Jyeshtha Purnima 2026 | Do These 7 Powerful Remedies For Luck, Wealth & Prosperity

Jyeshtha Purnima 2026
Jyeshtha Purnima 2026 | Do These 7 Powerful Remedies For Luck, Wealth & Prosperity

Jyeshtha Purnima 2026 | Do These 7 Powerful Remedies For Luck, Wealth & Prosperity

ज्येष्ठ पूर्णिमा 2026 व्रत, महत्व, करा अचूक 7 उपाय नशीब बदलेल,  काय करावे 

ज्येष्ठ पूर्णिमा व्रत 29 जून 2026 सोमवार ह्या दिवशी आहे. वट सावित्रीच्या सारखेच वर पूर्णिमा म्हणजेच ज्येष्ठ पूर्णिमा हा सन मुख्य करून महाराष्ट्र, गुजरात, व दक्षिण भारतमध्ये साजरा करतात, उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा हे व्रत ठेवले जाते. चला तरमग पाहू ज्येष्ठ पूर्णिमा संपूर्ण माहिती.

ज्येष्ठ पूर्णिमा प्रारंभ 29 जून 2026 सोमवार सकाळी 03:09 पासून 

ज्येष्ठ पूर्णिमा समाप्ती 30 जून 2026 मंगळवार सकाळी 05:29 पर्यन्त 

ज्येष्ठ पूर्णिमा महत्व:

ज्येष्ठ पूर्णिमा ह्या दिवसाला सनातन धर्मामध्ये शुभ व पुण्यदायी तिथी मानले जाते. धार्मिक मान्यता अनुसार ह्या दिवशी भगवान विष्णु, माता लक्ष्मी व चंद्र देव ह्यांची पूजा अर्चा केल्याने जीवनात सुख, समृद्धी व मानसिक शांतीचे आगमन होते. बरेच जन ह्या दिवशी सत्यनारायणची पूजा करून कथा आईकतात. त्यामुळे परिवारात खुशाली, सौभाग्य व सकारात्मकता येते. असे म्हणतात की संध्याकाळी माता लक्ष्मीची आराधना करून त्यांना प्रिय भोग अर्पित केल्याने आर्थिक उन्नती होण्याचे मार्ग खुले होतात. त्याच बरोबर चंद्राला अर्ध्य दिल्याने मन शांत होऊन मानसिक तनाव दूर होण्यास मदत होते.

ज्येष्ठ पूर्णिमा ह्या दिवशी काय करावे? 

ज्येष्ठ पूर्णिमा ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे व व्रत संकल्प करावा.

जर शक्य असेलतर पवित्र नदीमध्ये, सरोवरात किंवा तीर्थस्थळी स्नान करावे. जर तेथे जाऊन स्नान करणे शक्य नसेलतर घरीच अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे.

स्नान झाल्यावर भगवान विष्णु, माता लक्ष्मी, भगवान शिव व चंद्रदेव ह्यांची विधी पूर्वक पूजा करावी.

दिवसभर आपल्या आयपती नुसार दान-पुण्य व धार्मिक कार्यामध्ये भाग घ्यावा.

जरूरतमंद लोकांना अन्न, वस्त्र व अन्य उपयोगी वस्तु दान कराव्या.

संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर चंद्राला जल अर्पित करा.

चंद्र देवाची पूजा झाल्यावर सुख, शांती व समृद्धीसाठी प्रार्थना करा.

ज्येष्ठ पूर्णिमा ह्या दिवशी सत्यनारायण पूजा करणे किंवा कथा आइकणे शुभ मानले जाते.

संपूर्ण दिवस सकारात्मक विचार व सात्विकता चे पालन करा.

ज्येष्ठ पूर्णिमा हा दिवस सकाळी स्नान,ध्यान, दान व पुण्य कर्म केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जाचा संचार येतो.

Jyeshtha Purnima 2026
Jyeshtha Purnima 2026 | Do These 7 Powerful Remedies For Luck, Wealth & Prosperity

ज्येष्ठ पूर्णिमा ह्या दिवशी करा 7 सटीक उपाय: 

1. विवाह बाधा दूर करण्यासाठी उपाय: 

जर तरुण विवाह योग्य मुला-मुलींचे विवाह ठरण्यामद्धे अडचणी येत असतील किंवा विवाह ठरल्यावर अडचणी येत असतील तर ज्येष्ठ पूर्णिमा ह्या दिवशी एक उपाय करा.

शिवाभिषेक: ह्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करून भगवान शिव ह्यांची विधी पूर्वक पूजा करून अभिषेक करा. असे केल्याने विवाहामद्धे येणाऱ्या अडचणी दूर होतील.

2. सुख-समृद्धी व आर्थिक लाभचे अचूक उपाय: 

जीवनात पैशाची तंगी दूर करण्यासाठी व व्यापारात उन्नती होण्यासाठी करा हा उपाय.

पिंपळाच्या वृक्षाची पूजा: अडकलेले पैसे मिळण्यासाठी: ज्येष्ठ पूर्णिमा पिंपळाच्या वृक्षाची पूजा केली पाहिजे पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान विष्णु व माता लक्ष्मीचा वास असतो. ह्या दिवशी एका तांब्यामद्धे जल व कचे दूध घेऊन त्यामध्ये बतासे मिक्स करून पिंपळाच्या वृक्षाला अर्पित करा. असे केल्याने अडकलेले पैसे परत मिळतील व व्यापारात लाभ होईल.

 

3. महालक्ष्मी व कवड्याचा उपाय: 

माता लक्ष्मीच्या फोटोवर 11 कवड्या ठेवून त्यावर हळद लावा. मग दुसऱ्या दिवशी त्या कवड्या एका लाल रंगाच्या कापडात बांधून तिजोरीमध्ये जेथे धन ठेवतो तेथे ठेवा. त्यामुळे आर्थिक स्थिति मजबूत होते.

4. दोष निवारण व भाग्य जागृत होण्यासाठी उपाय: 

कुंडलीमधील ग्रह शांत करण्यासाठी व अडकलेली कामे पूर्ण करण्यासाठी ह्या दिवशी रात्री काही चांगले कर्म केले पाहीजे.

5. चंद्र देवाला अर्ध्य:

विवाहित जीवनात समस्या समाप्त करण्यासाठी पती किंवा पत्नी दोघांपैकी एकाने रात्री चंद्र देवाला दुधानी अर्ध्य दिले पाहिजे.

6. ग्रह दोष शांती:

जर कुंडलीमध्ये कोणता ग्रह दोष परेशान करीत असेलतर पूर्णिमा च्या दिवशी पिंपळाच्या, वडाच्या किंवा कडीलिंबाच्या (जेथे ही तिन्ही झाड जवळ असतील) त्याच्या खाली बसून “विष्णु सहस्त्रनाम’ किंवा ‘शिवाष्टक’ चे वाचन करावे.

7. अचानक भाग्य उजळण्यासाठी उपाय:

असे म्हणतात की ज्येष्ठ पूर्णिमा ह्या दिवसाच्या रात्री कोणत्या सुद्धा विहिरीमध्ये एक चमचा दूध टाकल्याने भाग्य उजळते व महत्वपूर्ण कार्य मध्ये येणाऱ्या बाधा समाप्त होतात.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.