वैशाख अमावस्या 2025 पितृ दोष मुक्ती उपाय राशी नुसार दान करून मिळवा पितरांचा आशीर्वाद
Vaishakh Amavasya 2025 Pitru Dosh Mukti Upay In Marathi
हिंदू धर्मामध्ये शास्त्रानुसार अमावस्या ह्या तिथीला विशेष महत्व आहे. ह्या वेळी वैशाख अमावस्या तिथीने थोडे संभ्रमात टाकले आहे की अमावस्या 26 एप्रिल का 27 एप्रिल ला आहे.
हिंदू पंचांगनुसार वैशाख महिना दान-पुण्य साठी खूप शुभ मानला जातो. त्याच बरोबर अमावस्या ही तिथी पावन व विशेष मानली जाते. संपूर्ण वर्षात 12 अमावस्या तिथी येतात. वैशाख महिन्यातील अमावस्या तिथी ही वैशाख अमावस्या संबोधली जाते. ह्या दिवशी जगाचे पालनहार भगवान विष्णुचे पूजन केले जाते. त्याच बरोबर ह्या दिवशी पितरांना तर्पण व पिंडदान केले जाते.
वैशाख अमावस्या शुभ मुहूर्त:
वैदिक पंचांग अनुसार वैशाख कृष्ण पक्ष अमावस्या तिथीची सुरुवात 27 एप्रिल सकाळी 4 वाजून 28 मिनिटला सुरू होत असून अमावस्या तिथी समाप्ती 27 एप्रिल रात्री उशिरा म्हणजे 1 वाजून 2 मिनिट पर्यन्त आहे.
उदयतिथी वैशाख अमावस्या 27 एप्रिल म्हणजेच रविवारी आहे.
ब्रह्ममुहूर्त सकाळी 4 वाजून 10 मिनिट पासून 4 वाजून 52 मिनिट पर्यन्त
अमावस्या तिथी समाप्ती 27 एप्रिल रात्री उशिरा म्हणजे 1 वाजून 2 मिनिट पर्यन्त
उदय तिथी अनुसार वैशाख अमावस्या 27 एप्रिल सकाळी 4:10 ते 4:52 पर्यन्त व दुपारी 12: 11 ते 1:02 अभिजीत मुहूर्त आहे. तेव्हा स्नान दान करू शकता
स्नान करण्यासाठी सर्वात श्रेष्ठ मुहूर्त:
धार्मिक मान्यता अनुसार वैशाख अमावस्या ह्या दिवशी स्नान करण्यासाठी सर्वात शुभ ब्रह्म मुहूर्त मानला जातो. ह्या दिवशी ब्रह्म मुहूर्तवर पवित्र नदीमध्ये डुबकी घेतलीतर पुण्य मिळते. म्हणूनच ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केले पाहिजे. त्यानंतर दान केले पाहिजे त्यामुळे पुण्य मिळते.
वैशाख अमावस्या धार्मिक महत्व:
वैशाख अमावस्या ह्या दिवशी स्नान दान करण्याचे विशेष महत्व आहे. त्यामुळे पितृ दोष पासून होणारा त्रास कमी होतो. तसेच ह्या दिवशी गाय, कावळा व कुत्रा ह्यांना भोजन दिल्याने जीवनातील कष्ट दूर होतील.
वैशाख अमावस्या करा प्रभावशाली उपाय:
वैशाख अमावस्या ह्या दिवशी आपल्या घरच्या छतावर दक्षिण दिशेला तुपाचा दिवा लावावा. त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल व परिवारातील लोकांनमध्ये प्रेम वाढेल. त्याच बरोबर घरातिल व्यक्तीची उन्नती होईल.
आपल्या घरात सारखे वाद-विवाद व भांडणे होत असतीलतर वैशाख अमावस्या ह्या दिवशी रात्री तुरटीचा एक तुकडा विकत आणून आपल्या उजव्या हातात घेऊन घरातील प्रतेक कोपऱ्यात फिरवा मग एक काळ्या रंगाचे कापड घेऊन तो तुरटीचा तुकडा त्यामध्ये बांधून मुख्य दरवाजावर टांगून ठेवा. त्यामुळे आपल्या घरातील परेशानी दूर होऊन आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळेल.
