Maharashtrian Style Pomfret Cutlets Recipe in Marathi

पापलेट फिश कटलेट: पापलेट फिश कटलेट ही एक साईड डीश किंवा स्टारटर म्हणून बनवायला छान आहे. अश्या प्रकारचे कटलेट बनवतांना पापलेट वापरला आहे. तसेच उकडलेला बटाटा , कांदा, आले-लसूण व अंडे वापरले आहे त्यामुळे ह्याची टेस्ट अप्रतीम लागते व अंडे वापरल्यामुळे कटलेट तव्यावर फुटत नाही व छान कुरकुरीत होतात.

The English language version of this Pomfret Cutlet recipe and preparation method can be seen here – Spicy Maharashtrian Pomfret Cutlets

बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: १२ कटलेट बनतात

साहित्य:
१ मध्यम आकाराचा पापलेट मासा
२ छोटे कांदे
२ मध्यम आकाराचे बटाटे
१/४ कप कोथंबीर
१ टी स्पून लिंबूरस
१/४ कप नारळ (खोऊन)
मीठ चवीने तेल कटलेट तळण्यासाठी

मसाला वाटण्यासाठी:
२ हिरव्या मिरच्या
१/२” आले तुकडा
७ लसूण पाकळ्या
१/२ टी स्पून धने-जिरे पावडर
१/२ टी स्पून मिरे पावडर

आवरणासाठी:
१ अंडे (फेटून)
२-३ टोस्ट (पावडर)

 Pomfret Cutlets

Tasty and Delicious Pomfret Cutlets

कृती:
बटाटे उकडून, सोलून, किसून घ्या. कांदा, कोथंबीर बारीक चिरून घ्या. आले-लसूण-हिरवी मिरची वाटुन घ्या.

पापलेट धुवून स्वच्छ करून घ्या. एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवून त्यावर चाळणी ठेवा व चाळणीत मासा ठेवून झाकण ठेवा. १०-१२ मिनिट मासा वाफवून घ्या. मासा वाफवून झाल्यावर त्यातील काटे काढून घ्या. काटे काढल्यावर मास कुस्करून घ्या. (मासा वाफवून घेतला की त्यातील काटे आपोआप बाजूला होतात, काटे काढायला त्रास होत नाही). मग त्यामध्ये उकडलेला बटाटा, वाटलेला मसाला घालून मिक्स करा.

एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा घालून दोन मिनिट परतून घ्या. म्ह त्यामध्ये मीठ, माशाचे मिश्रण, धने-जिरे पावडर, लिंबूरस, चिरलेली कोथंबीर घालून मिक्स करून त्याचे १२ एक सारखे गोळे बनवून थोडे बोटानी दाबून चपटे करा.

एका बावूल मध्ये एक अंडे फेटून घ्या. दुसऱ्या एका बाऊलमध्ये टोस्टचा चुरा घ्या. एक एक कटलेट घेऊन प्रथम फेटलेल्या अंड्यात मग टोस्ट च्या पावडर मध्ये घोळवून घ्या.

कढईमधे तेल गरम करून फिश कटलेट दिलेल्या कृती प्रमाणे तळून घ्या.

गरम गरम फिश कटलेट सर्व्ह करा.

About Sujata Nerurkar (1968 Articles)
I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.


*