संकट चौथ व्रत का करावे? मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, सर्व अडचणी दूर करण्यासाठी सोपे उपाय
Sankat Chauth 2025 Information And Upay In Marathi
मकर संक्राती नंतर संकट चौथ हा दिवस येतो. त्याला तीळ चौथ असे सुद्धा म्हणतात. सनातन शास्त्रा मध्ये ह्याचा विशेष उल्लेख केलेला आहे. ह्या दिवशी भगवान गणेश ह्यांची पूजा अर्चा केली जाते. त्याच बरोबर विशेष नेवेद्य सुद्धा दाखवला जातो. व गरीब लोकांना दान दिले जाते. धार्मिक मान्यता अनुसार ह्या शुभ दिवशी कोणते सुद्धा चांगले काम केले तर जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होऊन गणेश भगवान ह्यांची कृपा मिळते.
आपण आता पाहूया संकट चौथचे व्रत का करायचे?
पंचांग अनुसार कृष्ण पक्ष चतुर्थी तिथीला संकट चौथ हा दिवस साजरा करायचा आहे. हा दिवस भगवान गणेशजिन समर्पित आहे.
संकट चौथच्या दिवशी भगवान गणेशजीनचे व्रत केलेतर ते प्रसन्न होतात. त्याच बरोबर जीवनात सर्व सुखांची प्राप्ती होते. ह्या दिवशी भगवान गणेश ह्यांची पूजा अर्चा मंत्र जाप नक्की करावा. त्यामुळे आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होते. घरात सुख-शांतीचे आगमन होते. मुलांच्या जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात. असे म्हणतात की ह्या दिवशी चंद्रदेव ह्यांना पाणी दिले तर आपल्या मुलांना कोणती सुद्धा रोगाचा सामना करावा लागत नाही व सौभाग्याची प्राप्ती होते.
सकट चौथ 2025 मुहूर्त (Sakat Chauth 2025 Shubh Muhurat)
पंचांग के अनुसार, कृष्ण पक्ष चतुर्थी तिथि की सुरुवात 17 जानेवारी सकाळी 4 वाजून 06 मिनिट समाप्ती 18 जानेवारी सकाळी 5 वाजून 30 मिनिट
शुभ वेळ:
ब्रह्म मुहूर्त – सकाळी 05 वाजून 27 मिनट पासून 6 वाजून 21 मिनिट
गोधूलि मुहूर्त – संध्याकाळी 05 वाजून 45 मिनट ते 6 वाजून 12 मिनिट
अभिजीत मुहूर्त – दुपारी 12 वाजून 10 मिनट ते दुपारी 12 वाजून 52 मिनिट

संकट चौथ मुलांची दीर्घायुष्यासाठी उपाय:
धार्मिक मान्यता अनुसार महिलांनी आपल्या मुलांसाठी ह्या दिवशी व्रत केले पाहिजे. त्याच बरोबर काही उपाय सुद्धा केले पाहिजे. संकट चौथ हा दिवस हिंदू लोकांचा महत्वपूर्ण दिवस आहे.
सकट चौथ 2025 उपाय (Sakat Chauth 2025 Upay)
संकट चौथ ह्या दिवशी गणपती बाप्पा समोर तुपाचा दिवा लावून त्यामध्ये कापुर घालावा. मग बाप्पा ला मोदक, दूर्वा व पान-सुपारी, तिळाचे पदार्थ अर्पित करावी. से केल्याने आपल्या मुलांच्या जीवनात सुख-समृद्धी येते. त्याचा बरोबर त्यांची उन्नती होते व आशीर्वाद मिळतात.
संकट चौथ ह्या दिवशी भगवान गणेश ह्यांची विधीपूर्वक पूजा अर्चा करून संकटनाशन गणेश स्तोत्र म्हणावे. मग मुलांच्या डोक्यावरून 7 दूर्वा फिरवून भगवान गणेश ह्यांचा अर्पित कराव्या. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निघून सकारात्मक ऊर्जा येते व गणेश भगवान ह्यांचा आशीर्वाद मळतो.