Tips For Making Shankarpali Shakkarpara Diwali Faral in Marathi

Tips for making shankarpali
Tips for Shankarpali or Shakkarpara

टिप्स फॉर खुसखुशीत शंकरपाळे किंवा शंकरपाळी दिवाळी फराळ बनवण्यासाठी 

दिवाळी जवळ आली की महाराष्टमधील महिलांची धांदल सुरू होते ते म्हणजे दिवाळी फराळ बनवण्यासाठी. मग आपण यूट्यूब चॅनल पाहतो किंवा वेबसाइट पहातो किंवा ब्लॉग पहातो व नवीन काही किंवा पारंपारिक दिवाळी फराळ रेसीपी कश्या बनवायच्या ते पाहतो.

आपण ह्या अगोदर टिप्स फॉर दिवाळी फराळ किंवा दिवाळी पदार्थ बिघडला तर काय करायचे ह्याचे विडियो किंवा माहिती प्रकाशित केलेली पहिली असेलच. त्या सर्व टिप्सची लिंक मी खाली देत आहे तेथे आपण लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

The Tips For Making Shankarpali Diwali Faral can of be seen on our YouTube Channel Tips For Making Shankarpali

आपण दिवाळी फराळमध्ये लाडू, करंजी, चिवडा, शेव, चकली शंकरपाळी बनवतो. त्याचे असंख्य प्रकार आमच्या Royal Chef Sujata ह्या साईटवर पाहायला मिळतील.

Tips for making shankarpali
Tips for Shankarpali or Shakkarpara

आज आपण टिप्स फॉर शंकरपाळी किंवा शंकरपाळे ह्या बद्दल माहिती घेणार आहोत.
गोडाची शंकरपाळी बनवताना घ्यावयाची काळजी:
गोड शंकरपाळी बनवताना साखरेचे प्रमाण योग्य म्हणजे जसे रेसीपीमध्ये दिले असेल त्याप्रमाणे घ्या. जर साखरेचे प्रमाण जास्त झाले तर शंकरपाळ्या कडक होतात. छान खुसखुशीत होत नाहीत.
आपण तेल, पाणी व साखर मिश्रण गरम करून शंकरपाळी बनवतो तेव्हा मिश्रण गरम असताना मैदा मिक्स करू नये त्यामुळे शंकरपाळी तळताना तेल किंवा तूप जास्त शोषले जाते व शंकरपाळी तेलकट होते.
आपण मैदा वापरुन शंकरपाळी बनवतो तेव्हा त्यामध्ये थोडा बारीक रवा वापरुन पीठ भिजवावे व 10 मिनिट बाजूला झाकून ठेवावे म्हणजे रवा थोडा भिजतो व त्यामुळे शंकरपाळी छान खुसखुशीत होतात.
शंकरपाळीचे पीठ भिजवताना थोडेसे मीठ घाला छान चव लागते. गोड पदार्थमध्ये एक चिमूत मीठ घातले तर टेस्ट छान येते.
शंकरपाळी बनवताना गोळा घेऊन थोडे जाडसर लाटावे म्हणजे छान होतात.
शंकरपाळी तळताना तेल अथवा वनस्पति तूप वापरले तरी चालते.
शंकरपाळी तळताना मंद विस्तवावर तळावी खूप काळी तळलीतर करपट लागतात. तसेच पांढरट तळली तर पोटात कच्ची राहतात व मऊ पडतात. शंकरपाळी तळताना छान गुलाबी रंगावर तळावी तसेच सुरवातीला शंकरपाळी तेलात किंवा तुपात टाकताना ते नीट तापले आहे की नाही ते तपासून पहावे. मगच तळायला घ्यावी. त्यामुळे छान खुसखुशीत होतात व 10-15 दिवस चांगल्या टिकतात.

पाकातील शंकरपाळी बनवताना अश्या प्रकारे काळजी घ्या.
पाकातल्या शंकरपाळी लाटताना थोडी जाडसर लाटावी व तळताना मंद विस्तवावर गुलाबी रंगावर तळावी. अश्या प्रकारची शंकरपाळी छान लागते लग्नात किंवा इतर वेळी बनवतात.
पाकातील शंकरपाळी बनवताना पाक गोळी बंद करवा. मग शंकरपाळी तळून झाल्यावर पाकात व्यावस्तीत घोळावी. थंड झाल्यावर डब्यात भरावी.

खारी शंकरपाळी:
खारी शंकरपाळी बनवताना ती पातळ लाटावी चवीला छान लागते व प्रवासाला जाताना बरोबर नेता येते.

दिवाळी फराळ तयारी कशी करावी

टिप्स फॉर मेकिंग दिवाळी फराळ करंजी कशी बनवावी येथे क्लिक करा

टिप्स फॉर मेकिंग दिवाळी फराळ लाडू कसे बनवावे येथे क्लिक करा

टिप्स फॉर मेकिंग दिवाळी फराळ चकली कशी बनवावी येथे क्लिक करा

टिप्स फॉर मेकिंग दिवाळी फराळ चिवडा कसा बनवावा येथे क्लिक करा

टिप्स फॉर मेकिंग दिवाळी फराळ शेव कशी बनवावी येथे क्लिक करा

शंकरपाळी किंवा शंकरपाळे नानाविध प्रकार खाली लिंक देत आहे.

Crispy Rava Maida Shankarpali for Diwali Faral

Red Pumpkin Shankarpali for Diwali Faral

Tasty Carrot Shankarpali for Diwali Faral

Khuskhushit Rava Maida Shankarpali for Diwali Faral Recipe in Marathi

Godi Shankarpali for Diwali Faral

Kasuri Methi Shankarpali for Diwali Faral

Kurkurit Salted Shankarpali for Diwali Faral Recipe in Marathi

Pakatle Shankarpali for Diwali Faral

Khari Shankarpali for Diwali Faral

Cheese Shankarpali Recipe in Marathi

Amba Shankarpali Recipe in Marathi

Salted Champakali for Diwali Faral

Jaggery Shankarpali Recipe in Marathi

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.