Khamang Lasoon Chutney Recipe in Marathi

लसूण चटणी: लसूण चटणी बनवायला अगदी सोपी आहे. तसेच झटपट होणारी आहे. लसूण हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. आजारी असेल व तोंडाला चव नसेल तर ही चटणी बनवावी त्यामुळे तोंडाला टेस्ट येते व भूक सुद्धा लागते. ताप येत असेल तर भाताच्या पेजे बरोबर ही चटणी सर्व्ह करावी. खेडेगावात झुणका भाकरी बरोबर लसणाची चटणी देतात तेव्हा त्याची चव अप्रतीम लागते. ही चटणी मिक्सरमध्ये न बनवता पाट्यावर किंवा दगडीमध्ये वाटावी त्याची टेस्ट फार छान लागते.

The English language version of this Maharashtrian Garlic Chutney and its preparation method can be seen here – Lasun Chutney

बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी

साहित्य:
१ कप ओला नारळ
१२-१५ लसूण पाकळ्या
१/२ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून लिंबूरस
मीठ चवीने

Garlic Chutney

Khamang Lasoon Chutney

कृती:
ओला नारळ खोऊन घ्या. लसूण सोलून घ्या.
लसूण, मीठ, लाल मिरची पावडर दगडी मध्ये वाटून घ्या. मग त्यामध्ये खोवलेला नारळ घालून मिक्स करून परत दगडी मध्ये थोडेसे वाटुन घ्या. मग त्यावर लिंबूरस मिक्स करून वाटीमध्ये चटणी काढून ठेवा.

About Sujata Nerurkar (1897 Articles)
I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.


*