Swami Prakat Din 21 Days Prabhavi Seva In Marathi

Shri Swami Samarth Sewa
Shri Swami Samarth Prakat Din 21 Days Prabhavi Seva

स्वामी #प्रकटदिन 21 दिवसांची प्रभावी सेवा 28 फेब्रुवारी ते 20 मार्च सर्व मनोकामना पूर्ण होतील

Swami Prakat Din 21 Days Prabhavi Seva In Marathi

20 मार्च 2026 शुक्रवार ह्या दिवशी श्री स्वामी समर्थ ह्यांचा प्रकट दिन आहे. हा दिवस अत्यंत शुभ व महत्वाचा दिवस आहे. आपण 21 दिवसांची श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करायची ते पाहू या.

आपण जेव्हा महाराजांची सेवा करायचे ठरवतो तेव्हा अगदी मनापासून सेवा केली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. खर म्हणजे आपण सेवा कशा साठी करीत आहोत ते महाराजांना माहीत असते त्यांना काही सांगायची गरज नसते. श्री स्वामीची सेवा खूप जण करीत असत्तात व त्यांना सेवेचा प्रत्यय सुद्धा लगेच येतो फक्त आपण काही सोपे नियम पाळायचे आहेत. व श्रद्धेने सेवा करायची आहे.

आपण 21 दिवसांची सेवा 28 फेब्रुवारी पासून सुरू करून 20 मार्च पर्यन्त पूर्ण करू शकता. पण जर काही अडचणी मुळे म्हणजे जर आपली मासिक पाळी मध्ये येणार असेलतर आपण आज पासून ही सेवा सुरू करू शकता. म्हणजे 28 फेब्रुवारी च्या अगोदर 4 दिवस सेवा सुरू करू शकता.

आपण श्री स्वामी समर्थ ह्यांची सेवा करताना “श्री स्वामी समर्थ” ह्या मंत्राचा पाहिजे तितका रोज 21 दिवस जाप करू शकता, किंवा प्रभावी तारक मंत्राचा सुद्धा रोज पाहिजे तितका जाप करू शकता किंवा आपण स्वामींचे 21 अध्याय रोज पठन करू शकता, आपली जशी इछा असेल तशी आपण सेवा करू शकता.

आपल्याला 21 दिवसांची सेवा करताना रोज 11 माळ श्री स्वामी समर्थ ह्या प्रभावी मंत्राचा जाप करायचा आहे त्याच बरोबर 1 वेळा तारक मंत्र म्हणावयाचा आहे. आपण श्री स्वामी चरित्र सारामृतचे रोज 21 आध्यायांचे पठन करू शकता. 21 आध्याय पठन करण्यासाठी साधारणपणे दीड ते दोन तास लागतात.

पण आपण नोकरी करीत असाल किंवा अजून काही कामात असाल किंवा घरात लहान मुले असतील किंवा वृद्ध असतील तर आपल्याला एका वेळी 21 आध्याय पठन करणे शक्य नसेलतर किंवा रोज 7 आध्याय पठन करून 3 दिवसांत संपूर्ण सारामृत पठन करू शकता.

आपण रोज 3 आध्याय पठन करून 7 दिवसांत संपूर्ण सारामृत पठन करू शकता. पण आपण जेव्हा पठन करायला आसनावर बसतो तेव्हा तेव्हडे आध्याय पठन झाल्या शिवाय उठायचे नाही. त्यामुळे आधीच तसा संकल्प करा की आपण रोज किती आध्याय पठन करणार ते.

आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की 21 आध्याय पठन झाले की आपले एक पारायण पूर्ण झाले. आपण आधीच ठरवा की आपण किती पारायण करू शकता. व तेव्हडे पारायण आपण श्री स्वामी महाराजांच्या प्रकट दिना पर्यन्त पूर्ण करायचे आहे.
आपल्याला जेवहडी जास्त सेवा करणे शक्य आहे तेवहडी आपण सेवा करायची आहे. सेवा करताना फक्त एक नियम अगदी काटाक्षाने पाळाव्याचा आहे. तो नियम म्हणजे मांसाहार टाळायचा आहे. बाकी काही विशेष नियम नाहीत.

