मार्गशीर्ष मास 2025 गुरुवार महालक्ष्मी व्रत कसे करावे, नियम व लाभ संपूर्ण माहिती
Margashirsha Guruvar 2025 Mahalakshmi Vrat Kaise Kare Full Information In Marathi
हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यात प्रतेक गुरुवारी माता लक्ष्मी व भगवान विष्णु ह्यांची पूजा केली जाते. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी मनोभावे पूजा अर्चा करून संपूर्ण दिवस उपवास केला जातो. ह्या वर्षी 4 गुरुवार आहेत.
मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताची तारीख व संपूर्ण माहिती व पूजा विधी काय आहे तसेच कोणते सोपे नियम आहेत ते आपण पाहूया.
मार्गशीर्ष महिन्याच्या प्रथम गुरुवार पासून कलश मांडून व्रत करायचे आहे असे चारही गुरुवारी करायचे आहे व संध्याकाळी कहाणी वाचून आरती करून नेवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे. शेवटच्या गुरुवारी उद्यापन करून कुमारिका व महिलांना घरी हळदी-कुंकूसाठी बोलवून त्यांना एक एक काहणीचे पुस्तक द्यायचे आहे. मार्गशीर्ष गुरुवारी असे केल्याने घरात सुख-समृद्धी-शांती राहते व महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते. आपण ही व्रत फक्त मार्गशीर्ष गुरुवारी किंवा संपूर्ण वर्षभर सुद्धा करू शकता.
मार्गशीष महिना ह्या वर्षी 21 नोव्हेंबर 2025 गुरुवार पासून प्रारंभ होत असून 20 डिसेंबर 2025 शनिवार ह्या दिवशी समाप्ती होत आहे.
पहिला गुरुवार 27 नोव्हेंबर 2025
दूसरा गुरुवार 04 डिसेंबर 2025
तिसरा गुरुवार 11 डिसेंबर 2025
चौथा गुरुवार 18 डिसेंबर 2025
लक्ष्मी माताची कृपा नेहमी आपल्यावर राहावी, तिचा सहवास नेहमी आपल्या घरात रहावा आपला संसार सुख समधानाचा व्हावा म्हणून मार्गशीष महिन्यातील गुरवारचे हे व्रत दरवर्षी करावे किंवा जमल्यास वर्षभर सुद्धा करावे.
मार्गशीष महिन्यातील गुरुवारची महालक्ष्मी माता पूजा अगदी सोप्या पद्धतीने कशी करावी:
* गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून निर्मल मनाने पूजेला बसावे. संपूर्ण दिवस उपवास करावा संध्याकाळी गोडाचा नेवेद्य दाखवून गाईला घास देवून मग आपण उपवास सोडावा.
* प्रथम आपल्या घराच्या मुख्य दरवाजा समोर सडा रांगोळी घालावी त्यामध्ये छान रंग भरावे व लक्ष्मीची पावल काढावी.
* पूजा मांडताना एक गोष्ट लक्षात ठेवा देवी आईचे मुख पूर्व किंवा उत्तर ह्या दिशेला असावे.
* आपण पूजा जेथे मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करावी तेथे चौरंग ठेवावा. चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र घालावे. चौरंगच्या बाजूनी रांगोळी काढून त्यामध्ये रंग भरून त्यावर हळद-कुंकू घालावे.
* चौरंगावर तांदळाची किंवा गव्हाची रास ठेवावी. मग त्यावर कलश ठेवावा. कलशाला पाच बाजूनी हळद कुंकू ची बोटे लावावी. त्यामध्ये पाच प्रकारची पाच-पाच पाने ठेवावी (आंब्याची, जास्वंदी, कण्हेर, चाफा, अशोका) कलशमध्ये पाणी घालून, हळद-कुंकू, अक्षता, फूल, एक सुपारी, दूर्वा, कॉईन घालावे. मग त्यावर एक नारळ ठेवावा. नारळाला हळद-कुंकू, अक्षता, फूल वाहावे. कलशाला देवीचा मुखवटा व वस्त्र घालावे म्हणजे कलशाला देवीचे रूप येते. त्यावर फुलाची वेणी व चुनरी घालावी. जर आपल्याला मुखवटा व वस्त्र घालायचे नसेल तर श्रीफल घेऊन त्याला हळद-कुंकू, अक्षताफूल, गजरा किंवा फुलाची वेणी घालावी.

