3 मार्च 2026 मंगळवार वर्षाचे पहिले चंद्र ग्रहण सूतक वेळ राशी नुसार भविष्यवाणी व सटीक उपाय
3 March 2026 Chandra Grahan Sutak Samay, Rashifal Wa Upay In Marathi
3 मार्च 2026 मंगळवार फाल्गुन पूर्णिमा ह्या दिवशी चंद्र ग्रहण आहे. जे भारतात दिसणार असून भारतातील सूतक वेळ काय आहे.
मंगळवार 3 मार्च रोजी ह्या वर्षातील पहिले चंद्र ग्रहण आहे. भारतात दिसणार असून त्याचा सूतक काळ प्रभावी आहे. त्यामुळे काही राशी ना विशेष सावधानी ठेवायची आहे. ही अंशीक (खंडग्रास) चंद्र ग्रहण आहे. जे भारतात दिसणार आहे. ह्या वेळी चंद्र सिंह राशी मध्ये राहणार असून त्याची सावली आधीपासूनच केतू ग्रहावर राहणार आहे ह्या दोघांची युती व चंद्र ग्रहणचा प्रभाव त्यामुळे काही रांशीवर नकारात्मक असर दिसणार आहे. त्यामुळे ह्या वेळेमध्ये सर्व कार्यामध्ये सावधानी ठेवणे आवशक आहे. कोणत्या सुद्धा यात्रेला जाऊ नये.
सण 2026 मध्ये दोन चंद्र ग्रहण आहेत पण त्यामधील एकच चंद्र ग्रहण दिसणार आहे. पहिले चंद्र ग्रहण फाल्गुन मास पूर्णिमा ह्या दिवशी आहे व दुसरे चंद्र ग्रहण श्रावण पूर्णिमा ह्या दिवशी आहे.
3 मार्च दुपारी 3:20 मिनिटांनी चंद्र ग्रहण सुरू होत असून संध्याकाळी 6:48 मिनिटांनी समाप्त होत आहे. ग्रहणचे सूतक हे मंगळवारी सकाळी 6:20 मिनिटांनी सुरू होणार आहे. ग्रहण पूर्वा फाल्गुनी नक्षत्र व सिंह राशी मध्ये तसेच भारतात दिसणार आहे. चंद्र ग्रहण असल्यामुळे 2 मार्च ह्या दिवशी होळी दहन करणे शुभ आहे. किंवा 3 मार्च रोजी चंद्र ग्रहण संपल्यावर होळी दहन करू शकता.
भारतामध्ये चंद्रग्रहण अवधि फक्त 25 मिनट:
भारतात चंद्र ग्रहण अगदी काही काळ दिसणार आहे. म्हणजे जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा ग्रहण लागलेले असेल. भारतात चंद्र ग्रहण 25 मिनिटे दिसणार आहे.
भारतात चंद्र ग्रहण 3:20 मिनिटांनी सुरू होणार असून व संध्याकाळी 6:20 मिनिटांनी समाप्त होत आहे. दिल्लीमध्ये संध्याकाळी 6:22 मिनिटांनी दिसणार असून भारतात बाकीच्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी दिसणार आहे. म्हणून भारतात 25 मिनिट चंद्र ग्रहण दिसणार आहे. उत्तर भारतात चंद्र ग्रहण 59 मिनिट दिसणार आहे.
चंद्र ग्रहण सूतक काळ:
भारतात सूतक काळ सकाळी 6:20 मिनिटांनी प्रारंभ होत आहे.
चंद्र ग्रहण ची परिस्थिति कोणत्या वेळी कशी असणार:
उपच्छाया प्रवेश दुपारी: 02:13
ग्रहण प्रारंभ (स्पर्श): दुपारी 03:20
पूर्णता प्रारंभ:- संध्याकाळी 04:34 ग्रहण
मध्य :- संध्याकाळी 05:05
पूर्णता समाप्त : संध्याकाळी 05:33
ग्रहण समाप्त (मोक्ष) :- संध्याकाळी 06:48
उपच्छाया अन्त : संध्याकाळी 07:55
ग्रहण की अवधि:- 03 तास 28 मिनट
पूर्णता की अवधि :- 59 मिनट
ग्रहणाचा राशीवर होणार प्रभाव:
चंद्र ग्रहण पूर्वा फाल्गुनी नक्षत्र सिंह राशीमध्ये होत आहे. काही राशीना ग्रहणाचा अशुभ किंवा कष्ट दायक काळ सहन करावा लागणार आहे. त्यामधील काही राशी ना अशुभ फळ मिळणार आहे. त्यामुळे त्या वेळेत मंत्र जाप, करणे चांगले आहे.

