध्ये तांदूळ भरून देव घराच्या उत्तर पूर्व भागात ठेवा, वास्तु शास्त्रा नुसार हा उपाय केल्याने धन-धान्य मध्ये वृद्धी होऊन घरात समृद्धी येते.
कलश स्थापना करताना मन शुद्ध ठेवा, त्यामुळे आपल्याला त्याचा पूर्ण लाभ मिळू शकेल.
चैत्र नवरात्र शुभ मुहूर्त:
वैदिक पंचांग अनुसार, चित्र नवरात्री 19 मार्च पासून सुरू होत असून 27 मार्च ह्यादिवशी समाप्ती होत आहे.
चैत्र नवरात्र 2026 कलश स्थापन मुहूर्त:
चैत्र महिन्यात चैत्र नवरात्रीला पहिल्या दिवशी विधीपूर्वक कलश स्थापना केली जाते. ह्या वर्षी 19 मार्च 2026 गुरुवार रोजी स्थापना करायची आहे.
घटस्थापना मुहूर्त – 06 वाजून 52 मिनट पासून 07 वाजून 46 मिनट
घटस्थापना अभिजित मुहूर्त – 12 वाजून 04 मिनट ते 12 वाजून 52 मिनट
शुभ मुहूर्त:
ब्रह्म मुहूर्त – सकाळी 04 वाजून 51 मिनट ते 05 वाजून 59 मिनट पर्यन्त
अभिजीत मुहूर्त- दुपारी 12 वाजून 05 मिनट ते दुपारी 12 वाजून 53 मिनट पर्यन्त
विजय मुहूर्त – दुपारी 02 वाजून 30 मिनट ते 03 वाजून 18 मिनट पर्यन्त
गोधूलि मुहूर्त – संध्याकाळी 06 वाजून 29 मिनट ते 06 वाजून 53 मिनट पर्यन्त
चैत्र नवरात्री 2023 पूजाविधी:
कलश स्थापना विधी सुरू करण्यापूर्वी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. जेथे पूजा करायची आहे ती जागा साफ करून लाल रंगाचे कापड आंथरून त्यावर माता राणीची प्रतिमा स्थापित करा. त्यावर थोड्या अक्षता ठेवा म्हणजे तांदूळ ठेवा. मग एका मातीच्या भांड्यात जवस किंवा गहू व माती एकत्र करून पसरवून ठेवा मग त्यावर कलश ठेवा, कलशावर स्वस्तिकचे चिन्ह काढून कलशाला कलवा बांधा.
कलशमध्ये सुपारी, कॉईन, फूल व अक्षता टाकून अशोकाची पाने ठेवा किंवा पांच प्रकारची पान ठेवा, कलाशवर एक छोटी थाली ठेवून त्यामध्ये तांदूळ भरून ठेवा, त्यावर एक नारळ लाल कापडात गुंडाळून रक्षा सूत्रनी बांध म्हणजेच लाल रंगाच्या कलवा नी बाधा.

मग कलशाला हळद कुंकू लावा, अक्षता, फूल अर्पित करा. नेवेद्य दाखवा व फळ व मिठाई दाखवा. मग रोज कलशच्या बाजूनी पाणी शिंपडा दोन दिवसांत तुम्हाला अंकुर फुटलेले दिसतील.
माता दुर्गाची 9 रूप कोणत्या दिवशी कोणत्या रूपाची पूजा करायची
1. नवरात्री पहिला दिवस 19 मार्च 2026 गुरुवार माता शैलपुत्री पूजा (घटस्थापना)
2. दूसरा दिवस 20 मार्च शुक्रवार माता ब्रह्मचारिणी पूजा
3. तिसरा दिवस 21 मार्च शनिवार माता चंद्रघंटा पूजा
4. चौथा दिवस 22 मार्च रविवार माता कूष्माण्डा पूजा
5. पांचवा दिवस 23 मार्च सोमवार स्कंदमाता पूजा
6. सहावा दिवस 24 मार्च मंगळवार कांत्यायनी पूजा
7. सतवा दिवस 25 मार्च बुधवार कालरात्री पूजा
8. आठवा दिवस 26 मार्च गुरुवार माता महागौरी पूजा
9. नववा दिवस 27 मार्च शुक्रवार सिद्धिदात्री पूजा ह्या दिवशी रामनवमी आहे.
चैत्र नवरात्रीच्या अष्टमी व नवमी तिथीला कन्या पूजन केले जाते. तसेच चैत्र महिन्यात नवरात्री मध्ये विवाहित महिलांना घरी हळदी-कुंकूसाठी बोलावून कैरीचे पन्हे, डाळ कैरी व हरबरे भिजवून त्याने ओटी भरली जाते.
