श्री स्वामी समर्थ तारक मंत्र जापचे फायदे
Shri Swami Samarth Tarak Mantra Benefits In Marathi
श्री स्वामी समर्थ तारक मंत्रहा भक्तांसाठी एक अत्यंत पवित्र व शक्तिशाली मंत्र मानला जातो. स्वामी समर्थ तारक मंत्र हा जो मंत्र आहे जो संसारातिल बांधना पासून मुक्ती देतो व आपले जीवन अगदी निर्विघ्नपणे पार पाडण्यास मदत करतो.
तारक मंत्राचा जाप साधकाला स्वामींची कृपा व आशीर्वाद मिळण्यासाठी उपयोगी आहे. त्यामुळे भक्ताच्या जीवनातील सर्व दुख दूर होतात.
आता आपण काही महत्वपूर्ण मुद्दे पहाणार आहोत:
श्री स्वामी समर्थ ह्यांच्या जीवनाचा परिचय
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र जाप विधि
श्री स्वामी समर्थ तारक मंत्रचे फायदे
श्री स्वामी समर्थ का जीवन परिचय
श्री स्वामी समर्थ महाराज महाराष्ट्रमधील अक्कलकोट मधील एक प्रकट प्रसिद्ध संत व आध्यात्मिक गुरु होते. आपल्या अद्भुत आध्यात्मिक व चमत्कारी शक्तिमुळे श्री स्वामी समर्थ हे लहान वयात ते संत व अभ्यातमिक गुरु बनले.
असे म्हणतात की श्री स्वामी समर्थ हे भगवान श्री दत्तात्रयचे तिसरे पूर्णवतार होते. श्री स्वामी समर्थ हे उच्च स्तरिय आध्यात्मिक ज्ञान, सिद्धिया व चमत्कारांनी लाखों लोकांचे जीवन परिवर्तीत केले आहे.
श्री स्वामी समर्थ ह्यांचे लाखों अनुयायी व शिष्य आहेत. श्री चोळपा हे त्यांचे प्रिय शिष्य होते. श्री स्वामी ह्यांनी पूर्ण देशाची यात्रा केली होती.
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र:
श्री स्वामी समर्थ ह्यांच्या विषयीची श्रद्धा व शिक्षाचा प्रभाव महाराष्ट्रा बरोबर भारतभर पहायला मिळतो.
श्री स्वामी समर्थ ह्यांचा तारक मंत्र व्यक्तिच्या जन्म व मृत्यूच्या चक्राला पार करणारा पवित्र व शक्तिशाली मंत्र आहे. ह्या मंत्राचा जाप भयाचा नाश व मानसिक संतुलन प्रदान करणारा आहे.
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र जाप विधि:
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र जाप करण्यासाठी कोणतेसुद्धा अनुष्ठान करण्याची आवशक्ता नाही फक्त मंत्र जाप करताना पुढे काही नियम दिले आहेत त्याचे पालन करणे जरुरीचे आहे.
तारक मंत्राचा जाप करताना सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावे, जर सकाळी मंत्र जाप करणे शक्य नाहीतर आपल्या वेळे अनुसार आपण मंत्र जाप करू शकता.
मंत्र जाप सुरू करण्याच्या अगोदर साफ व शांत जागा पहावी.
मंत्र जाप सुरू करताना आसनावर बसावे.
आपल्या समोर श्री स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. त्याच्या पुढे दिवा आगरबती लावावी. फुले अर्पित करावी.
मग मंत्र जाप करताना संपूर्ण भक्ती भावाने व एकाग्रतानी जाप करावा.

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र जापचे फायदे:
श्री स्वामी समर्थ ह्यांच्या नियमित तारक मंत्र जाप केल्याने स्वामींची कृपा मिळून साधकाला साहस, भक्ति, धैर्य व आंतरिक शांती प्राप्त होते.
श्री स्वामी समर्थ ह्यांच्या तारक मंत्राचा जाप करण्याचे फायदे:
* भयाचा नाश होतो.
* श्री स्वामी समर्थ ह्यांच्या तारक मंत्राचा जाप केल्याने मनातील उत्पन्न होणारी भीती समाप्त होऊन स्थिरता मिळते.
* मनातील शंकांचे निरसन होते.
* तारम मंत्राचा जप केल्याने भक्ताच्या हृदयातील शंका, मन व बुद्धीचा विकास होतो व मनुष्य साहसी व आत्मबलानी त्याचे जीवन पुढे जाते.
*मोक्ष ची प्राप्ती होते.
* स्वामी समर्थ तारक मंत्र जाप केल्याने साधकाला संसारातून मुक्ती मिळून मोक्ष मिळतो. त्याच बरोबर मनातील मृत्युचे भय समाप्त होते.
* सर्व कार्य संपन्न होऊन प्रतेक कामातील अडथळे दूर होतात.
* स्वामी समर्थ ह्यांच्या तारक मंत्रजाप केल्याने असंभव कार्य सुद्धा संभव होतात. ह्या मंत्राचा नियमित जाप केल्याने मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात.
* संकटापासून सुरक्षा मिळते. ह्या मंत्राचा जाप नियमित केल्याने जीवनात संकट येत नाहीत.
स्वामी समर्थ तारक मंत्र जाप करण्याचे नियम:
ह्या मंत्रचा जाप करण्यासाठी काही विशिष्ट निय नाहीत. फक्त मंत्र करताना स्वच्छताचे पालन करा पवित्र मनाने व एकाग्रताणे जाप करा.
मंत्र जाप करण्यासाठी तुळशीची किंवा कमलची जाप माळ वापरली तर उत्तम होईल.