पितरांच्या आत्मा शांतीसाठी वैशाख अमावस्या ह्या दिवशी रात्री पिंपळाच्या झाडाच्या खाली मोहरीच्या तेलाचा दिवा लाऊन आपल्या पितरांचे स्मरण करावे. त्यामुळे पितर खुश होतील.
असे म्हणतात की अमावस्याच्या दिवशी जे लोक मनोभावे भगवान विष्णु ह्यांची पूजा करतात त्यांना मोक्ष मिळतो. म्हणूनच वैशाख अमावस्याच्या दिवशी सकाळी व संध्याकाळी भगवान विष्णु ह्यांची मनोभावे पूजा अर्चा करावी. त्यांच्या मंत्राचा जाप करावा. त्यामुळे पितृ दोषा पासून मुक्ती मिळेल.
वैशाख अमावस्याच्या रात्री भगवान विष्णु ह्यांची पूजा केल्यावर पाणी असलेला एक नारळ घेऊन त्यावर कलवा सात वेळा गुंडाळा तसेच कलवा गुंडाळतान आपल्या पितरांचे स्मरण करा त्यामुळे त्यांच्या आत्माला शांती मिळेल. मग तो नारळ नदीमध्ये विसर्जित करा. त्यामुळे पिरतांचा आशीर्वाद मिळेल व आपल्या घरातील व्यक्तीची क्लेशा पासून मुक्ती होईल.
पितरांना खुश करायचे असेलतर वैशाख अमावस्या हूं दिवशी राशीनुसार दान केल्याने 7 पिढ्यान आशीर्वाद मिळेल. घरात कशाची सुद्धा कमतरता होणार नाही. चला तर मग पाहूया 12 राशीनी कोणते उपाय करणे शुभ आहे.

राशी नुसार जरूर करा ही उपाय:
मेष – ह्या राशीच्या लोकांनी वैशाख अमावस्या ह्या दिवशी पितरांच्या निमित्तानी पाणी, सरबत, थंड पेय दान करावे.
वृषभ – ह्या राशीच्या लोकांनी वैशाख अमावस्या ह्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी जरूरतमंद लोकांना धन व धान्य व अन्न दान करावे.
मिथुन – ह्या राशीच्या लोकांनी वैशाख अमावस्या ह्या दिवशी पितरांच्या नावांनी ऊसाचा रस किंवा थंड पाणी दान करावे.
कर्क – वैशाख अमावस्याच्या दिवशी पितरांना खुश करण्यासाठी पांढरे खाद्य पदार्थ व धन दान करावे.
सिंह – ह्या राशीच्या लोकांनी वैशाख अमावस्या ह्या दिवशी गूळ, चणे व मधचे दान करू शकता.
कन्या – वैशाख अमावस्याच्या दिवशी पितरांना खुश करण्यासाठी तुपामध्ये बनवलेले पदार्थ दान करावे. त्यामुळे पितृ देवता प्रसन्न होईल.
तूळ: ह्या राशीच्या लोकांनी वैशाख अमावस्या ह्या दिवशी ब्राह्मणांना भोजन दिले पाहिजे व जरूरतमंद लोकांना पांढऱ्या वस्तु दान कराव्या.
वृश्चिक – ह्या राशीच्या लोकांनी वैशाख अमावस्या ह्या दिवशी पितरांच्या नावांनी गूळ, लाल कपडे दान करावे. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळेल.
धनु – ह्या राशीच्या लोकांनी वैशाख अमावस्या ह्या दिवशी पितरांना खुश करण्यासाठी मिठाई, केळे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करावे.
मकर – ह्या राशीच्या लोकांनी वैशाख अमावस्या ह्या दिवशी काले उडीद व तीळ दान करणे शुभ मानले जाते.
कुंभ – ह्या राशीच्या लोकांनी वैशाख अमावस्या ह्या दिवशी पितरांच्या नावावे धन व चप्पल दान करावे.
मीन – ह्या राशीच्या लोकांनी वैशाख अमावस्या ह्या दिवशी पितरांना खुश करण्यासाठी थंड पाणी व पिवळ्या रंगाचे खाद्य पदार्थ दान करावे.