Sankashti Chaturthi 2026 | Auspicious Timings, Puja Vidhi & 8 Powerful Remedies for Children’s Success

संकष्टी चतुर्थी 2026, Sankashti Chaturthi 2026
2 August Sankashti Chaturthi 2026 | Ganesh Puja, Moon Worship & Powerful Spiritual Remedies

Sankashti Chaturthi 2026 | Auspicious Timings, Puja Vidhi & 8 Powerful Remedies for Children’s Success

2 ऑगस्ट 2026 रविवार संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त, पूजाविधी व सुख-समृद्धी व मुलांच्या प्रगतीसाठी चमत्कारी उपाय

2 ऑगस्ट 2026 रविवार ह्या दिवशी संकष्टी चतुर्थी साजरी करायची आहे. ह्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आहे. आपण संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त, पूजाविधी, मुलांसाठी प्रगतीसाठी व सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी सोपे चमत्कारी उपाय करायचे आहेत ज्यामुळे विघ्नहर्ता गणेश स्वतः मार्ग दाखवतील व आपल्या जीवनात सुख समृद्धी व सौभाग्यचे आगमन होईल, ह्याची संपूर्ण माहिती बघणार आहोत.

हिंदू धर्मा मध्ये प्रतेक तिथीला खूप महत्व असते. त्याच बरोबर संकष्टी चतुर्थी ह्या दिवसाला भगवान गणेश ह्यांची आराधना करण्यासाठी खूप शुभ दिवस मानला जातो. ह्या दिवशी शुभ संयोग आहे. ह्या दिवशी भगवान गणेश ह्यांची पूजा अर्चा केल्याने सर्व संकट दूर होऊन जीवनात येणाऱ्या सर्व बाधा दूर होतात. त्याच बरोबर सुख-समृद्धीचा आशीर्वाद मिळतो.

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश व चंद्र देवाची पूजा अर्चा करणे शुभ मानले जाते. धार्मिक मान्यता अनुसार ह्या पावन तिथीला भगवान गणेश व चंद्र भगवान ह्यांची मनोभावे पूजा अर्चा केल्याने कुंडलीमधील चंद्र दोष दूर होतो. व व्रत केल्याने विशेष लाभ प्राप्त होऊन नकारात्मक प्रभाव कमी होतो.

संकष्टी चतुर्थी मुहूर्त व पूजा विधी:
संकष्टी चतुर्थी 2 ऑगस्ट 2026 रविवार तिथी प्रारंभ: 1 ऑगस्ट 2026 रात्री 11:08 वाजून तिथी समाप्ती 2 ऑगस्ट 2026 रात्री 11:14 मिनिट चंद्रोदय: रात्री: 9:24 मिनिट

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश ह्यांची विधी पूर्वक पूजा अर्चा करावी भगवान गणेश ह्यांच्या समोर तुपाचा दिवा, अगरबत्ती, 21 दूर्वाची जुडी, लाल जास्वंदीचे फूल व अक्षता अर्पित कराव्या. संध्याकाळी परत भगवान गणेश ह्यांच्या समोर दिवा अगरबत्ती लाऊन चंद्रोदय झाला की चंद्राला अर्ध्य द्या. भगवान गणेश ह्यांना मोदकाचा भोग दाखवून मग व्रत सोडावे.

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचे उपाय:
1. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी रात्री मुलांच्या प्रगतीसाठी व एकाग्रता वाढण्यासाठी भगवान गणेश ह्यांची आराधना करणे अत्यंत फलदायी मानले जाते. गणपती अथर्वशीर्ष श्रद्धापूर्वक म्हणावे त्यामुळे बुद्धीची स्मरणशक्ति वाढून सकारात्मकतामध्ये वृद्धी होते.

2. भगवान गणेश ह्यांना दूर्वा अर्पित करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. दूर्वा साफ व हिरव्यागार ताज्या घेऊन त्याची 11 किंवा 21 दूर्वाची जुडी बांधावी. दूर्वा अर्पित करताना मन एकाग्र व श्रद्धा पूर्वक ठेवावे. त्याच बरोबर गणेश मंत्रचा जाप करावा. त्यामुळे सर्व विघ्न दूर होतात व सुख समृद्धीचा आशीर्वाद मिळतो.

3. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संकटनाशन गणेश स्तोत्र श्रद्धा पूर्वक म्हणावे, त्यामुळे जीवनात सतत येणाऱ्या अडचणी दूर होतात व भगवान गणेश ह्यांची कृपा मिळते. हयनदिवाशी संकट नाशन स्तोत्र म्हणणे शुभ मानले जाते.
संकष्टी चतुर्थी च्या दिवशी मुलांच्या तल्लख बुद्धी व स्वास्थसाठी काही उपाय सर्वोत्तम आहेत.

4. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश ह्यांना 11 किंवा 21 दूर्वाची जुडी बनवून मुलांच्या हातांनी भगवान गणेश ह्यांना अर्पित करायला द्या व दूर्वा अर्पित करताना “ॐ गं गणपतये नमः” ह्या प्रभावी मंत्राचा जाप करायला सांगा.

संकष्टी चतुर्थी 2026, Sankashti Chaturthi 2026
2 August Sankashti Chaturthi 2026 | Ganesh Puja, Moon Worship & Powerful Spiritual Remedies

5. मुलांची सुरक्षा व उन्नतीसाठी हळदीच्या हळकुंडचा उपाय: एक हळकुंड घेऊन त्याला कलावा बांधून भगवान गणेश ह्यांच्या चरणाशी ठेवा.

6. हळकुंड भगवान गणेश ह्यांच्या चरणाशी ठेवल्यावर मग गंगाजलमध्ये वाटून त्याची एक पेस्ट बनवून मुलांच्या कपाळावर त्याचा तिलक लावावा असे केल्याने मुलांची नकारात्मक ऊर्जा पासून बचाव होऊन मुलांची प्रगती होते.

7. एकाग्रता व मानसिक शांतिसाठी कोणता भोग: पूजा करताना भगवान गणेश ह्यांना लांडूचा भोग ठेवून गरीब मुलांमध्ये किंवा लहान मुलीन मध्ये वाटून द्या. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.

8. स्वास्थ्य व दीर्घ आयुष्यसाठी: सकाळी स्नान झाल्यावर कुंकू भगवान गणेश ह्यांना अर्पित करा व ज्या बोटांनी भगवान गणेश ह्यांना तिलक लावला त्याच बोटांनी आपल्या मुलांच्या कपाळावर लावा. असे केल्याने मुलांचे स्वास्थ ठीक राहून दीर्घ आयुष प्राप्त होते.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.