5 February 2026 Magh Sankashti Chaturthi Sampurn Mahiti In Marathi

5 February 2026 Magh Sankashti Chaturthi
5 February 2026 Magh Sankashti Chaturthi Sampurn Mahiti

5 फेब्रुवारी गुरुवार 2026 माघ (माघी) संकष्टी चतुर्थी खूप महत्वाची गणेश पूजन कसे करावे? शुभ मुहूर्त व मंत्र

5 February 2026 Magh Sankashti Chaturthi Sampurn Mahiti In Marathi

5 फेब्रुवरी 2026 गुरुवार माघ संकष्टी चतुर्थी आहे. माघ महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थीचे खूप महत्व आहे. आज आपण माघ संकष्टी चतुर्थीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

5 फेब्रुवरी 2026 गुरुवार आहे, ह्या दिवशी संकष्टी चतुर्थी आहे व गुरूंचा वार सुद्धा आहे. आपण आपल्या गुरूनचे व्रत करती असाल व संकष्टीचे सुद्धा व्रत करीत असाल तर काय करावे? आपण गुरुवारचे दोन्ही व्रत एकाच वेळी करू शकत नाही.

आपण प्रतेक गुरुवारी स्वामींची सेवा करीत असाल तर आपण ती सेवा नेहमी प्रमाणे पूर्ण करायची आहे. जर आपण स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत करीत असाल तर त्यामधील ह्या गुरुवारचे व्रत काऊंट करायचे नाही, आपण अजून पुढचा एक गुरुवारचे व्रत करायचे आहे म्हणजे आपले 11 गुरुवारचे व्रत सुद्धा पूर्ण होईल.

आता आपण पाहू या माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे व्रत कसे करायचे. आपण सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून पूजा करून स्वामींची सेवा पूर्ण करून मग श्री गणेश भगवान ह्यांची पूजा अर्चा करायची आहे.

हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला खूप महत्व आहे, ते सुद्धा माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी विशेष महत्वाची मानली आजे. आपण कोणत्या सुद्धा शुभ कार्याची सुरुवार भगवान गणेश ह्यांची पूजा करून मगच करतो. प्रतेक चतुर्थीला गणेश भक्त गणपती बाप्पाची आपल्या परीने पूजा अर्चा करतो. गणपती बाप्पाही बुद्धीचे देवता आहेत. गणेश व्रतामध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्वात उच मानले जाते.

संकष्टी चतुर्थीचे व्रत कोणीही करू शकतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून दिवसभर उपवास ठेवावा. मग संध्याकाळी चंद्र दर्शन घेऊन गणपती बाप्पा ची आरती महणून भोग दाखवावा मग उपवास सोडावा.

सर्व प्रथम गणपती बाप्पाना जल किंवा दूध किंवा पंचामृतनी अभिषेक घालावा, मग हळद-कुंकू, अक्षता अर्पित कराव्या, लाल रंगाचे जास्वंदीचे फूल अर्पित करावे, 21 दुर्वाची जुडी अर्पित करावी, दूर्वा गणपती बाप्पाना अतिप्रिय आहेत. प्रसाद महणून गोड पदार्थ ठेवावा, पुढे दिलेला मंत्र 108 वेळा म्हणावा.
मंत्र: ॐ गं गणपतये नम:
मग 5 वेळा अर्थवशीर्ष मनोभावे म्हणावे
मग गणपती बाप्पाचे नामस्मरण करून आरती म्हणून प्रसाद वाटावा.

माघ संकष्टी चतुर्थी चंद्रोदय वेळ: रात्री 9 वाजून 43 मिनिट

5 February 2026 Magh Sankashti Chaturthi
5 February 2026 Magh Sankashti Chaturthi Sampurn Mahiti

जर आपणाला उपवास सोडायचा आहे पण चंद्रोदय होई पर्यन्त थांबू शकत नसाल तर त्या अगोदर उपवास सोडून मग चंद्र दर्शन घ्यावे.

आपण एक सोपं उपाय सुद्धा करू शकता, आपण चंद्र दर्शन होई पर्यन्त थांबू शकत नसाल तर घरातील देवघरा समोर एका स्टीलच्या छोट्या प्लेट मध्ये कुंकूची पेस्ट बनवून एका छोट्याश्या प्लेट मध्ये अर्ध चंद्र काढून हळद-कुंकू अक्षता अर्पित करून दिवा आगरबती लाऊन गणपती बाप्पाची आरती महणून नेवेद्य दाखवून उपवास सोडावा.

 

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.