मार्गशीर्ष चौथा गुरुवार उद्यापन कसे करावे, समजा मासिक पाळी आली किंवा सूतक आले काय करावे?
Margashirsh Guruvar Udyapan Kase Karave, Masik Pali Aali, Sutak Aale Kay Karawe? In Marathi
मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र मानला जातो. तसेच ह्या महिन्यातील गुरुवारचे महत्व सुद्धा आहे. मार्गशीर्ष महिना भगवान विष्णु व माता लक्ष्मीला समर्पित आहे. त्यांची पूजा अर्चा मनोभावे केल्याने आपल्याला निश्चित यश मिळून भगवान विष्णु व माता लक्ष्मीची कृपा होईल, घरात सुख समृद्धी येईल.
मार्गशीर्ष महिन्यात ह्या वर्षी 4 गुरुवार आहेत.
पहिला गुरुवार 27 नोव्हेंबर 2025
दूसरा गुरुवार 04 डिसेंबर 2025
तिसरा गुरुवार 11 डिसेंबर 2025
चौथा गुरुवार 18 डिसेंबर 2025
आपण मार्गशीर्ष महिन्यातील तिन्ही गुरुवार पूजा अर्चा व व्रत केले आहे व आता चौथ्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचे आहे.
आता आपण उद्यापन कसे करावे ते पाहू या:

Margashirsh Guruvar Udyapan Kase Karave, Masik Pali Aali, Sutak Aale Kay Karaweगुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून घराच्या मुख्य दरवाजा समोर सडा रांगोळी काढावी. त्याचा बरोबर घरचा मुख्य दरवाजा सुद्धा साफ करून आंब्याच्या पानाचे तोरण लावावे, आंब्याच्या पानाचे तोरण लावणे खूप शुभ मानले जाते त्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते.
मग गुरुवारच्या पूजेची मांडणी करून घ्या, प्रथम गणेश पूजन,
महालक्ष्मी पूजन व कलश पूजन करून समईची पूजा, तुपाच्या दिव्याची पूजा, घंटीचीपूजा करून, नेवेद्य म्हणून गोड पदार्थ ठेवावा, महालक्ष्मी माताची ओटी भरावी, ओटी कशी भरायची त्याचा विडिओ ह्या अगोदरच प्रकाशित केला आहे.
गुरुवारची महालक्ष्मी माताची पूजा झाल्यावर कहाणी वाचावी व आरती म्हणावी. संध्याकाळी सुवासनिना किंवा कुमारिकांना हळदी कुंकूला बोलवावे, विवाहित महिलांची ओटी भरावी, फळ, प्रसाद द्यावा, कहानीचे एक एक पुस्तक दयावे त्यामुळे पुण्य मिळते.
मग आरती करून गोडाचा नेवेद्य दाखवावा उपवास सोडवा व दुसऱ्या दिवशी सकाळी दिवा लाऊन गूळ-खोबरे ठेवून नमस्कार करून पूजा विसर्जित करावी, कलशा मधील जल घरात शिपडावे, नारळ व फुले नदीमध्ये विसर्जित करावी.
तसेच चौथ्या गुरुवारी मासिक पाळी आली तर चौथ्या गुरुवारी उद्यापन नकरता पाचव्या गुरुवारी उद्यापन करावे, पण उपवास करावा मोबाइलवर कथा आईकली तरी चालू शकते. उद्यापन केल्या शिवाय आपले मार्गशीर्ष महिन्याचे महालक्ष्मी माताचे व्रत पूर्ण होत नाही. तर तुम्ही म्हणताल पौष महिना चालू होत आहे. तर पौष महिना असला तरी चालेल उद्यापन करावे. तर 1 जानेवारी 2026 ह्या दिवशी उद्यापन करावे.
जर चौथ्या गुरुवारी आपल्याला सूतक लागले आहे. तर उद्यापन आपण पाचव्या गुरुवारी म्हणजे 1 जानेवारीला करावयाचे आहे. जर आपल्याला तिसऱ्या गुरुवारी व चौथ्या गुरुवारी सुद्धा सूतक आहे. तर आपण 1 जानेवारी 2026 व 8 जानेवारी 2026 ह्या दोन्ही गुरुवारी पूजा मांडून उपवास करून व्रत करावयाचे आहे व 8 जानेवारी ह्या दिवशी उद्यापन करावयाचे आहे. कारण की ह्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात 4 गुरुवार आले आहेत व आपले चारही गुरुवार व्रत होऊन चौथ्या गुरुवारी उद्यापन झाले पाहिजे. तरच आपले मार्गशीर्ष महिन्याचे व्रत पूर्ण होऊ शकते.