4 डिसेंबर दत्तजयंती व मार्गशीर्ष पूर्णिमा गुरुवार सटीक उपाय,समस्या दूर होऊन आर्थिक प्रगती होईल
4 December Datta Jayanti- Margashirsha Purnima Satik Upay In Marathi
आपल्या जीवनात जर बऱ्याच समस्या असतील व त्या समस्या सुटत नसतील तर 4 डिसेंबर ह्या दिवशी पुढे दिलेले उपाय करा. 4 डिसेंबर ह्या दिवशी दत्तजयंती व ‘मार्गशीर्ष पूर्णिमा’ आहे तसेच ह्या दिवशी गुरुवार आहे त्यामुळे चांगला शुभ दिवस आहे, तर ह्या दिवशी पैशाच्या तंगी पासून छुटकारा मिळण्यासाठी काही उपाय केले पाहिजे.
हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्यातिल शुक्ल पक्ष पूर्णिमा ह्या दिवशी भगवान दत्तात्रय प्रकट झाले होते. असे म्हणतात की ह्या दिवशी त्यांच्या बाल स्वरूपाची पूजा केल्यास मनुष्यच्या जीवनातील सर्व परेशानी दूर होऊन मनोकामना पूर्ण होतील.
भगवान दत्तात्रय ही नाथ संप्रदायचे इष्ट देवता आहेत, जी भक्त शिव संप्रदायशी जोडले गेले आहेत ते त्यांना शिवचे रूप मानतात. तर वैष्णव संप्रदायशी जोडले गेलेले भक्त भगवान विष्णु ह्यांच्या अवतारांशी जोडले गेलेले असतात. खरम्हणजे भगवान दत्तात्रय भगवान ब्रह्मा, विष्णु व शिव ह्याचे संयुक्त आवतार आहेत.
तसेच धन प्राप्तीसाठी ‘मार्गशीर्ष पूर्णिमा’हा दिवस खास आहे. असे म्हणतात की ह्या शुभ दिवशी ज्योतिषी उपाय केलेतर संपूर्ण वर्ष कधी सुद्धा धनाची कमतरता होत नाही. ‘मार्गशीर्ष पूर्णिमा’ च्या दिवशी स्नान-दान चे विशेष महत्व आहे. ‘मार्गशीर्ष पूर्णिमा’ 4 डिसेंबर गुरुवार ह्या दिवशी आहे. ह्या दिवशी चंद्रोदयची वेळ दुपारी 4:35 मिनिटाला आहे. तेव्हा आपल्याला काही उपाय करायचे आहेत.
दत्तात्रय जयंती ह्या दिवशी केलेले उपाय सर्व कार्यामध्ये सफलता देतात ते कसे ते आपण पाहू या:
आपल्या जीवनात जर बऱ्याच समस्या किंवा परेशानी असतील व त्याचे निराकरण होत नसेलतर ह्या दिवशी दिवासभरामद्धे कधीसुद्धा पुढे दिलेले उपाय करू शकता. त्यामुळे आपल्या समस्या समाप्त होतील.
दत्तात्रय भगवान गायत्री मंत्र:
ॐ दिगंबराय विद्महे योगीश्रारय् धीमही तन्नो दत: प्रचोदयात’
सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून घरातील पूजा घरात किंवा शिव मंदिरमध्ये जाऊन आसन घालून बसा. मग आपले इष्ट देवता, भगवान गणेश, गुरुदेव, व भगवान शिव व माता पार्वती ह्याचे स्मरण करा. मग गायत्री मंत्राचा 108 वेळा जाप करा. जप पूर्ण झाल्यावर आपले संकट दुरू होऊ दे म्हणून प्रार्थना करा. मग
पशुपक्षीना भोजन द्या.
आपली समस्या जो पर्यन्त दूर होत नाही तोपर्यंत हा प्रयोग करीत रहा, थोड्याच दिवसांत आपली समस्या दूर होईल.
पैशाच्या तंगी पासून छुटकारा मिळण्यासाठी ‘मार्गशीर्ष पूर्णिमा’ च्या दिवशी काही उपाय करा:
गृह क्लेश पासून मिळेल मुक्ती:
ज्योतिष शास्त्रानुसार घरातील व्यक्तिमध्ये सारखी सारखी भांडणे होत असतील व टेंशनचे वातावरण होत असेल तर ‘मार्गशीर्ष पूर्णिमा’ ह्या दिवशी भगवान विष्णु ह्यांची विधीपूर्वक पूजा अर्चा करा. पूजेच्या वेळी भगवान विष्णु ह्यांना पांढऱ्या चंदनाचा टिळा लावावा त्यामुळे गृह दोष कमी होऊन घरात शांती व सामंज्यस येईल.
आर्थिक तंगी पासून मिळेल मुक्ती:
‘मार्गशीर्ष पूर्णिमा’ च्या दिवशी धना संबंधित समस्या दूर करण्यासाठी माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा करा. पूजेमद्धे लाल रंगाचे फूल अर्पित करा व कनकधारा स्तोत्र म्हणा. माता लक्ष्मी प्रसन्न होऊन पूर्ण परिवारावर कृपा दृष्टी ठेवेल व आर्थिक समस्या पासून मुक्ती मिळेल.

सफलता ची प्राप्ति:
ज्योतिष शास्त्रा नुसार ‘मार्गशीर्ष पूर्णिमा’ च्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली कणकेचा दिवा बनवून त्यामध्ये तिळाचे तेल घालून लावल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन आर्थिक परिस्थिति सुधारेल त्याच बरोबर आपल्या जीवनात सफलता मिळण्यासाठी नवीन मार्ग मिळतील.
सुख-समृद्धि ची प्राप्ति:
आपल्या जीवनातील बाधा दूर करण्यासाठी ‘मार्गशीर्ष पूर्णिमा’ च्या दिवशी भगवान श्री हरी व माता लक्ष्मी ह्यांची मनोभावे पूजा अर्चा करावी. ह्या उपायांनी जीवनातील सर्व अडचणी समाप्त होऊन सुख-समृद्धी मिळेल.
‘मार्गशीर्ष पूर्णिमा’ चे महत्व:
सनातन धर्मामध्ये ‘मार्गशीर्ष पूर्णिमा’ च्या दिवशी स्नान, दान व तप करण्याचे विशेष महत्व आहे. ‘मार्गशीर्ष पूर्णिमा’च्या दिवशी हरिद्वार, बनारस, मथुरा व प्रयागराज ह्या जागी श्रद्धालु पवित्र नदीमध्ये स्नान करून तप करतात. पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्व आहे.