होळी दहन 2026 2 मार्च भद्राची काळी सावली, शुभ मुहूर्त 12 मिनिट, पूजाविधी, काय करू नये, सटीक उपाय
Holi Dahan 2026 Shubh Muhurat,Puja Vidhi, What To Do And Upay In Marathi
होळी दहन तिथी बदल बरेच संभ्रम आहेत, 2 मार्च भद्रा व 3 मार्च चंद्र ग्रहण आहे. होळी दहन कधी करायचे शुभ वेळ कोणती आहे?
रंगांचा सण होळी दहन हिंदू पंचांग नुसार दर वर्षी फाल्गुन मास पूर्णिमा तिथीला असतो. ह्या वर्षी 2 मार्च 2026 सोमवार ह्यादिवशी होळी आहे. हिंदू लोक होळी हा सण विशेष करून साजरा करतात. तसेच संपूर्ण भारतात खूप उत्साहात होळी सण साजरा केला जातो.
फाल्गुन पूर्णिमा 2 मार्च 2026 सोमवार
पूर्णिमा प्रारंभ: संध्याकाळी 5:55 मिनिट
पूर्णिमा समाप्ती: 3 मार्च मंगळवार संध्याकाळी 5:07 मिनिट
पूर्णिमा प्रारंभ 2 मार्च सोमवार रोजी आहे त्यामुळे होळी दहन सोमवार रोजी संध्याकाळीच आहे. तसेच ह्या दिवशी प्रदोष काळमध्ये पूर्णिमा आहे, ह्या दिवशी भद्रा संध्याकाळी 5:56 मिनिट ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5:28 पर्यन्त आहे. फाल्गुन मास कृष्ण पक्ष पूर्णिमा तिथी होळी पूजन विशेष महत्वाचे आहे. भद्रा काळात दान पुण्य करणे जरुरीचे आहे. होळी दहन करण्याची वेळ संध्याकाळी 5:55 ते रात्री 8 पर्यन्त करू शकता.
3 मार्च 2026 मंगळवार ह्या दिवशी दुपारी 3:20 मिनिटला चंद्र ग्रहण सुरू होत असून संध्याकाळी 6:48 मिनिट पर्यन्त आहे. 3 मार्च मंगळवारी सकाळी 6:20 मिनिट पासून सूतक सुरू होत आहे. चंद्र ग्रहणही भारतात दिसणार आहे. म्हणून 2 मार्चला संध्याकाळी होळी पूजन करणे शुभ आहे.
होलिका दहन भद्राची सावली:
2 मार्च 2026 संध्याकाळी 5:56 मिनिट ला पूर्णिमा तिथी सुरू होत असून 3 मार्च 2026 संध्याकाळी 5:07 मिनिट ला समाप्त होत आहे. पूर्णिमा ह्या दिवशी प्रदोष काळ आहे. त्याच दिवशी भद्रा संध्याकाळी 5:56 ते 3 मार्च संध्याकाळी 5:28 मिनिट पर्यन्त आहे.
श्रेष्ठ मुहूर्त (प्रदोषकाल):
2 मार्च 2026 संध्याकाळी 6:24 ते संध्याकाळी 6:36 हा काळ प्रदोष अत्यंत शुभ काळ आहे. ह्या वेळेत होळीची पूजा करावी. होळीच्या पूजेसाठी फक्त 12 मिनिट शुभ मुहूर्त आहे.
भद्रामध्ये शुभ कार्य होत नाहीत:
पुराणा नुसार भद्रा भगवान सूर्य ह्यांची पुत्रि असून शनि देवाची बहीण आहे. भद्रा ही क्रोधी स्वभावाची आहे असे म्हणतात.
होळीची पूजा कशी करायची व नियम:
हिंदू शास्त्रा नुसार होळी दहन भद्र काल नसताना पूर्णिमा तिथीमध्ये करायला पाहिजे. घरात सुख-शांती समृद्धी येण्यासाठी होळी दहन करण्याच्या अगोदर होळीची पूजा करणे विशेष महत्वाचे आहे.
