मार्गशीर्ष गुरुवार चमत्कारी उपाय मुलांची अभ्यासात प्रगती, विवाह जुळेल, नोकरीत मुलांची व पतीची प्रगती होऊन कृपा मिळेल
गुरुवार व्रत केले नाही तरी चालेल
Margashirsha Guruvar Chamatkari Upay For Children In Marathi
मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र मानला जातो. तसेच ह्या महिन्यातील गुरुवारचे महत्व सुद्धा आहे. मार्गशीर्ष महिना भगवान विष्णु व माता लक्ष्मीला समर्पित आहे. त्यांची पूजा अर्चा मनोभावे केल्याने आपल्याला निश्चित यश मिळेल. त्याच बरोबर काही सोपे उपाय केलेतर आपल्या मुलांची अभासात प्रगती होईल, विवाह जुळेल, नोकरीमध्ये मुलांची व पतीची प्रगती होईल व भगवान विष्णु व माता लक्ष्मीची कृपा होईल, घरात सुख समृद्धी येईल.
मार्गशीर्ष महिन्यात ह्या वर्षी 4 गुरुवार आहेत. आपण चार गुरुवार पैकी कोणत्या सुद्धा गुरुवारी किंवा चारही गुरुवारी ही उपाय करू शकता.
पहिला गुरुवार 27 नोव्हेंबर 2025
दूसरा गुरुवार 04 डिसेंबर 2025
तिसरा गुरुवार 11 डिसेंबर 2025
चौथा गुरुवार 18 डिसेंबर 2025
मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी केले जाणारे उपाय कोणते आहेत पाहू या. ही उपाय करण्यासाठी आपल्याला व्रत केले पाहिजे असे नाही.
गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. स्नान करताना पाण्यात एक चिमूट हळद घाला.
घरातील देवघर स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे.
चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरूण भगवान विष्णु व माता लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी.
भगवान विष्णु ह्यांची मनोभावे पूजा करून पिवळ्या रंगाचे फूल अर्पित करावे.
भगवान सत्यनारायण ह्यांची कथा आइकावी.
भगवान विष्णुना गूळ, चणे व पिवळ्या रंगाचे फूल अर्पित करावे.
घराच्या मुख्य दरवाजा जवळ रांगोळी व स्वस्तिक काढावे व दिवा लावावा.
कोणाला सुद्धा पैसे उधार देवू नयेत.
मार्गाशीष महिन्यात विष्णु सहस्त्रनाम, भगवत गीता व गजेन्द्र मोक्ष ह्याचे वाचन करावे.
ब्राह्मण च्या कडून पितृ तर्पण व पितृ पूजा करावी.
गुरुवार ह्या दिवशी चुकून सुद्धा केस किंवा नख कापू नये.
गुरुवारच्या दिवशी कोणाची सुद्धा निंदा करू नये.
आपले माता-पिता, बहीण, भाऊ, कन्या ह्याचा अनादर करू नये.

मान्यता अनुसार मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवर येते व असे म्हणतात की ह्या दिवशी ज्या घराची साफ-सफाई होते तेथे माता लक्ष्मी वास करते. म्हणून आपले घर नेहमी स्वच्छ ठेवा.
गुरुवारच्या दिवशी आपले घराचे मुख्य दार व समोरील आंगण स्वच्छ करून रांगोळी काढा. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. गुरुवारच्या दिवशी मुख्य दरवाजा जवळ माता लक्ष्मीची पावल काढायला विसरू नका कारण पावल काढण खूप शुभ मानले जाते. त्यामुळे धनप्राप्ती होते.
माता लक्ष्मीची कृपा मिळण्यासाठी माता लक्ष्मी व भगवान विष्णु ह्यांची विधीपूर्वक पूजा करावी. ह्या दिवशी माता लक्ष्मीला खीरचा नेवेद्य दाखवावा त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते व भगवान विष्णु ह्यांना चणे व गूळचा भोग दाखवावा.
केळीच्या वृक्षाला जल अर्पित करावे. तसेच तुळशीला सुद्धा जल, हळद व कचे दूध अर्पित करावे.
मार्गाशीष महिन्यातील गुरुवारी गाईला गूळ, चनाडाळ हळद मिक्स करून सेवन करायला द्यावे त्यामुळे भगवान विष्णु ह्यांची कृपा मिळते गाईला कुंकवाचा टिळा लाऊन तिची पूजा केल्याने जीवनातील सर्व परेशानी दूर होतात.
आपण अजून एक सटीक उपाय करू शकता. आपल्याला एक पिवळ्या रंगाचे वस्त्र किंवा रुमाल घ्यायचा आहे. मग त्यामध्ये मूठभर चनाडाळ, 2 हळकुंड, 2 कॉईन, 2 तुळशीची पाने, 2 सुपारी घेऊन त्याची एक पोटली बांधायची व त्या पोटलीला मुलाचा हात लाऊन ती पोटली लक्ष्मी नारायण मंदिरात ठेवायची आहे.
आपण शिवलिंगवर चनाडाळ अर्पित करू शकता तसेच गाईला गूळ व केळे देवू शकता.
गुरुवारी दीप दान करण्याचे खूप महत्व आहे. त्याच बरोबर लक्ष्मी माताचा कोणता सुद्धा प्रभावी मंत्र जाप करावा.