Shri Swami Samarth Sewa
Shri Swami Samarth Prakat Din 21 Days Prabhavi Seva

आपण मनापासून स्वामींची सेवा केली तर स्वामी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतील.
सेवा सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला एक संकल्प करायचा आहे. आपण संकल्प स्वामींच्या माठात जाऊन करू शकता किंवा घरीच स्वामीच्या समोर बसून सुद्धा संकल्प करू शकता. संकल्प करताना एक श्रीफळ म्हणजेच नारळ व थोडी खडीसाखर स्वामीच्या समोर ठेवून संकल्प करून मगच सेवा सुरू करायची आहे.
श्री स्वामी समर्थ ह्या प्रभावी मंत्राचा जाप करताना एका ग्लासमध्ये पाणी भरून ठेवा मग मंत्र जाप सुरू करा. मंत्र जाप झाल्यावर ते पवित्र पाणी घरातील व्यक्तिना तीर्थ महणून द्या किंवा घरातील पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स करा त्यामुळे शारीरिक रोग बरे होण्यास सुद्धा मदत होते.

आता आपण पाहू या संकल्प कसा करायचा.
सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून स्वामींच्या फोटो किंवा मूर्ती समोर आसन घालून बसावे व स्वतः ला गंध लाऊन घ्यावे. एका तांब्यात पाणी घ्यावे व ताम्हण व पळी घ्यावी. मग हातात पळीने पाणी घेऊन आपल्या मनातील मनोकामना मनातल्या मनात बोलून म्हणजेच स्वामींना सांगून आपण ही सेवा मनोकामना पूर्ण होण्यासाठी किती दिवस करीत आहोत ते सांगावे. मग हातातील पाणी ताम्हणात सोडावे.

आपल्याला श्री स्वामी समर्थ ह्यांची सेवा करायची असेलतर सोपे काही नियम पाळायचे आहेत.
* आपण ही सेवा सकाळी किंवा दिवस भरामद्धे कधी सुद्धा करू शकता. पण आपण रोज शक्यतो रोज नियमित त्याच वेळेला सेवा करावी. जर सकाळी स्नान झाल्यावर करणार असालतर रोज सकाळीच करा, किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी करणार असाल तर संध्याकाळी करा, रोज वेळत बदल करू नका.
* सेवा करताना स्वामींच्या फोटो किंवा मूर्ती समोर बसून दिवा व आगरबती लाऊन आसन घालून बसावे. आपले आसन कोणाला सुद्धा वापरायला देवू नये.
* सेवा सुरू केली की मांसाहार करू नये. पण आपल्या घरातील व्यक्तिना पाहिजे असेलतर बनवून द्यावा पण स्वतः सेवन करू नये. आपली सेवा पूर्ण करून मगच बनवावा.
* सेवा करताना मासिक पाळी आली तर 4 दिवस सेवा करू नये जर घरातील व्यक्ति वाचन करू शकत असतील तर त्यांना वाचन करू द्यावे म्हणजे आपल्या सेवे मध्ये खंड पडणार नाही. जर सूतक असेलतर तेवहडे दिवस सेवा करू नये. आपण जर बाहेर गावी जाणार असालतर आपण बाहेर सुद्धा वाचन करू शकता. जर आपली मासिक पाळी ह्या 21 दिवसांच्या मध्ये येणार असेलतर आपण ही सेवा 28 फेब्रुवारी तारखेच्या आता सुरू करू शकता
* सेवा करताना शुद्ध विचार ठेवावे, कोणची सुद्धा निंदा करू नये. घरातील वातावरण आनंदी ठेवावे त्यामुळे घरात सकारात्मकता येते.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.