होळी दहनच्या वेळी आपला चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. पूजा थालीमध्ये पूजेचे साहित्य, म्हणजेच रोली, माळ, नारळ, धागा, हळकुंड, मुग, गुलाल, व 5 प्रकारचे धान्य, गव्हाच्या ओंबया व 1 लोटा पाणी घ्या. होळीच्या वेळी घरातील व्यक्तींनी प्रदक्षिणा मारताना होळीला धागा बाधवा. मग विधीपूर्वक पूजा करावी व कलशामधील पाणी घेऊन अर्ध्य द्या. मग सूर्यास्ता नंतर भद्र झाल्यावर होळी दहन करावी.
होळीच्या दिवशी चुकून सुद्धा खाली दिलेली काम करू नये:
होळीदहन च्या वेळी काळ्या रंगाचे कपडे घालू नये. कारण ह्या दिवशी नकारात्मक शक्ति जास्त प्रभवी होते.
होळी दहन च्या वेळी आपल्या डोक्यावर रुमाल किंवा ओढणी किंवा पदर घ्यावा.
होळी ह्या दिवशी टोणे-टोटके जास्त प्रमाणात केले जातात म्हणून ह्यादिवशी कोणच्या म्हणजे अनोळखी घरी जेऊ नये.
होळीच्या दिवशी शिळे अन्न खाऊ नये व दक्षिण दिशेला तोंड करून बसू नये.
असे म्हणतात की नवविवाहित महिलानी होळी दहन होताना पाहू नये त्यामुळे त्यांच्या जीवनात समस्या येऊ शकतात.
होळी दहन च्या वेळी मादक पदार्थ सेवन करू नये.
होळी च्या दिवशी रात्री तंत्र केले जातात म्हणून सुनसान जागी जावू नये.
होळी ह्या सणाच्या दिवशी खाली दिलेले उपाय करावे:
होळी दहन केल्यावर राहिलेली राख खूप पवित्र मानली जाते. होळीच्या ह्या राखचा उपयोग केला तर आपल्या जीवनातील बऱ्याच समस्या दूर होतात. ते उपाय काय आहेत ते आता आपण पाहूया.

1 पहिला उपाय:
आपल्या घरात भांडणे जास्त प्रमाणात होत असतीलतर होळीची राख घेऊन एक पुरचुंडी बांधावी व घरात वेगवेगळ्या कोर्नरला ठेवावी. त्यामुळे बऱ्याच फायदा होतो घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर होते. घरात ती अशा जागी ठेवा की ज्या जागी आपल्याला भांडणाचा जास्त त्रास होतो. मग दुसऱ्या दिवशी घरच्या बाहेर फेकून द्यावी.
2. दूसरा उपाय:
आपल्या घरातील व्यक्ति किंवा लहान मुले हयाना लवकर नजर लागते किंवा ती व्यक्ति सारखी आजारी पडते त्या व्यक्तीच्या डोक्या पासून पाया पर्यन्त एंटी क्लॉक वाईज होळी ची राख घेऊन उतारा करा व ती राख घराच्या बाहेर किंवा बागेत टाका.
3. तिसरा उपाय:
होळीच्या राख घेऊन सुद्धा आपल्या आर्थिक परेशानी दूर करता येतात. एका लाल रंगाच्या कापडात थोडीशी होळीची राख घेऊन त्याची पोटळी बांधवी व ती पोटली आपल्या तिजोरीत किंवा कपाटात ठेवावी. त्याच बरोबर थोडीशी राख आपल्या पर्समध्ये कोर्नरला ठेवावी. त्याच बरोबर घरात कोणते चांगले कार्य असेलतर घरातील सर्व व्यक्तिनी होळीची राख घेऊन त्याचा टीका कपाळावर लावावा. त्यामुळे आपली सर्व कामे पूर्ण होऊन त्याची शुभ फळे आपल्याला मिळतील.
टीप: आपंचे चॅनेल किंवा वेबसाइट कोणती सुद्धा हमी देत नाही, ही माहिती फक्त आपल्याला माहिती होण्यासाठी देत आहोत.
