1 फेब्रुवरी 2026 रविवार माघ पूर्णिमा शुभ मुहूर्त पूजा कधी करावी, 9 तास भद्राची सावली काय करावे
Magh Purnima 2026 Shubh Muhurat, Mahatva, Puja Vidhi In Marathi
1 फेब्रुवरी 2026 रविवार ह्या दिवशी माघ पूर्णिमा व्रत करायचे आहे. पंचांग नुसार रविवारी माघ पूर्णिमा स्नान व दान करावे. हमाघ पूर्णिमा ह्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, व रवी पुष्य योग आहे. ह्या योगा मध्ये दान, यगन्न, स्नान, व व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.
1 फेब्रुवारी 2026 रविवार ह्या दिवशी सकाळी 5:52 मिनिट पासून पूर्णिमा प्रारंभ होत असून पूर्णिमा समाप्ती 2 फेब्रुवरी 2026 सोमवार ह्या दिवशी सकाळी 3:38 समाप्त होत आहे. माघ पूर्णिमा ह्या दिवशी पूर्ण दिवस व्रत, व दान करणे जेव्हडे जरुरीचे आहे तेवहडेच महत्व स्नान ह्यासाठी सुद्धा आहे. असे म्हणतात की ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने सर्व पापन पासून मुक्ती मिळते.
1 फेब्रुवरी 2026 रविवार पूर्णिमा आहे त्या दिवशी भद्राची सावली आहे. आता आपण पाहू या की माघ पूर्णिमा पूजा शुभ मुहूर्त कोणता आहे.
माघ पूर्णिमा ह्या दिवशी 9 तास भद्राची सावली आहे. त्यामुळे ह्या वेळेत पूजा करू नये. हिंदू पंचांग नुसार सकाळी 07:09 ते 04:42 ह्या वेळेत भद्रा आहे. ह्या दिवशी चंद्र कर्क राशी मध्ये येणार आहे. जेव्हा चंद्र कर्क राशी मध्ये येतो तेव्हा पृथ्वी वर भद्रा असतो.
माघ पूर्णिमा पूजा शुभ मुहूर्त:
ब्रह्म मुहूर्त सकाळी 05:24 ते 06:17
गोधुली मुहूर्त: 05:58 ते 06:24
अमृत काल: 05:59 ते 07:29
माघी पूर्णिमा पूजा विधी:
माघी पूर्णिमा ह्या दिवशी विधी पूर्वक लक्ष्मी नारायणची पूजा केली पाहिजे. ह्या दिवशी भगवान विष्णु ह्यांना पिवळी फुले, पिवळी फळ व पिवळे वस्त्र अर्पित करावे. माता लक्ष्मीला गुलाबी किंवा लाल रंगाचे फूल व शृंगारचे सामान अर्पित करावे.
माघ पूर्णिमा ह्या दिवशी सत्यनारायणपूजा करून सत्य नारायण कथा आइकावी त्यामुळे पुण्य मिळते.
माघ पूर्णिमा ह्या दिवशी ब्रह्म मुहूर्तवर पवित्र नदीमध्ये स्नान करणे महत्वाचे मानले जाते. जर नदीमध्ये स्नान करणे शक्य नसेलतर घरीच अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकावे.
सूर्य भगवान ह्यांना अर्ध्य द्यावे. संपूर्ण दिवशी उपवास करून लक्ष्मी नारायणची पूजा करावी. त्यामुळे सुख संपत्ति प्राप्त होते.
माघ पूर्णिमा ह्या दिवशी ॐ नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जाप करावा. जरूरत मंद लोकांना दान द्यावे. संध्याकाळी चंद्र दर्शन घेऊन अर्ध्य द्यावे.
पूर्णिमा ह्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पित करून हळद-कुंकू अर्पित करावे व तुपाचा दीवा लावावा, पिंपळाच्या वृक्षामध्ये ब्रह्मा-विष्णु-महेश ह्यांचा वास असतो.

माघ पूर्णिमा दान करण्याचे महत्व:
माघ पूर्णिमा ह्या दिवशी दान करण्याचे विशेष महत्व आहे. दान केल्याने जीवनात धन, धैर्य व शांती मिळते.
गरीब लोकांना अन्न, वस्त्र, जल व धन-धान्य दान करणे शुभ मानले जाते.कंबळ किंवा तीळ दान केल्याने पुण्य मिळते. परिवाराची वृद्धी होत असून सकारात्मकता येते.