आता आपण पाहूया ग्रहण काळात कोणत्या राशीने कोणते त्रास होऊ शकतात:
मेष राशि – पैसा खर्च होऊन परिश्रम व्यर्थ जाऊ शकतात
वृषभ राशि- कार्यसिद्ध होऊन धनलाभ होईल
मिथुन राशि- प्रगति, उत्साह, पुरुषार्थ-वृद्धि
कर्क राशि – धन हानि, अपव्यय पासून कष्ट
सिंह राशि – शरीरला कष्ट, जखम, भय, धन हानि
कन्या राशि – धन हानि, कष्ट
तुला राशि – धन व सुखलाभ
वृश्चिक राशि – रोग, कष्ट, चिन्ता, भय, संघर्ष
धनु राशि- सन्तान च्या बाबतीत चिन्ता
मकर राशि- शत्रु व दुर्घटना भय, पैसा अधिक खर्च होऊ शकतो
कुम्भ राशि- जीवनसाथीला कष्ट
मीन राशि – रोग, गुप्त चिंता, कार्य मध्ये विलम्ब
नैसर्गिक आपदा सुद्धा होऊ शकतात:
चंद्र ग्रहणमध्ये नैसर्गिक आपदा होऊन प्रकोप होऊ शकतात. त्यामध्ये भूकंप, पुर, सुनामी, विमान दुर्घटना होण्याची आशंका होऊ शकते. जीवित हानी कमी होऊ शकते. फिल्म किंवा राजनीति मध्ये दुखद समाचार येऊ शकतात. व्यापार मध्ये वृद्धी होऊ शकते. वायुमान दुर्घटना होण्याची संभावना असते. पूर्ण जगात राजनीतिक अस्थिरता होऊ शकते. राजनीतिक आरोप प्रत्यारोप होऊ शकतात. सता संगठनमध्ये बदल होऊ शकतात. संपूर्ण जगात सीमा रेषेवर तनाव सुरू होऊ शकतो. आंदोलन, हिंसा, धरण, प्रदर्शन, बँक घोटाला होऊ शकतो.
चंद्र ग्रहण मध्ये काही उपाय करावे:
चंद्र दोष पासून मुक्ती मिळण्यासाठी रोज पांढऱ्या किंवा काळ्या कुत्र्याला रोटी खायला द्या. असे केल्याने चंद्र दोषा पासून मुक्ती मिळेल. त्याच बरोबर तांब्याच्या लोटया मध्ये पाणी भरून कोणत्या सुद्धा वृक्षाला जल अर्पित करावे. त्यामुळे सुद्धा चंद्र दोषा पासून मुक्ती मिळेल.
आपल्या राशीमध्ये चंद्र ग्रह जर दूषित असेलतर उपाय:
सोमवार ह्या दिवशी उपवास करून शिवलिंगवर जल अर्पित करा.
ॐ चंद्राय नम: ह्या मंत्राचा जाप करा.
दूध, पांढरे वस्त्र व तांदूळ दान करा.
आपल्या आईचा सन्मान करून तिचा आशीर्वाद घ्या.
शुद्ध पांढरा मोती परिधान करा पण त्या अगोदर ज्योतिषी सल्ला घ्या.
गर्भवती महिलांनी काय करू नये:
चंद्र ग्रहण काळात गर्भवती महिलांनी घराच्या बाहेर पडू नये. त्याच बरोबर टोकदार वस्तु हाताळू नये. ग्रहण काळात छोटी कोणती सुद्धा लोखंडाची वस्तु जवळ ठेवल्याने नकारात्मक शक्तिचा प्रभाव होत नाही.
चंद्र ग्रहण काळात स्वयंपाक करणे किंवा काही खाणे टाळावे ग्रहण सुरू होण्याच्या अगोदर 2-3 तास जेवण करावे.
चंद्र ग्रहण काळात कोणता प्रभावी मंत्र म्हणावा:
ॐ श्रां श्रीं श्रौं सः चन्द्रमसे नमः
ॐ ऐं क्लीं सोमाय नमः
ॐ श्रीं श्रीं चन्द्रमसे नमः
ॐ अमृतंग अन्गाये विधमहे कलारुपाय धीमहि तन्नो सोम प्रचोदयात।
