27 February 2026 Amalaki Ekadashi Vrat Shubh Muhurt Puja Vidhi Paarn Mantra In Marathi

Amalaki Ekadashi
27 February 2026 Amalaki Ekadashi Vrat Shubh Muhurt Puja Vidhi Paarn Mantra

27 February 2026 Amalaki Ekadashi Vrat Shubh Muhurt Puja Vidhi Paarn Mantra In Marathi

27 फेब्रुवारी 2026 शुक्रवार आमलकी एकादशी व्रत शुभ मुहूर्त पूजा विधी व पारण

आमलकी एकादशी ही हिंदू धर्मामधील विष्णु भक्तांचे अत्यंत महत्वपूर्ण व्रत आहे. 27 फेब्रुवारी 2026 शुक्रवार ह्या दिवशी आमलकी एकादशी आहे. फाल्गुन मास शुक्ल पक्ष तिथी ला आवळ्याच्या वृक्षाची पूजा करणे महत्वाचे मानले जाते. त्यालाच रंगभरी एकादशी असे सुद्धा म्हंटले जाते. ह्या दिवशी आवळ्याच्या वृक्षामध्ये भगवान विष्णु ह्यांचा सहवास असतो असे म्हंटले जाते. ह्या दिवशी व्रत केल्याने पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्ती होते व जीवनात सुख-समृद्धी येते.

आमलकी एकादशी 2026 तिथि व मुहूर्त:
पंचांग अनुसार फाल्गुन एकादशी तिथी 27 फेब्रुवारी शुक्रवार रात्री (म्हणजे पहाटे)12:33 मिनिटांनी प्रारंभ होत असून त्याच दिवशी रात्री 10:32 मिनिट पर्यन्त आहे. उदय तिथी अनुसार व्रत 27 फेब्रुवारी ह्या दिवशी करायचे आहे.

व्रत पारण वेळ: 28 फेब्रुवारी 2026 (शनिवार) सकाळी 6:47 पासून 9:06 मिनिट पर्यन्त
शुभ मुहूर्त पूजासाठी: सकाळी 7:00 पासून 9:30 पर्यन्त ही वेळ अत्यंत उत्तम आहे.
सर्वार्थ सिद्धि योग, रवि योग, आयुष्मान योग व सौभाग्य योग आहे.जे पूजा व दान धर्मसाठी खूप फलदायी आहे.

आमलकी एकादशी धार्मिक महत्व:
आमलकी एकादशीचे मुख्य महत्व भगवान विष्णु व आवळ्याचे वृक्ष ह्यांच्या शी जोडला गेला आहे. पुराणा अनुसार आवल्याच्या वृक्षामध्ये भगवान विष्णु ह्यांच्या वास आहे. ह्या दिवशी व्रत व पूजा केल्याने पाप नष्ट होतात. आपले आयुष्य वाढते वमोक्ष प्राप्तीचा मार्ग प्रशस्त होतो. काशी ह्या ठिकाणी होळीची सुरुवात होते. त्यालाच रंगभरी एकादशी असे सुद्धा म्हणतात. व्रत केल्याने सात्विक जीवन, स्वास्थ, व धन-धान्यची प्राप्ती होते.

आमलकी एकादशी पूजा विधि:
सकाळी ब्रह्ममुहूर्त वर उठून स्नान करून साफ कपडे परिधान करा.
पूजाघर मध्ये भगवान विष्णु व नरसिंह भगवान ह्यांची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा.
आवळ्याच्या वृक्षाला किंवा फांदीला जल अर्पित करून दिवा लावावा.
भगवान विष्णु ह्यांना पिवळ्या रंगाचे फूल, चंदन, रोली, अक्षता, फळ व तुळशी अर्पित करा.
ॐ नमो भगवते वासुदेवाय मंत्र का 108 वेळा मंत्राचा जाप करा.
भोग म्हणजेच नेवेद्य दाखवताना आवळ्या पासून बनवलेल पदार्थ, मखाना खीर, साबुदाणा, नारळ, तुपा पासून बनवलेली मिठाई ठेवा.
संध्याकाळी आरती म्हणून प्रसाद सेवन करा.

आमलकी एकादशी व्रत नियम व लाभ:
व्रत करताना तांदूळ ,म्हणजेच भात, डाळ, मांस, दारू, तामसी भोजन करू नका, सात्विक भोजन करा.
क्रोध, खोटे बोलणे, व नकारात्मक विचार ठेवू नका.
दिवसा झोपू नये किंवा केस कापू नये.
जरूरतमंद लोकांना भोजन, वस्त्र, अन्न व आवळे दान करा.

Amalaki Ekadashi
27 February 2026 Amalaki Ekadashi Vrat Shubh Muhurt Puja Vidhi Paarn Mantra

आमलकी एकादशी व्रत लाभ:
व्रत केल्याने पापाचा नाश होतो, मोक्ष प्राप्ती व सात्विक जीवन मिळते.
स्वास्थ्य, संतान सुख, धन-धान्य व पारिवारिक शांति मिळते.
विशेष उपाय: आवळ्याच्या वृक्षाची पूजा, विष्णु मंत्र जप, दान व तुलसी अर्पण करा.
जर आवळा उपलब्ध नसेलतर तुळशी अर्पित करणे फलदायी आहे.
व्रत करताना सात्विक भोजन करा व दान जरूर करा.

आमलकी एकादशी भगवान विष्णु मंत्र:
ॐ नमो भगवते वासुदेवाय
ॐ नमो नारायणाय
ॐ विषणवे नम:
ॐ हूं विषणवे नम:
ॐ अं वासुदेवाय नम:
ॐ आं संकर्षणाय नम:
आमलकी एकादशी 27 फेब्रुवारी 2026 ह्या दिवशी भगवान विष्णु ह्यांची विधी पूर्वक पूजा अर्चा करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.