टेस्टि कुरकुरीत चीज कॉर्न बॉलस् मुलांच्या नाश्तासाठी डब्बासाठी मिनिटात संपवतील
Tasty Crispy Zatpat Cheesy Corn Bombs For Kids Nasta-Tiffin In Marathi
आता बाजारात स्वीट कॉर्न आपल्याला सहजपणे मिळतात. स्वीट कॉर्नचे आपण नानाविध पदार्थ बनवू शकतो. आपण ह्या अगोदरच्या विडियोमध्ये स्वीट कॉर्न पुलाव कसा बनवायचा ते पाहिले. आज आपण स्वीट कॉर्न बॉलस् किंवा स्वीट कॉर्न बॉम्ब्स् कसे अगदी सोप्या पद्धतीने बनवायचे ते पाहूया.
स्वीट कॉर्न बॉलस् बनवताना आपण अगदी हेल्दि कसे बनवायचे ते पाहू या. स्वीट कॉर्न बनवताना आपण शिमला मिरची, गाजर, कांदा, व चीज वापरणार आहोत चीज तर मुलांना खूप आवडते.
बनवण्यासाठी वेळ: 25 मिनिट
वाढणी: 9-10 स्वीट कॉर्न बॉलस् बनतात
साहित्य:
1 कप स्वीट कॉर्न दाणे
3/4 कप बारीक रवा
1 छोट्या आकाराचा कांदा (चिरून)
1 छोटे गाजर (चिरून)
1 छोटी शिमला मिरची (चिरून)
1 टे स्पून आल-लसूण-हिरवी मिरची कुटून
2 टे स्पून दही
1 टी स्पून चिली फ्लेस्क
1/2 टी स्पून गरम मसाला
2 टे स्पून कोथिंबीर
मीठ चवीने
2 चीज क्युब
1/4 वाटी तेल

कृती: प्रथम स्वीट कॉर्नचे दाणे वाफवून घ्या. मग त्यामधील 1/4 कप दाणे बाजूला ठेवून 3/4 दाणे मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्या. कांदा, कोथिंबीर, शिमला मिरची व गाजर चिरून घ्या.
एका बाउलमध्ये ब्लेंड केलेले स्वीट कॉर्न व दाणे घ्या, त्यामध्ये चिरलेला कांदा, कोथिंबीर, गाजर, शिमला मिरची, आल-लसूण-हिरवी मिरची,दही, चिली फ्लेस्क, कोथिंबीर, गरम मसाला, मीठ घालून मिक्स करून 10 मिनिट झाकून बाजूला ठेवा.
आप्पे पात्रला तेल लाऊन गरम करायला ठेवा. 10 मिनिट झाल्यावर बनवलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे बॉलस् बनवून त्यामध्ये किसलेले चीज ठेवून गोला बंद करून बाजूला ठेवा, अश्या प्रकारे सर्व बॉलस् बनवून गहेवून तेल लावलेल्या आप्पे पात्रामध्ये ठेवा प्रतेक बॉलच्या बाजूनी थोडेसे तेल सोडा व आप्पे पात्रावर झाकण ठेवून मध्यम विस्तवावर बेक करून घ्या, 4-5 मिनिट झाल्यावर झाकण काढून आप्पे कुरकुरीत झाले का पहा, झाले असतील तर उलट करून परत बाजूनी थोडेसे तेल सोडून परत 2-3 मिनिट बेक करून घ्या.
आता गरम गरम स्वीट कॉर्न आप्पे टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.