15 मिनिटात मॅंगो मिनी केक मुलांना पाहिजे होता बनवला तेपण बिना ओव्हन बिना पॅन
In 15 Miniutes Quick Mango Mini Cake Without Oven For Kids In Marathi
आता आंब्याचा सीझन चालू आहे. मुलांना सुट्यासुद्धा आहेत. मग आंब्याचे रोज काहीना काही पदार्थ आपण बनवू शकतो. आज मुलांसाठी आंब्याचे मिनी केक बनवणार आहोत. तर पण अगदी 15 मिनिट मध्ये झटपट.
आपण मिनी केक बनवताना अंडे, ओव्हन किंवा पॅन वापरणार नाही. आपण अप्पे पात्र मध्ये बनवणार आहोत. आप्पे पात्र हे नॉनस्टिक पॅनमध्ये बनवणार असल्या मुले त्याला तेल लावायची गरज नाही.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
बेकिंग वेळ: 15 मिनिट
वाढणी 20 मिनी केक बनतात
साहित्य:
1 मोठ्या आकाराचा हापुस आंबा
1 कप मैदा
1/4 कप तेल
1/2 कप पिठीसाखर
2 टे स्पून मिल्क पावडर
1/2 कप दूध
1 टी स्पून बेकिंग पावडर
1/4 टी स्पून बेकिंग सोडा
1/4 टी स्पून वेलची पावडर

कृती: प्रथम आंब्याचा रस काढून मिक्सरमधून एकदा ब्लेड करून घेऊन बाजूला ठेवा. मैदा, बेकिंग पावडर व बेकिंग सोडा चाळून बाजूला ठेवा. साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
एका बाउलमध्ये तेल, पिठीसाखर, मिल्क पावडर व दूध घालून हँड ब्लेंडरनी मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये चाळलेला मैदा घालून मिक्स करून घ्या. आता त्यामध्ये आंब्याचा पल्प घालून मिक्स करून घ्या. मिक्स करताना हळुवारपणे 2-3 मिनिट मिक्स करा.
विस्तव चालू करून त्यावर एक जुना तवा गरम करायला ठेवा. नॉनस्टिक अप्पेपात्र घेऊन त्यामध्ये एक-एक टे स्पून मिश्रण घाला किंवा मिश्रण भरताना 3/4 साचा भरावा. मिश्रण घातल्यावर अप्पे पात्र गरम तव्यावर ठेवून त्यावर झाकण ठेवा. विस्तव मंद ठेवून 15 मिनिट मिनी केक बेक करून घ्या.
साधारण 15 ते 16 मिनिट झालेकी विस्तव बंद करून झाकण काढून बाजूला ठेवा. मिनी केक थंड झाल्यावर हळुवारपणे काढून घ्या मग सर्व्ह करा.