स्कीन केअर टिप्स: थंडीच्या सीझनमध्ये 9 घरगुती उपाय, त्वचा राहील मऊ व चमकदार
Home Remedy: Winter Skin Care Tips In Marathi
थंडीच्या सीझनमध्ये 9 घरगुती उपाय करून स्कीन राहील मुलायम व चेहऱ्या नाही राहणार कोरडा व शुष्क. थंडीच्या सीझनमध्ये आपण घरगुती 9 उपाय वापरुन आपल्या स्कीनची काळजी कशी घ्यायची ते पाहू या.
थंडीमद्धे आपली स्कीन कोरडी पडून त्याची चमक कमी होते. त्यामुळे आपल्या चेहरा सुरकुतलेला दिसतो. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर मॉइश्चराइजर लावणे जरुरीचे आहे. तसे पाहिले तर त्वचेच्या रक्षणासाठी घरगुती उपचार चांगले मानले जातात कारणकी ते प्रभावी मानले जातात त्याचे साइड इफेक्ट काही होत नाहीत.
1. केळ्याचा फेसपॅक:
आपली स्कीन कोरडी आहे तर त्यासाठी केळ्याचा फेसपॅक वापरू शकता. आपल्याला फक्त केळे कुस्करून घ्यायचे आहे. मग त्यामध्ये दूध, मध, लिंबू रस घालून मिक्स करून चेहऱ्यावर लावायचे आहे. मग पॅक सुकल्यावर साध्या पाण्यानी चेहरा धुवायचा आहे. त्यामुळे स्कीन मऊ व चमकदार होते.
2 बदामाचे तेल:
आपण आपल्या चेहऱ्यावर बदामाचे तेल लाऊन मालीश करू शकतो. त्यामुळे आपल्याला चांगले इफेक्ट पाहायला मिळतील. त्यामुळे चेहऱ्यावरील चमक व मुलायमपणा चांगला राहील.
3. मध व अंडे:
मध व अंडे आपली स्कीन सॉफ्ट ठेवण्यास मदत ठेवते. मध व अंडे मिक्स करून त्याचा फेस मास्क बनवून आपल्या चेहऱ्यावर लावून 10 मिनिट नंतर पाण्यांनी स्वच्छ धुवून टाका.
4. ओटमिल व दूध:
थोडे ओटमिल व दूध मिक्स करून त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावावी मग काही मिनिट नंतर स्वच्छ पाण्यानी धुवावी. त्यामुळे डेड स्कीन निघून जाईल व चेहरा अधिक चमकदार व सुंदर दिसेल.

5. काकडी:
काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. काकडी आपण डायरेक्ट खावू शकतो किंवा चेहऱ्यावर लावू शकतो. त्यामुळे चेहरा छान मऊ राहील.
6. नारळाचे तेल:
कोरडी त्वचा व निस्तेज त्वचासाठी नारळाचे तेल मॉइस्चराइज़र चांगले काम करते. आपण सुद्धा हा उपाय करू शकता.
7. एलोवेरा:
एलोवेरा जेल मॉइस्चराइज़र च्या रूपात एकदम चांगला उपाय आहे. त्यामुळे स्कीन वरील मुरूम व सुरकुत्या दूर होण्यास मदत होते.
8. दूध:
दुधामद्धे एंटीऑक्सीडेंट व लैक्टिक एसिड भरपूर प्रमाणात असते. त्यामध्ये पोपई, बदाम, हळद मिक्स करून फेसवर लावावे. त्यामुळे स्कीनचा रंग उजळून येतो व काळे डाग निघून जाण्यास मदत होते.
9. आपल्या स्कीनला नेहमी हाइड्रेट करा, त्यामुळे शरीरातील टोक्सिन निघून जातात. असे म्हणतात की महिलांनी रोज दिवसातून 1.6 लीटर पाणी पिले पाहिजे व पुरुषांनी 2 लीटर पाणी पिले पाहिजे.