Makar Sankranti 2021 Muhurat Mahiti And Tilachi Vadi In Marathi

Makar Sankranti 14 January 2021 Muhurth
Makar Sankranti 14 January 2021 Muhurat Importance

दर वर्षी मकर संक्रांत 14 जानेवारी ह्या दिवशी असते. ह्या वर्षी सुद्धा 14 जानेवारी 2021 गुरुवार ह्या दिवशी मकर संक्रांत आहे. हिंदू धर्मा मध्ये मकर संक्रांत ह्या दिवसाला खूप महत्व आहे तसेच नवीन वर्षाच्या सुरवातीचा हा पहिला सण आहे. ह्या दिवशी भक्त सूर्य देवाची उपासना करतात. ज्योतिष शास्त्र नुसार मकर संक्रांत ह्या दिवशी भगवान सूर्य धनू राशी मधून मकर राशी मध्ये प्रवेश करतात. ही अगदी शुभ संकेत आहेत.

मकर संक्रांत ह्या दिवशी सूर्य भगवान ह्यांच्या बरोबर श्री गणेश व माता लक्ष्मी व भगवान शंकर यांची सुद्धा पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते. ह्या दिवशी तीळ व गूळ ह्याचे दान केल्याने पुण्य मिळते. तेसच ह्या दिवशी पवित्र नदी मध्ये स्नान केल्याने पुण्य मिळते.

The Marathi language video Makar Sankrant 14 January 2021 Puja Vidhi can be seen on our YouTube Channel of Makar Santranti !4 January 2021 Thursday Muhurat And Importance

महाराष्ट्रात महिला मकर संक्रांत हा सण साजरा करतात. ह्या दिवशी महिला 5 बोळक्यांची पूजा करतात. पूजा कशी करायची मागील विडियो मध्ये पूर्ण माहिती दिली आहे त्याची लिंक डिसक्रीपशन बॉक्स मध्ये दिली आहे.

मकर संक्रांत पूजा विधी, महत्व, हळदी-कुंकू, लहान मुलांचे बोर नहाण विडियो लिंक येथे पहा: Makar Sankrant Puja Vidhi 

मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त
13 जानेवारी 2021 बुधवार भोगी आहे.
14 जानेवारी 2021 गुरुवार आहे.
मुहूर्त सकाळी 8:15 ते 4:15 वाजे पर्यन्त
15 जानेवारी 2021 शुक्रवार करिदिन आहे. (ह्या दिवशी चांगले काम करीत नाही)

Makar Sankranti 14 January 2021 Muhurth
Makar Sankranti 14 January 2021 Muhurat Importance

मकर संक्रांतीचे संक्रमण बव करणावर होत असल्याने वाहन सिंह असून उपवाहन हत्ती आहे. तिने पांढरे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे. कस्तुरीचा टिळा लावलेला आहे. वयाने बाल असून बसलेली आहे. वासा करिता हातात चाफ्याचे फूल घेतले आहे. पश्चिमे कडून पूर्वे कडे जात असून आग्नेय दिशेकडे पाहत आहे.

आपल्या हिंदू पुराणात असे म्हणतात की मकर संक्रांती ह्या दिवशी भगवान सूर्य आपल्या पुत्राला म्हणजे भगवान शनि ह्यांची भेट घ्यायला जातात तेव्हा भगवान शनि मकर राशीचे प्रतिनिधीत्व करतात. शनि मकर राशीचे देवता आहेत त्यामुळे मकर संक्रांती हा दिवस साजरा केला जातो. म्हणून असे म्हणतात की ह्या दिवशी जर कोणी पिता आपल्या पुत्रला भेटायला गेले तर त्यांची सर्व समस्या दूर होतात.

महाराष्ट्रात महिला ह्या दिवशी सकाळी पूजा करून संध्याकाळी विवाहित महिलाना घरी हळदी कुंकू साठी बोलवून त्यांना वाण देतात. नवीन लग्न झालेल्या मुलीची पहिली मकर संक्रांत खूप थाटात साजरी करून तिला हळव्याचे दागिने घालतात.
पाच वर्षा पर्यन्तच्या मुलांचे बोर नहान करतात त्याची सविस्तर माहिती ह्या अगोदरच्या विडियो मध्ये दिली आहे त्याची लिंक डिसक्रीपशन बॉक्समध्ये दिली आहे. तिळाच्या वड्या, तिळाचे लाडू अनेक प्रकार आहेत त्याची लिंक डिसक्रीपशन बॉक्समध्ये दिली आहे.

तिळाच्या वड्या लाडू कसे बनवायचे त्याची लिंक येथे पहा:

Til Gulachi Poli Recipe in Marathi
Tilache Aushdhi Gundharm In Marathi
Tilachi Chutney Recipe in Marathi
Tilachi Burfi Recipe in Marathi
Konkani Style Tilachi Vadi for Makar Sankranti Recipe in Marathi
Sankranti Tilachi Vadi Recipe in Marathi
Special Traditional Til Ki Rewari for Lohri Recipe in Marathi
Delicious Til Gulachi Karanji Recipe in Marathi
Maharashtrian Til Honey Ladoo for Makar Sankranti Recipe in Marathi
Til Khajur Laddu for Makar Sankranti Recipe in Marathi
Til Gulachi Poli Recipe in Marathi
Bajra Til Bhakri Recipe in Marathi
Chocolate Sesame Ladoos
Gulachi Dashami | Gulachi Poli | Tilgul Poli | Sweet Puri
Tilgulache Laddu Recipe in Marathi

 

 

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.