26 एप्रिल 2025 श्री स्वामी समर्थ पुण्यतिथि सेवा करून सर्व इच्छा पूर्ण होतील
26 April Shri Swami Samarth Punyatithi Sewa In Marathi
26 एप्रिल 2025 शनिवार ह्या दिवशी श्री स्वामी समर्थ ह्यांची पुण्यतिथि आहे. आपण जसे श्री स्वामींच्या प्रकटदिनी नामस्मरणाची सेवा किंवा तारकमंत्र किंवा श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतचे वाचन केले होते तसेच आता सुद्धा आपल्याला ही सेवा करावयाची आहे.
श्री स्वामी समर्थ ह्यांची सेवा मनोभावे केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. स्वामी आपल्या भक्तांच्या नेहमी मागे असतात. स्वामींचे नामस्मरण केल्यास त्याचे खूप फायदे होतात.
आपण आज पासून म्हणजेच 16 एप्रिल पासून 26 एप्रिल पर्यन्त सेवा करू शकता. म्हणजेच 11 दिवसांची सेवा करू शकता किंवा 7 दिवसांची किंवा 5 दिवसांची सुद्धा सेवा करू शकता. स्वामींची सेवा करताना एक दृढ विश्वास व नियमित पणा ठेवून सेवा करावी. म्हणजे त्याचे फळ आपल्याला मिळते.
श्री स्वामी समर्थ ह्यांची सेवा करताना सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून स्वामीच्या फोटो किंवा मूर्ती किंवा फोटोला हळद-कुंकू, फुले, दिवा व अगरबत्ती लाऊन एक संकल्प करावा. संकल्प करताना आपल्या मनातील इच्छा सांगून सेवा करायला सुरुवात करावी.
सेवा करताना आपण मनाशी एक निश्चय करावा की मी 11 दिवस किंवा 7 दिवस किंवा 5 दिवस रोज श्री स्वामी समर्थ ह्या प्रभावी मंत्राचा 1 माळ किंवा त्याहून अधिक माळा जाप करील म्हणजेच 26 एप्रिल पर्यन्त मी 51 माळा किंवा त्याहून अधिक माळ जाप करीन किंवा तारक मंत्राचा जाप करील किंवा श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतचे पठन करील.
पहिली सेवा:
आपण श्री स्वामी महाराजांचे 21 अध्याय रोज वाचू शकता, समजा रोज 21 आध्याय वाचने शक्य नसेलतर रोज 2 आध्याय नक्की वाचा.
दुसरी सेवा:
आपण रोज 11 वेळा तारक मंत्राचा जाप करू शकता. तारक मंत्र जाप सुरू करण्याच्या अगोदर एका तांब्याच्या लोटयामध्ये किंवा भांड्यात पाणी घेऊन त्यावर उजवा हात ठेवून तारक मंत्राचा जाप करावा, मंत्रजाप झाल्यावर तांब्यातील पाणी घरातील व्यक्तिना तीर्थ म्हणून द्यावे. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्याचे चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतील.
तिसरी सेवा:
आपण ही सेवा करताना फक्त पुढे दिलेला अगदी सोपा षडा:क्षरी मंत्र म्हणायचा आहे. रोज किमान 108 वेळा मंत्र जाप करावा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा केला तरी चालेल.
मंत्र: “श्री स्वामी समर्थ”

श्री स्वामींची सेवा करण्याचे काही सोपे नियम आहेत:
11 दिवस ही सेवा करीत असाल तर मांसाहार करू नये सात्विक जेवण सेवन करावे. शुद्ध विचार ठेवावे, कोणची सुद्धा निंदा करू नये. घरातील वातावरण आनंदी ठेवावे त्यामुळे घरात सकारात्मकता येते. मासिक पाळी असेलतर ही सेवा करू नये
आपण ही सेवा दिवस भरात कधी सुद्धा करू शकता. फक्त सकाळी 12 ते 12:30 ह्या वेळत सेवा करू नये. कारणकी ही वेळ स्वामींची भिक्षेची वेळ आहे.
आपण ही सेवा शक्य असेल तेव्हडे दिवस करू शकता, उदा. 11, दिवस, 7 दिवस, 5 दिवस किंवा पुण्यतिथि दिवसाच्या दिवशी.
श्री स्वामी समर्थ ह्यांचे नामस्मरण करण्याचे महत्व:
प्रारब्धाची तीव्रता कमी होते.
मन शांत व आनंदी राहते.
सेवा केल्याचे समाधान मिळते
आपली वास्तु शुद्ध होते व वास्तु दोष असेलतर निघून जातो
प्रारब्धा भोगण्याची क्षमता वाढते
घरात सात्विकता वाढते व घरातील वातावरण चांगले राहते
संसारीक अडचणी कमी होतात किंवा दूर होतात
घरातील व्यक्तिमद्धे प्रेमभाव निर्माण होतो
घरात भगवंताचा वास राहतो.
काळजी मिटून भीती जाते
संकटाला सामोरे जाण्याच्या शक्ति मिळते
आपण स्वभाव बदलत जातो व सकारात्मकता येते
आपल्या सदगुणांत जलद गती येवून वृद्धी होते
साकक्षांत सद्गुरूनचा हात आपल्या मस्तकी असतो.
26 एप्रिल 2025 शनिवार रोजी आपला संकल्प पूर्ण झाल्यावर श्री स्वामीना गोड नेवेद्य दाखवून आपला संकल्प पूर्ण करावा.