* कलशाच्या बाजूला तांदळाची रास करून गणपती व लक्ष्मीची मूर्ती ठेवावी. किंवा फोटो असेलतर फोटो ठेवावा. फोटोला हळद-कुंकू, अक्षता व फुलांचा हार घालावा. बाजूला लक्ष्मी यंत्र ठेवावे. त्याची पूजा करावी.
* बाजूला 5 फळे ठेवावी. दूध व साखर वाटीमद्धे ठेवावे. दोन विडयाची पाने ठेवून त्यावर खारीक, खोबरे,हळकुंड,सुपारी,बदाम व एक कॉईन ठेवावे. हे कॉईन चारी गुरुवार पूजेमद्धे ठेवावे मग आपल्या तिजोरीमध्ये ठेवावे. बाजूला तेलाचा अखंड दिवा लावावा. तुपाचे निरांजन व आगरबत्ती लावावी.
* लक्ष्मी माताच्या पूजेची मांडणी झाल्यावर प्रथम मनोभावे प्रार्थना करावी. मग आरती म्हणून कहाणी वाचावी. कहाणी वाचताना आजूबाजूच्या लोकांना बोलवावे. संध्याकाळी गोडचा नेवेद्य दाखवून उपवास सोडावा.
* शुक्रवारी सकाळी कलाशतील पाणी घरामध्ये शिंपडावे. व बाकीचे पाणी तुळशीला घालावे. पाने-फुले बाजूला काढून ठेवावी. तांदूळ आपण वापरावे.
* पूजेतील नारळ तसाच ठेवावा कारण आपल्याला चारी गुरुवारी तोच नारळ वापरायचा आहे. चारी गुरुवारी अश्या प्रकारे पूजा मांडून घ्यावी. शेवटच्या गुरुवारी 7 कुमारिकांना किंवा सुवासिनिना हळद कुंकूसाठी बोलवावे. त्यांना लक्ष्मी व्रताची एक एक प्रत, फळ व दूध देवून हळद-कुंकू द्यावे.
* मग दुसऱ्या दिवशी सर्व फुले नदीमध्ये विसर्जित करावे.
मार्गाशीष महालक्ष्मी माताची अश्या प्रकारे पूजा अर्चा करून लक्ष्मी माताची कृपा प्राप्त होते. माता लक्ष्मीचे व्रत करताना काटेकोर पणे नियम पाळा.
मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे नियम:
मार्गशीर्ष गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे मनोभावे पूजा अर्चा करावी. घरातील वातावरण शांत ठेवावे.
मार्गशीर्ष गुरुवारी सात्विक भोजन करावे.
गुरुवारी दान धर्म करण्याचे विशेष महत्व आहे.
मार्गशीर्ष महिन्यातील चारही गुरुवारी व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे.
गुरुवारी जर मासिक पाळी आली तर पूजा घरातील दुसऱ्या व्यक्ति करून करून घ्यावी.
गुरुवारी केस कापणे, नखे कापणे टाळावे, असे म्हणतात की ह्या दिवशी केस किंवा नख कापली तर बृहस्पति ग्रहाचा कोप होतो.
मार्गशीर्ष महिन्यात शक्यतो शुभ कार्य टाळावे, कोणाची सुद्धा निंदा करू नये.
मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचे व्रत करण्याचे फायदे:
मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचे व्रत केल्याने विवाहिक आयुष्य सुखी समाधानी जाते, आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात, घरात शांती व समृद्धी येते, महिलांनी वरील नियमांचे पालन केल्यास व्रत केल्याचे पुण्य मिळून फलदायी होते.