वास्तु टिप्स: भाड्याचे घर सोडून स्वतःचे घर घ्यायचे आहे, वास्तु शास्त्रातले उपाय करून वर्षभरात बनवा
Vastu Tips: Swatache Ghar Lavkar Ghenyasathi Sope Upay In Marathi
प्रतेक व्यक्तीला वाटते आपले भाड्याचे घर सोडून स्वतःचे घर बनवावे, त्यासाठी वास्तु शास्त्रामध्ये काही सोपे उपाय दिले आहेत ते करून आपण वर्ष भरात आपले स्वतःचे घर बनवूण आपले स्वप्न पूर्ण करू शकता. बरेच वेळा आपले स्वतःचे घर बनवणे मनात किंवा स्वप्नात असूनसुद्धा बऱ्याच अडचणी येत असल्यामुळे ते पूर्ण होऊ शकत नाही. आपण आपले घर किंवा फ्लॅट घेऊ इच्छित असाल तर ज्योतिष शास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत. हे उपाय खूप सोपे आहेत ते करून पहा.
आपण जेव्हा भाड्याचे घर घेतो तेव्हा आपल्या महिन्याच्या पगारा मधील सर्वात मोठा हिस्सा भाडे देण्यात जातो. आपण आपल्या घरातील प्रिय व्यक्तींना एक सुरक्षित जागा व आजूबाजूचा चांगला परिसर देण्यासाठी प्रयत्न करीत असतो. त्यासाठी आपण दिवस रात्र मेहनत पण करीत असतो. पण बरेच वेळा मानत असून सुद्धा काही अडचणी मुळे किंवा परिस्थिति मुळे आपण आपली मनोकामना पूर्ण करू शकत नाही.
ज्योतिष शास्त्र मध्ये आपले घर होण्यासाठी काही उपाय दिले आहेत ते जर केलेतर घर बांधण्या मधील अडचणी दूर होतील व आपले स्वप्नं लवकर पूर्ण होईल.
आपले स्वप्न लवकर पूर्ण होण्यासाठी सटीक उपाय:
ज्योतिष शास्त्रा नुसार आपण आपले स्वतःचे घर होण्यासाठी लिंबाच्या झाडाच्या लाकडाचे एक छोटेसे घर बनवून कोणत्या सुद्धा गरीब मुलाला द्या किंवा मंदिरामध्ये ठेवून या, असे केल्याने घर बनवण्यासाठी ज्या अडचणी येतात त्या दूर होऊन आपले स्वप्न लवकर पूर्ण होईल.
श्री गणेश करतील सर्व विघ्न दूर:
आपले स्वतःचे घर किंवा फ्लॅट खरेदी करायचा असलेतर रोज मनोभावे विघ्नहर्ता भगवान गणेश ह्यांची पूजा अर्चा करून बुधवारच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करा. त्याच बरोबर पूजा करताना भगवान गणेश ह्यांना लाल रंगाचे फूल व दूर्वा अर्पित करा. असे केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील व भगवान गणेश ह्यांचा आशीर्वाद मिळून आपले स्वतःचे घर लवकर होईल.
सर्व ग्रहांची साथ मिळेल:
आपले स्वतःचे घर बनवण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तृतीया तिथीच्या दिवशी लिंबाच्या झाडामद्धे एक चांदीचा खिळा घुसवून ठेवा पण खिळा घुसवतान लाकडाचाच उपयोग करा. खर म्हणजे लिंबाच्या झाडाचा संबंध मंगळ ग्रहाशी आहे व चांदीचा खिळा चंद्र ह्या ग्रहाशी निगडीत आहे. मंगळ व चंद्र ही दोन्ही ग्रह बरोबर आले की दोष दूर होऊन आपले स्वप्न आवश्य पूर्ण होते.
आपले घर बनण्याची इच्छा होईल पूर्ण:
आपले स्वतःचे घर किंवा फ्लॅट पाहिजे असेलतर एक लाल रंगाचे कापड घेऊन त्यामध्ये 6 चिमूट कुंकू, 6 लवंग, 9 बिंदी व 9 मुठी माती घेऊन त्याची एक पोटली बनवून कोणत्या पान नदी च्या स्वछ पाण्यात सोडून द्या, पण पोटली सोडताना आपल्या मनातील इच्छा मनातल्या मनात म्हणून मगच सोडा असे केल्याने आपले स्वप्न लवकर पूर्ण होईल व आपल्याला ग्रहांची साथ सुद्धा मिळेल.

Vastu Tips: Swatache Ghar Lavkar Ghenyasathi Sope Upayप्रतेक रविवारी करा हा उपाय:
आपल्या घरातील पूजा घर मध्ये एक छोटेसे मातीचे घर बनवून ठेवा मग प्रतेक रविवारी त्यामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने आपले घराचे स्वप्न लवकर पूर्ण होईल या अडचणी येत असतील तर दूर होतील.
टीप: आम्ही फक्त आपल्या मनातील मनोकामना पूर्ण होण्यासाठी काही सोपे उपाय सांगत आहोत, आम्ही चांगल्या उदेशनी सांगत आहोत. पण आम्ही कोणती सुद्धा हमी देत नाही.