14 जानेवारी 2026 बुधवार मकर संक्रांत व षटतीला एकादशी शुभ संयोग आहे काय करावे?
14 January 2026 Makar Sankranti & Shattila Ekadashi Shubh Sanyog Kay Krarawe?
नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती व त्याच दिवशी नवीन वर्षातील षटतीला एकादशी आहे. त्यामुळे 14 जानेवारी 2026 बुधवार ह्यादिवशी येणारी मकर संक्रांती व षटतीला एकादशी खूप खास आहे. आता आपण ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घेवू या.
दरवर्षी पौष महिन्यात कृष्ण पक्ष ह्या तिथीला एकादशी साजरी केली जाते. ही ह्या वर्षातील पहिली एकादशी आहे. ह्या दिवशी भगवान विष्णुची पूजा व तीळ वापरुन सहा कर्म केली जातात त्यामध्ये स्नान, उटण, हवन, तर्पण, दान व भोजन करण्याचे विशेष महत्व आहे. आपल्याला माहिती आहेच एकादशी व्रत केल्याने सर्व पापान पासून मुक्ती मिळते, दारिद्रता दूर होऊन सुख-समृद्धी प्राप्त होते.
आता आपण पाहू या षटतीला एकादशी शुभ वेळ व मकर संक्रांती शुभ वेळ कोणती आहे.
नवीन वर्षातील पहिली एकादशी कधी आहे?
14 जानेवारी 2026 बुधवार ह्या दिवशी आहे. हा दिवस पौष महिन्यात कृष्ण पक्ष एकादशी ह्या तिथीला साजरा करतात. दरवर्षी नवीन वर्षातील पहिली एकादशी ही षटतीला एकादशी असते. षटतीला एकादशी ही भगवान विष्णु ह्यांना समर्पित असून पवित्र आहे. ह्या दिवशी तीळ दान, स्नान व पूजा करतात त्यामुळे पुण्य प्राप्ती होऊन पापांपासून मुक्ती मिळते.
षट्तिला एकादशी मुहूर्त:
ब्रह्म मुहूर्त- सकाळी 05:27AM पासून सकाळी 06:21 पर्यन्त
अभिजीत मुहूर्त- काही नाही
सर्वार्थ सिद्धि योग- सकाळी 07:15 पासून 03:03 सकाळी पर्यन्त (15 जानेवारी)
अमृत सिद्धि योग- सकाळी 07:15 पासून 03:03 सकाळी पर्यन्त (15 जानेवारी)
गण्ड योग- सकाळी 07:56 पर्यन्त
षट्तिला एकादशी पारण वेळ 2026:
14 जानेवारी ला जे लोक षटतीला एकादशीचे व्रत ठेवतील त्यांनी व्रत पारण 15 जानेवारी गुरुवार सकाळी 7:15 मिनिट पासून 9:21 पर्यन्त करू शकतात. ह्या दिवशी द्वादशीचे समापन रात्री 8:16 ह्या वेळी होणार आहे.
मकर संक्रांती कधी आहे?
पंचांग अनुसार सूर्य 14 जानेवारी 2026 दुपारी 3 वाजून 06 मिनिटला धनू राशी मधुन मकर राशी मध्ये प्रवेश करीत आहे. म्हणून मकर संक्रांती 14 जानेवारी 2026 बुधवार ह्या दिवशी साजरी करायची आहे. ह्या दिवशी पुण्य योग आहे त्यामुळे आपली अडलेले कामे पूर्ण होऊन भगवान विष्णु व सूर्य देवाची कृपा मिळेल.

मकर संक्रांती 2025 दान पुण्य शुभ मुहूर्त?
14 जानेवारी 2026 दुपारी 3 वाजून 06 मिनिट पासून दुपारी 6 वाजून 19 मिनिट पर्यन्त उत्तम मुहूर्त आहे.
ब्रह्म मुहूर्त सकाळी 4 वाजून 51 मिनिट पासून 5 वाजून 45 मिनिट पर्यन्त स्नान दान पुण्य साठी
मकर संक्रांती ह्या दिवशी एकादशी असलीतरी सुगड पूजन नेहमी प्रमाणे करायचे आहे. एकादशीचा उपवास करून प्रसाद म्हणून तिळगूळ खावू शकता.
मकर संक्रांती ह्या दिवशी हळदी कुंकू करताना महिलांना उपयोगी पडणाऱ्या वस्तु द्याव्यात. मकर संक्रांती ह्या दिवशी विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. सूर्य देवाला अर्ध्य जारून द्यावे.
