गरमीमध्ये त्वचा स्वस्थ व चमकदार राहण्यासाठी घरगुती सोपे उपाय
Ramban Upay For Summer Skin Problems In Marathi
गरमीच्या सीझनमध्ये त्वचा स्वस्थ व चमकदार राहण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत ते जर आपण आमलात आणले तर आपली स्कीन मस्त मुलायम राहू शकते. आपली स्कीन हाइड्रेटेड ठेवणे, एलोविराचा उपयोग करणे, सनस्क्रीन लावणे, दही, बेसन, टोमॅटो सारखे नैसर्गिक उत्पादनाचा उपयोग करू शकता.
हाइड्रेटेड राहण्यासाठी:
दिवस भरात भरपूर पाणी प्या.
हाइड्रेटिंग फळ व भाज्या सेवन करा.
ताक, दही, व सॅलडचे सेवन करा.
नारळाचे पाणी सेवन करा.
एलोवेराचा उपयोग:
एलोविरा जेल स्कीन ला थंड ठेवते व मॉइस्चराइज़ करते.
एलोवेरा जेल चेहऱ्यावर लाऊन मालीश करा.
एलोवेरा त्वचेला हाइड्रेट ठेवण्यास मदत करते.
सनस्क्रीनचा उपयोग:
उन्हात जाण्याच्या अगोदर पहिल्यांदा सनस्क्रीन लावा.
कमीत कमी 30 SPF असणारे सनस्क्रीनचा वापर करा.
ते आपली स्कीन उन्हा पासून होणाऱ्या नुकसान पासून वाचवते.
दही व बेसनचा लेप:
दही व बेसनचा लेप आपल्या स्कीनला थंडावा देतो व टैनिंग होण्यापासून वाचवतो.
दही व बेसनचा लेप चेहऱ्यावर लाऊन 15-20 मिनिट नंतर धुवावा.
टमाटरचा रस किंवा काकडीची पेस्ट:
टोमॅटोचा रस किंवा काकडीची पेस्ट स्कीनला थंडावा देते व स्कीन टैनिंग होण्या पासून वाचू शकते.
टोमॅटोरस किंवा काकडीची पेस्ट चेहऱ्यावर लाऊन 15-20 मिनिट नंतर धुवावी.
केळे, मध व एलोवेराची पेस्ट:
केळे, मध व एलोवेराची पेस्ट स्कीनला हाइड्रेट ठेवते व इन्फेक्शन होण्यापासून वाचवते.
केळे, मध व एलोवेराची पेस्ट चेहऱ्यावर लाऊन 15-20 मिनिट तशीच ठेवावी मग धुवावी.

अजून काही घरगुती उपाय:
लिंबूरसनो स्कीन टैनिंग होण्यापासून वाचू शकते. त्याच बरोबर स्कीन ताजी तवानी होऊन उजळ होते.
विटामीन C स्कीनला अगदी आत पासून उजळण्यास मदत करते.
बेसन, हळद,चंदन व दूधचा फेस पॅक स्कीनला चमकदार बनवतो.
मसूर डाळीची पेस्ट व मध मिक्स करून लावल्याने स्कीन टाइट होते.
पोपई व मधचा फेस पॅक स्कीनला पोषण देण्यास मदत करतो. तसेच आपली स्कीन रिपेर करण्यास मदत करते.
गरमीमद्धे स्कीन लुज होते तर ती टाईट करण्यासाठी 5 DIYफेस मास्क लावावा.
आपण बाहेरून घरी आलोकी लगेच आपला चेहरा, हात-पाय थंड पाण्यानी धुवावे, म्हणजे धूल, माती व घाम आल्यानी स्कीन खराब होणे त्या पासून आपली स्कीन वाचू शकते. मग एलोवेरा जेल लाऊन हलक्या हातानी मालीश करावे त्यामुळे स्कीनला थंडावा मिळेल. तसेच आठवड्यातून 2 वेळा माइल्ड स्क्रब ने डेड स्कीन घालवण्यासाठी फायदेमंद आहे. टैनिंग पासून मुक्ती मिळवण्यासाठी दही व बेसनचा लेप, टोमॅटो रस किंवा काकडीची पेस्ट स्कीनवर लावावी.