अक्षय तृतीय 2025 हे उपाय करणे अत्यंत शुभ,कोणत्या जागी दिवा लावल्याने माता लक्ष्मीची कृपा मिळेल
Akshaya Tritiya 2025 Upay, Importance And Shubh Muhurat In Marathi
अक्षय तृतीयाला काही सटीक उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हणतात की ही उपाय केलेतर जीवनात सुख-समृद्धी येते. तसेच माता लक्ष्मीची कृपा मिळून आपली तिजोरी भरते.
अक्षय तृतीयाच्या दिवशी माता लक्ष्मीची विशेष पूजा अर्चा करण्याचे महत्व आहे. तसेच ह्या दिवशी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते.
30 एप्रिल 2025 बुधवार ह्या दिवशी अक्षय तृतीया आहे. पंचांग नुसार दर वर्षी वैशाख मास शुक्ल पक्ष तृतीया तिथीला अक्षय तृतीया साजरी करतात. अक्षय तृतीयाल अखा तिज सुद्धा मानले जाते. अक्षयकहा अर्थ आहे ज्याकहा कधी सुद्धा क्षय होत नाही. धार्मिक मान्यता अनुसार अक्षय तृतीयाच्या दिवशी पूजा-पाठ, दान-पुण्य व यज्ञ करणे विशेष महत्वाचे मानले जाते. ह्या तिथीला बिना मुहूर्तचे कोणते सुद्धा चांगले शुभ काम केले जाते. अक्षय तृतीयाच्या दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते. असे म्हणतात की ह्या दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी केल्याने आपल्या जीवनात माता लक्ष्मीची विशेष कृपा राहून सुख-समृद्धी व वैभवाची प्राप्ती होते.
अक्षय तृतीयाच्या दिवशी काही धार्मिक उपाय केले तर माता लक्ष्मीकहा आशीर्वाद मिळून जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते.
धन व सुख समृद्धीच्या साठी उपाय:
अक्षय तृतीयाच्या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष रूपात पूजा आराधना करण्याचे महत्व आहे. धनामध्ये वृद्धी होण्यासाठी व जीवनात सुख संपन्नता मिळण्यासाठी माता लक्ष्मीच्या बरोबर भगवान विष्णु ह्यांची सुद्धा विधी पूर्वक पूजा अर्चा करतात. माता लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पित करा व भोगमध्ये खीर दाखवा. असा उपाय केल्याने जीवनात सुख, धन व वैभव प्राप्त होते.
सौभाग्यमध्ये वृद्धी होण्यासाठी उपाय:
30 एप्रिल अक्षय तृतीयाच्या दिवशी सुख समृद्धी व सौभाग्यमध्ये वृद्धी होण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजाला तोरण बांधून स्वस्तिक काढावे. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येऊन माता लक्ष्मीची कृपा मिळते.
सोन्याचे दागिने खरेदी करण्याचे महत्व:
अक्षय तृतीयाच्या दिवशी ज्या वस्तूची खरेदी केली जाते तिचा कधी सुद्धा क्षय होत नाही. धार्मिक मान्यता अनुसार सोन्याच्या दागिन्यांमध्ये माता लक्ष्मीची वास असतो असे म्हणतात. म्हणून अक्षय तृतीयाच्या दिवशी सोने खरेदी केल्याने त्याचा कधी क्षय होत नाही. ते पिढ्यान पिढ्या चलतात. जर ह्या दिवशी आपण सोने खरेदी करणार असाल तर त्याला घरात उत्तर दिशेला ठेवा.
अक्षय तृतीयाच्या दिवशी दान करण्याचे महत्व:
अक्षय तृतीयाच्या दिवशी सोने खरेदी करण्याचे जेवहडे महत्व आहे तेवहडेच महत्व दान करण्याचे सुद्धा आहे. ह्या दिवशी दान केल्याने सर्व्ह कष्ट दूर होतात. ह्या दिवशी पाण्याचे घडे, माठ, पंखे, चपल्ल, चटाई, छत्री, तांदूळ, मीठ, तूप, खरबूज, काकडी, मिश्री, सत्तू व गरमीच्या लाभकारी वस्तु दान करण्याने पुण्य मिळते.
अक्षय तृतीयाला दीपदान करण्याचे महत्व:
अक्षय तृतीयाला दीपदान करण्याचे महत्व आहे. हा दिवस समृद्धी, शुभता व आशीर्वाद प्राप्त होतो. ह्या दिवशी दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जाचा संचार होतो. उलट लक्ष्मी व कुबेरची कृपा प्राप्त होते. दिव्यांचा प्रकाश अंधकार पासून प्रकाश मिळण्याचे प्रतीक आहे. घराचा मुख्य दरवाजा, उत्तर दिशा व पितरांचे स्थानावर दिवा लावल्याने धन, सुख समृद्धी मिळून नाते संबंधमध्ये मजबूती येते. ह्या दिवशी दीपदान केल्याने जीवनात सर्व प्रकारची नाकारात्मकताचा नाश होतो. व सकारात्मकचा प्रभाव पडतो. त्यामुळे संपूर्ण वर्ष सुख-समृद्धीचा वास होतो.
अक्षय तृतीयाला कोकोणत्या ठिकाणी दीपदान करावे:
मुख्य दरवाजा:
घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला दिवा लावल्याने माता लक्ष्मीचा वास राहतो. घरात सुख समृद्धी येते. हे स्थान विशेष रूपात महत्वाचे मानले जाते. कारण मुख्य दार घरात सकारात्मक ऊर्जाचे प्रवेश दार मानले जाते.

उत्तर दिशा:
उत्तर दिशेला दिवा लावल्याने धन व समृद्धी येते. करणकी ही दिशा कुबेर भगवान ह्यांची आहे. त्यामुळे घरात आर्थिक समृद्धी व शांत वातावरण राहते.
स्वयंपाक घर:
स्वयंपाक घरात आपण जेथे पाणी ठेवतो त्याजागी दिवा लावल्याने पितरांची कृपा मिळते. व घरात शांती राहते. ही स्थान पितृ आशीर्वाद व आंतरिक शांती मिळण्यासाठी महत्वपूर्ण आहे.
पाण्याची जागा:
घराच्या जवळ तळे किंवा विहीर किंवा नदी असेलतर तेथे दिवा लावावा त्यामुळे देवांची कृपा प्राप्त होऊन नकारात्मक ऊर्जाचा नाश होतो. तेथे दिवा लावणे शुभ मानले जाते.
पूजेची जागा:
घरातील पूजाची जागा म्हणजेच घरातील मंदिर तेथे दिवा लावल्याने धार्मिक शांती व आशीर्वाद प्राप्त होतो. ह्या दिवशी विशेष पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते.
अक्षय तृतीया 2025 तिथी शुभ मुहूर्त:
अक्षय तृतीय 30 एप्रिल 2025 बुधवार ह्यादिवशी साजरी करायची आहे.
वैशाख मास शुक्ल पक्ष तृतीया तिथी 29 एप्रिल संध्याकाळी 5:31 ला सुरू होत असून 30 एप्रिल दुपारी 2:12 मिनिट पर्यन्त आहे.
पूजासाठी विशेष मुहूर्त: सकाळी 5:41 ते दुपारी 12:18 पर्यन्त आहे.
सोने खरेदी शुभ मुहूर्त:
30 एप्रिल सकाळी 5:41 ते दुपारी 2:12 पर्यन्त आहे. आपण सोने खरेदी शक्य नसेलतर पितळी भांडी, मातीची भांडी खरेदी करू शकता.