Sarvat Shaktishali Hanuman Ji Upay, Fakt 1 Divas Karun Sodun Dya In Marathi
हनुमानजीनचा सर्वात शक्तिशाली उपाय, फक्त 1 दिवस करून सोडून द्या, मनोकामना व अडलेली कामे पूर्ण
आपल्या जीवनात अनेक वेळा काही परेशानी, अडचणी, आजारपण येतात मग काय करावे समजत नाही. त्यासाठी हनुमानजीनचा शक्तिशाली हा उपाय मंगळवारी किंवा शनिवारी करून पहा, आपल्याला हनुमानजी सर्व संकटातून मुक्त करतील. आपल्याला माहिती असेलच भगवान हनुमान शक्तिशाली व चिरंजीवी आहेत.
भगवान श्री राम ह्यांचे नाव घेतलेकी हनुमानजी तेथे हजर असतात कारणकी हनुमान जी श्री राम ह्यांचे परम भक्त आहेत. जेथे श्रीराम तेथे श्री हनुमान असतात. आपण कोणत्या कठीण प्रसंगात असाल, किंवा संकटा मध्ये असाल किंवा कोणत्या अडिअडचणी मध्ये असला तर
आपल्याला फक्त मंगळवारी पुढे दिलेला अगदी सोपा उपाय करायचा आहे. आज मंगळवार आहे आज आपण हा लेख वाचाल तर मंगळवारी हा उपाय करू शकता किंवा बुधवार गुरुवार हा उपाय वाचला तर शनिवारी हा उपाय करू शकता.
मंगळवारी हा उपाय करताना सकाळी किंवा संध्याकाळी सुद्धा करू शकता. हनुमान जीनचा हा उपाय करताना स्वच्छ स्नान करून किंवा तोंड-हात-पाय धुवून, स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या घरातील पूजा घरा समोर आसन घालून बसावे. आपल्या समोर हनुमानजीनची मूर्ती किंवा पंचमुखी हनुमान जीनचा फोटो ठेवावा, हनुमान जीनचे मनोभावे स्मरण करावे.
आपल्या समोर एक काचेच्या ग्लासमध्ये जल घ्यावे, एक वही घ्यावी व लाल शाई असलेले लाल रंगाचे पेन घ्यावे. मग श्री राम व हनुमानजीनचे स्मरण करून दिवा अगरबत्ती लाऊन मग वही च्या पानावर वरती पहिल्यांदा धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद किंवा श्री राम, श्री राम, श्री राम किंवा युनिव्हर्स, युनिव्हर्स, युनिव्हर्स असे 3 वेळा लिहावे.
त्यानंतर वही मध्ये 108 वेळा राम, राम, राम असे लिहावे. मी 51 वेळा लिहिले आहे पण तुम्हाला 108 वेळा लिहायचे आहे. 108 वेळा राम राम लिहिताना तोंडांनी म्हणावे व लिहावे. त्यानंतर वही समोर काचेचा पाणी भरलेला ग्लास ठेवावा. आपण आपल्या उजव्या हातात ग्लास घेऊन 5 वेळा हनुमान चाळीसा म्हणायची आहे. ग्लास आपण उजव्या हातात घेऊ शकता किंवा समोर ठेवून मधून मधून त्याला हातांनी स्पर्श करू करून हनुमान चाळीसा म्हणू शकता. हनुमान चाळीसा म्हणतात हनुमान जिना आपला प्रॉब्लेम सांगा व त्यामधून आपल्याला सुखरूप बाहेर काढा म्हणून प्रार्थना करा. मग 5 वेळा हनुमान चाळीसा मनोभावे म्हणा. मग आपला प्रॉब्लेम सुटला आहे हनुमान जिनि आपल्याला सुखरूप बाहेर काढले आहे असे फील करा.

आता काचेच्या ग्लास मधील पाणी आपण हळू हळू सेवन करा. किंवा सेवन करायचे नसेलतर झाडाला अर्पण करू शकता. एक लक्षात ठेवा एका प्रॉब्लेम साठी एक मंगळवार हा उपाय करायचा आहे एकदम सगळे प्रॉब्लेम सांगून संकल्प करायचा नाही. दूसरा प्रॉब्लेम असेलतर पुढील मंगळवारी हा उपाय परत करायचा आहे.
आपण हा हनुमानजीनचा उपाय दुसऱ्या व्यतिसाठी सुद्धा करू शकता. उपाय झाल्यावर ते जल त्या व्यक्तीला सेवन करायला द्या. आपला संकल्प पूर्ण झाल्यावर हनुमान जी व श्री राम ह्यांना नमस्कार करा व आपला प्रॉब्लेम सुटला म्हणून धन्यवाद करा. मग राम नाम लिहिलेला कागद फोल्ड करून मंदिरात ठेवावा.
